
Contents
- 1 ‘शिरुर’ तालुक्यात 15 वर्षीय मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यु तर शिरुर शहरात 73,500 रुपये किंमतीचा माल चोरीला !
- 1.1 ‘शिरुर’ तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघातात 15 वर्षीय बहीण मृत्युमुखी तर 13 वर्षीय भाऊ जखमी !
- 1.1.1 शिरुर,दिनांक-10 अगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
- 1.1.2 ‘शिरुर’ तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघात. …
- 1.1.3 शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघात…
- 1.1.4 चालकाचा बेजबाबदारपणा….
- 1.1.5 ‘शिरुर’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. ….
- 1.1.6 ‘शिरुर’ शहरात 73 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल चोरीला. …
- 1.1.7 चोरीला गेलेल्या मालाचे वर्णन पुढीलप्रमाणे —-
- 1.1.8 दुकान हार्डवेअर चे….
- 1.1.9 ‘शिरुर’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. ….
- 1.1.10 About The Author
- 1.1 ‘शिरुर’ तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघातात 15 वर्षीय बहीण मृत्युमुखी तर 13 वर्षीय भाऊ जखमी !
‘शिरुर’ तालुक्यात 15 वर्षीय मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यु तर शिरुर शहरात 73,500 रुपये किंमतीचा माल चोरीला !
‘शिरुर’ तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघातात 15 वर्षीय बहीण मृत्युमुखी तर 13 वर्षीय भाऊ जखमी !
शिरुर,दिनांक-10 अगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )

‘शिरुर’ तालुक्यात 15 वर्षीय मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला आहे.ही घटना मांडवगण फराटा, तालुका- शिरूर येथे घडली आहे. तर शिरुर शहरात 73,500 रुपये किंमतीचा माल चोरीला गेला आहे. दोन्ही घटनांची नोंद ‘शिरुर’ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
‘शिरुर’ तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघात. …
‘शिरुर’ तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघातात 15 वर्षीय बहीण मृत्युमुखी पडली. तर 13 वर्षीय भाऊ जखमी झाला. या
दोन्ही घटनांची नोंद ‘शिरुर’ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.या दुर्दैवी मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री. जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अपघात…
शिरूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आल्यानुसार हकिगत अशी की दिनांक 09/08/2024 गेजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमाराम मांडवगण फराटा, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत कोळपे वस्ती येथे अपघात झाला . टेम्पो नं. एम. एच. 42 बी. एफ. 3132 वरील अज्ञात चालकाकडुन हा अपघात झाला. त्याच्या ताब्यातील टेम्पो हा हयगईने, अविचाराने, रस्त्याच्या आजुबाजुला न पाहता चुकीच्या बाजुने चालवला गेला.त्यामुळे समोरून येणारे वाहन स्पष्ट दिसत असतानाही वाहनाला धडक लागून जीव जाऊ शकतो. याची जागीय असतानाही टेम्पो चालक टेम्पो चालवित पुढे घेवुन जात होता.त्यावेळी असताना मुलगी श्रावणी देविदास थोरात, वय- 15 वर्षे हीस जोरात धडक बसली.या अपघातामध्ये तिला गंभीर जखम झाली. तिचा जागीच मृत्यु झाला.तसेच निरंजन देविदास थोरात ,वय- 13 वर्षे,याला गंभीर दुखापत झाली. मोटार सायकल नं एम.एच. 12 ई जी 5174 हीचे नुकसान झाले.
चालकाचा बेजबाबदारपणा….
त्यामुळे जखमी झालेल्यास उपचाराकरीता हॉस्पीटलमध्ये दाखल न करता चालक टेम्पो चालवित पुढे निघुन गेला. या अपघाताची कोनतीच खबर न देता देता तसाच पळून गेला. म्हणुन फिर्यादी देविदास नाना थोरात ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी टेम्पो नं एम. एच. 42 बी. एफ. 3132 वरील अज्ञात चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘शिरुर’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. ….
