
Contents
- 1 3 Vahanancha Bhishan Apghat:न्हावरा-केडगाव रोडवर घोडगंगा कारखान्याजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात.
3 Vahanancha Bhishan Apghat:न्हावरा-केडगाव रोडवर घोडगंगा कारखान्याजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात.
3 Vahanancha Bhishan Apghat:आयशर टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
शिरुर,दिनांक 6 ते 2025: (प्रकाश करडे यांच्याकडुन )
3 Vahanancha Bhishan Apghat:दिनांक 5 मे 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास न्हावरा ते केडगाव चौफुला रोडवर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या समोर तीन वाहनांचा भीषण अपघात घडला. यामध्ये एक एरटीगा कार (MH 12 LD 8771), एक क्रेयटा कार (MH 12 WE 1150) आणि आयशर टँकर (MH 43 DP 6652) सहभागी होते.
मागून भरधाव वेगात आला आयशर टँकर—
फिर्यादी मुरलीधर कृष्णाजी निंबाळकर (वय -65, राहणार- पारगाव, सालुमालु, तालुका- दौंड, जिल्हा – पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार त्यांच्या मागून भरधाव वेगात आयशर टँकर आला.त्यांच्या गाडीला मागुन जोरदार धडक दिली. त्यामुळे पुढे चाललेल्या क्रेयटा कारला देखील धक्का बसला.या अपघातात मोठे नुकसान झाले आहे.
मात्र जिवितहानी नाही—-
मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला आयशर टँकर चालक सचिन सदाशिव लोंढे (राहणार- चिंचोली, तालुका-म्हाडा, जिल्हा – सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 307/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, 324(4), मोटर वाहन कायदा करम 184 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार राजेंद्र बनकर हे करत असून पोलीस हवालदार वाडेकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…