
Contents
- 1 शिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात ? एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी !
शिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात ? एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी !
शिरुर पोलीसांनी प्राण्यांना क्रुरतेची वागणुक कायद्याअंतर्गत केला गुन्हा दाखल !
शिरुर,दिनांक 26जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
( Thanks to pixabay.com for Images in this content)

शिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात घेण्यात आली आहेत.पैकी एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी पडले आहे. शिरुर पोलीसांनी प्राण्यांना क्रुरतेची वागणुक कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडली आहे.पुढे वाचा सविस्तर!
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील घटना !
शिरूर पोलीस स्टेशन अंकित मांडवगण फराटा दुरक्षेत्र येथे हजर राहुन फिर्यादी फिर्यादी भाउसाहेब शहाजी टेंगले, पोलीस अंमलदार , नेमणुक -शिरूर पोलीस स्टेशन यांनी जबाब दिला आहे. तो असा की ते वरील ठिकणी सुमारे 2 वर्षापासुन पोलीस अंमलदार या पदावर नेमणूकीस आहेत. सध्या मांडवगण फराटा दुरक्षेत्र येथे गेले दिड वर्षापासुन कर्तव्यावर आहेत.
सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ?
शिरुर पोलीसांना मिळाली गोपनीय सुत्रांकडुन बातमी !
दिनांक 24/01/2025 रोजी शिरूर पोलीस स्टेशन अंकित मांडवगण फराटा दुरक्षेत्र येथे ते व पोलीस हवालदार शिंदे कर्तव्यवर हजर असतात. दुपारी 13:00 वाजण्याच्या सुमारास पोलिस हवालदार श्री.शिंदे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी. ती अशी की स्वराज्य मजदा कंपनीची (आयशर) चारचाकी गाडी नंबर ,म-,च-14ई-,म-1050 मधुन जनावरे वडगाव रासाई येथुन करमाळा येथे नेली जात आहेत. त्यांना दाटीवाटीने कोंबुन कुरतेने वागणूक दिली जात आहे. जनावरांची वाहतुकीपुर्वी वैदयकिय अधिका-याकडुन तपासणी केलेली नाही. तसेच ती जनावरे घेवुन जाणार आहेत
.
बातमी मिळाल्याने पोलीस हवालदार शिंदे यांनी दोन पंचाना बोलावले. त्यांना बातमीचा आशय समजावुन सांगितला. त्यांनी पंच म्हणून उपस्थितीत राहण्याची संमती दर्शवली. त्यांना सोबत घेवुन ते मांडवगण फराटा गावच्या चौकात कार्यवाही करीता येवुन थांबले.
त्यावेळी
1) मिनीनाथ विलास गव्हाणे,
2) योगेश केशव मचाले,
3) सागर रमेश गव्हाणे,
4) संजय पोपट ग गव्हाणे
5) अमोल आनंदा चैगुले
सर्व राहणार – मांडवगण फराटा, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांना देखील बोलावुन घेतले .
पंचासमक्ष केला पंचनामा !
दुपारी 14:15 वाजण्याच्या सुमारास स्वराज्य मजदा कंपनीची (आयशर) चारचाकी गाडी आर-टी-ओ नं ,म-,च-14 ई-,म 1050 हा चारी बाजुने पॅक केलेली होती. ही गाडी ही वडगाव रासाई ते मांडवगण फराटा बाजुकडुन जाताना मांडवगण फराटा गाव चौक येथे दिसली. त्यावेळी त्यांनी सदरची गाडी थांबवली .सदर गाडीचे चालकास पंचासमक्ष नाव ,पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रविकांत पांडुरंग माने, वय -35 वर्षे ,राहणार – वडगाव रासाई , तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे असे आहे.उपस्थित असलेल्या दोन पंचा समक्ष सांगितले,’ सदर गाडीमध्ये काय आहे’? असे विचारले .त्यावेळी चालक त्यांना म्हणाला की, ‘ गाडीमध्ये 21 म्हशीची पारडी (रेडी) व , टोणगा (रेडा) आहेत’.
म्हशींच्या पारड्यांना चारापाणी उपलब्ध नव्हते !
त्यावेळी त्यांनी सदर गाडीच्या पाठीमागील पडदा सोडुन आत पाहीले. त्यावेळी आत मध्ये म्हशीचे 22 पारडी होती. सदर गाडीमध्ये कुरपणे कोबुन त्यांना कोणत्याही प्रकारचा चारा पाणी यांची व्यवस्था नव्हती.असे दिसले. त्यावेळी त्यांनी गाडी चालकस ,’ सदर म्हशीची पारडी कोठे चालविली आहेत?’- ती कोणाचे आहेत ? असे विचारले.त्याने सांगितले की, ‘वडगाव रासाई येथुन खरीदी करून बबन ज्ञानदेव गिरमे , राहणार – कोर्टी , तालुका – करमाळा ,जिल्हा – सोलापुर यांच्या गोठयावर वुन यांचेकडे चालविले’. असे दोन पंचासमक्ष सांगितले. त्यांना जनावरे वाहतुक करण्यायापुर्वी जनावरांची वैदयकीय तपासणी केले असलेबाबत वैदयकीय अधिकारी यांचे प्रमाण पत्र मागितले .तर त्यांनी जनावरांची कोनतीही वैदयकीय तपासणी केली नसले बाबत सांगितले.