शिरुर पोलीस स्टेशनला अज्ञात चालकाविरूध्द गुरनं 682 /2024, हा तर भारतीय न्याय संहिता कलम 105, 324(4),324(5)281, 125(a), 125 (b) मोटार वाहन अधिनियम184 प्रमाणे फिर्यादी दाखल करण्यात आली आहे.दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.आगलावे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार सहायक पोलिस निरिक्षक श्री.हे कदम करत आहेत.प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षण श्री.जोतिराम गुंजवटे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
——-
‘शिरुर’ शहरात 73 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल चोरीला. …

शिरुर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आल्यानुसार हकिकत अशी की हनुमंत विठठल भापकर ,वय- ४२ वर्ष ,व्यवसाय- हार्डवेअर व फेब्रीकेशन ,राहणार- बाबुरावनगर,शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे हे दिनांक- ०७/०८/२०२४ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघुन गेले.
त्यांनतर दि.०८/०८/२०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या सुमारास दुकानावर आले. दुकानाची पाहणी करीत असताना त्यांना दुकानाच्या समोर असलेले कम्पाउड मधील असलेले मोकळे जागेत काही वस्तु व मशिनरी, वजनमापे, ड्रील मटेरीयल, दिसुन आले नाही. त्यामुळे त्यांनी दुकानातील काम करणार्या ६ कामगारांना त्याबाबत विचारणा केली.त्यावेळी त्यांनाही त्याबाबत त्याबाबत माहीत नसल्याचे त्यांनी सागितंले. त्यामुळे फिर्यादी यांनी दुकानाच्या आतील बाजूला असलेले गाळयांची व मोकळया जागेत ठेवलेल्या वस्तूची पाहणी केली.त्यावेळी त्यात ठेवलेले खालीलप्रमाणे वस्तु व मशिनरी, वजनमापे, ड्रील मटेरीयल, दिसुन आल्या नाहीत. ते चोरीला गेले होते.
चोरीला गेलेल्या मालाचे वर्णन पुढीलप्रमाणे —-
1) १२.००० रूपये किमतीची लोखंडी हिटाची कटर. जु. वा. कि.
2 ) ४,५००:- रूपये किमतीचे लोखंडी ०५ किलोग्रॅम वजनाचे ०३नग, १० किलोग्रॅम वजनाचे ०१ नग, २० किलोग्रॅम वजनाचे ०१नग लोखंडी वजनमापे जु.वा.की.अं.
3 ) १८,००० रूपये किमतीचे ४० बाय ०६ एम. एम ची लोखंडी ग्रील मटेरीयल पटटया ०९ नग जु.वा.की.अं.
4 ) २००० रूपये किमतीचे एक लोखंडी झाकण ,२० किलोग्रॅम वजनाचे जु.वा.की.अं.
5 ) ३५०० रुपये किमतीचे १६एम, १४ एम, १० एम असे असलेले लोखंडी ड्रील बीट. जु.वा.की.अं
6 ) ७,००० रू किंमतीचे खिडकीसाठी असणारे लोखडी ब्राईड बार जु.वा.की.अं.
7 ) १८,५०० रू किंमतीचे लोखंडी व्हालपास पटटया १५० किलोग्रॅम वजनाचे जु.वा.की.अं.
असे एकुण ७३,५०० रूपये येणेप्रमाणे किंमतीचे सामान चोरीला गेले आहे.
दुकान हार्डवेअर चे….
वरील प्रमाणे फिर्यादी हनुमंत विठठल भापकर ,वय-४२ वर्ष, व्यवसाय – हार्डवेअर व फेब्रीकेशन, राहणार- बाबुरावनगर शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणेयांच्या वस्तू ‘स्वंयभु हार्डवेअर’ नावाने असलेल्या हार्डवेअर व फेब्रीकेशन दुकानाच्या उघड्या गाळयातील व कम्पाउड मधील असलेले मोकळया जागेतुन कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून वरील वर्णन केल्याप्रमाणे सामान चोरुन नेले आहे.
‘शिरुर’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. ….
म्हणुन त्या अज्ञात चोरटयाविरूदध गुरनं 681/2024 हा तर भारतीय न्याय संहिता कलम 303 (2)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.आगलावे हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. आगलावे हे करत आहेत.प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक श्री.जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.