
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
- 1.1 शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास !
- 1.1.1 शिरुर,दिनांक- 27 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
- 1.1.2 घटना- 1.
- 1.1.3 तिसर्या घटनेत गाडी लावण्यावरुन एकाचे तोंड फोडले !
- 1.1.4 दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.वारे हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी करत आहेत.पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. —— घटना -2
- 1.1.5 चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे आहे —-
- 1.1.6 About The Author
- 1.1 शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास !
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
शिरुर पोलिस करत आहेत पुढील तपास !
शिरुर,दिनांक- 27 डिसेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी पडला आहे तर दुसर्या एका घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला गेले आहे.या दोन्ही घटनांचा पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेच.
घटना- 1.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक ०६/१२/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास सादलगाव, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत संजय लक्ष्मण होळकर यांच्या शेतातील उसतोड हार्वेस्टर मशिन वरील चालकाने हार्वेस्टर मशिन हायगईने व अविचाराने भरधाव वेगात पाठीमागे चालवला.त्यानंतर फिर्यादी नंदा समाधान बावस्कर, वय- ४३ वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार- सादलगाव याने त्यांच्या पतीस धडक दिली. त्यांच्या पोटावरून चाक जावून गंभीर व किरकोळ दुखापत झाली. त्यांचे पती समाधन रंगनाथ बावस्कर,वय-४३ वर्षे यांचा मृत्यूस कारणीभूत झाला आहे. म्हणुन त्यांनी हार्वेस्टर एम.एच.१२ व्ही.सी.०९६० वरील चालक शुभम पाडुरंग ढवळे ,राहणार – तळईमळा, वडगाव रासाई, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे याच्या विरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.’शिरुर‘
आरोपी हा हार्वेस्टर एम.एच.१२ व्ही.सी. ०९६० वरील चालक शुभम पाडुरंग ढवळे, राहणार-तळईमळा, वडगाव रासाई, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे याच्या विरूद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ११०६(१),२८१,१२५ (अ), (ब) सह मो वा का क १८४ प्रमाणे शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या घटनेत गाडी लावण्यावरुन एकाचे तोंड फोडले !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की तारीख 13/12/2024 रोजी सायंकाळी 07:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रविण म्हातरभाउ सात्रस ,वय- 26 वर्षे, धंदा -शेती, राहणार- उरळगाव फाटा, जि.ओ पेट्रोलियम, उरळगाव, तालुका- शिरूर ,जिल्हा -पुणे
हे गावातील खिडकी चौक येथील श्रीगणेशा मंदीर येथे आरती साठी गेलो होते.त्यावेळी ते त्यांची स्विफ्ट कार नंबर.एम.एच.12. यु.जे.5790 ही मंदीराचे समोर रोड कडेला लावली.त्यावरुन कारणावरून आकाश चव्हाण,( पुर्ण नाव माहिती नाही) राहणार- उरळगाव, तालुका- शिरूर हा,” तु गाडी येथे का लावली आहे. तुझी गाडी बाजुला घे. तुला लय माज आला आहे काय? तु गाडी बाजुला का घेत नाहीस ” असे म्हणुन तो त्याच्या कडील किएटा कारमधुन खाली उतरला.नंतर त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली.” तुला व तुझी आई यांना मारून टाकील”, अशी धमकी देवून त्याने फिर्यादीच्या ओठावर उजव्या बाजुस त्याच्या उजवे हाताचा ठोसा जोरात मारला.
त्याच्या बोटामध्ये असलेली अंगठी जोरात फिर्यादीच्या ओठावर लागल्यामळे त्यांना जखम झाली आहे. त्यानंतर सायंकाळी 07:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी उरळगाव येथील भैरवनाथ मंदीराच्या पाठीमागे उभे राहून झालेला प्रकार हा त्यांच्या काका संतोष काका रात्रस यांना सांगत होते. परत आकाश चव्हाण तेथे येवून ,” झालेला प्रकार हा तु कोणाला फोनवरती सांगत आहेस” असे म्हणून त्याने फिर्यादीचा अँपल आय फोन 11 हा फोडला. त्याचे देखील नुकसान करून त्याचेकडील क्रीएटा कार (नंबर माहिती नाही ) मध्ये बसून तेथून निघून गेला आहे.
म्हणून फिर्यादी यांनी आकाश चव्हाण (पुर्ण नाव माहिती नाही ) राहणार- उरळगाव, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे याच्या विरूदध शिरुर पोलिस स्टेशन मधे
तक्रार दाखल केली आहे. आरोपी वर भारतीय न्याय संहिता कलम 118 (1),324(4),352,351(2),351(3) प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.उबाळे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार सहायक फौजदार श्री. बनकर करत आहेत.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.वारे हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी करत आहेत.पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
——
घटना -2
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक- 26/12/2024 रोजी रात्री 08: 00 ते दि-27/12/2024 रोजी सकाळी 05/30 वाजण्याच्या दरम्यान पिंपळसुटी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीतील फिर्यादी रामदास कोंडीबा कोळेकर, वय- 58 वर्षे, व्यवसाय-नोकरी ,राहणार – मलठण, तालुका – कर्जत, जिल्हा – अहमदनगर यांच्या ताब्यातील ,एस-टी- बस नंबर ,MH-14 बी-टी-0873 चे डिजेल व टाकीमधील 130 लिटर डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने चोरून नेले आहे.
म्हणुन त्यांनी त्या अज्ञात चोरट्याविरुध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद आहे.
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे आहे —-
1) 11,570/- रुपये किंमतीची डीझेल 130 लिटर प्रती लिटर 89 रूपये प्रमाणे किंमत- अंदाजे.
11,750/- रुपये किंमत. येणेप्रमाणे वरील वर्णनाचे डिझेल एन्ट्री नंबर- २८ वेळ -१४:५९
अज्ञात चोरट्याविरुद्ध
भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2)
प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार श्री. शिंदे करत आहेत.तर दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.उबाऴे हे आहेत.