आटोमोबाइल्स इंजिनिअर बनुन 70 हजार ते अडीच लाख रुपये पगार कसा मिळवाल?
एक पारडी बेशुध्द पडुन मृत्यु पावली !

म्हशीचे २२ पारड्यांपैकी पैकी एक पारडी (रेडी) होती. तीची कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती . ती बेशुध्द आवस्थेत असल्याचे आढळुन आले. तिच्यावर उपचारासाठी माननीय वैदयकिय अधिकारी , इनामगाव यांना लेखी पत्र दिले. बाकीची पारडी यांच्या चारा पाण्याची योग्य ती सोय करण्यात आली आहे. काही वेळाने वैदयकिय अधिकारी इनामगाव हे तेथे आले. नंतर त्याचेकडुन बेशुध्द असलेली पारडी रेडीची वैदयकिय तपासणी केली. वैदयकिय अधिकारी, इनामगाव यांनी बेशुध्द असलेली पारडी रेडीस तपासुन 16: 00 वाजण्याच्या पुर्वी ती मयत असले्याचे घोषीत केले. चालकाने म्हशीची 22 पारडी यांची वाहतुक करण्यासाठी योग्य असलेबाबत वैदयकीय अधिकारी यांचेकडुन लेखी प्रमाणे पत्र न मिळविता घवुन जात चालला होता.
खात्री झाल्याने तसेच एक पारडी रेडी हिचा मृत्यु झाला.ते नंतर सदर गाडी व म्हशी पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेतले.
फिर्यादी–
भाउसाहेब शहाजी टेंगले, पोलीस अंमलदार , नेमणुक , शिरूर पोलीस स्टेशन.
आरोपी–
रविकांत पांडुरंग माने ,वय- 35 वर्षे ,राहणार, वडगाव रासाई ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे —-
1) 168,000/- रूपये किमतीच्या काळे रंगाची म्हशीची 21 पारडी (रेडी) प्रत्येकी किंमत – 8,000/- रूपये किंमत अंदाजे
2) 4,000/- रूपये किमतीच्या काळ्या रंगाच्या म्हशीचा 1 टोणगा (रेडा) प्रत्येकी किंमत – 4,000/रूपये किंमत अंदाजे ,
3) 5,00,000/- रूपये , मजदा कंपनीची (आयशर) चारचाकी गाडी तिचा आर-टी-ओ-नं ,MH-14 एम-1050 असा आहे.
एकूण किंमत- 6,72,000/रूपये इतकी आहे .
याप्रमाणे वरील वर्णनाची चार चाकी गाडी दोन पंचासमक्ष पोलिस हवालदार शिंदे यांनी जप्त केली. तसेच एका मयत पारडीला (रेडी) पुढील कार्यवाहीकरीता ताब्यात घेतले.
तारिख – 24/01/2024 रोजी दुपारी 14:15 वाजण्याचा सुमारास मांडवगण फराटा , तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत मांडवगण फराटा गावच्या चौकात मजदा कंपनीची (आयशर) चारचाकी गाडी नं ,म- ,च-14 ई-,म-1050 यामधुन …
वाहतुकी पुर्वी वैदयकीय तपासणी केली नव्हती !
1) रविकांत पांडुरंग माने, वय- 35 वर्षे ,राहणार – वडगाव रासाई, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे यांनी सदर चार चाकी गाडीमध्ये काळ्या रंगाच्या म्हशीचे 22 पारडी त्यामध्ये 21 पारडी (रेडी) व 1 टोनगा (रेडा) कु्रपणे कोबुन त्यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व्यवस्था केली नाही.
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
तसेच जनावरांची वाहतुकी पुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावराची वैदयकीय तपासणी केली नाही.त्यांना वाहतुकी करीता घेवुन चालले असताना एका पारडीच्या (रेडी) मृत्युस कारणीभुत झाला. म्हणून फिर्यादी रविकांत पांडुरंग माने , वय -35 वर्षे , राहणार- वडगाव रासाई , तालुका – शिरूर , जिल्हा -पुणे याच्याविरूद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद शिरुर पोलीस स्टेशन मधे केली
आहे.
प्राण्यांना क्रुरतेची वागणुक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल!
आरोपीवर शिरूर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर – 57/2025 आहे.तर प्राण्यांना क्रुरतेने वागवणुक न्यास प्रति-अधि-कायदा कलम 11(1) ग,ड,ज सह भारतीय न्याय संहिता कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार -पोलिस हवालदार श्री. उबाळे हे करत आहेत. पुढील तपास अंमलदार सहायक फौजेला श्री. कदम हे करत आहेत.पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंजळे ,शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.