
Contents
- 1 80 गोवंशांचे जीव वाचवले: शिरूर व ढवळगावच्या तरुणांची धाडसी कारवाई (पहा व्हिडिओसह…)
80 गोवंशांचे जीव वाचवले: शिरूर व ढवळगावच्या तरुणांची धाडसी कारवाई (पहा व्हिडिओसह…)
80 गोवंशांचे जीव वाचवले:श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील घटना!
शिरुर,दिनांक 5 मे 2025:(कल्पना पुंडे यांच्याकडुन )
80 गोवंशांचे जीव वाचवले:शिरूर आणि ढवळगाव येथील बजरंग दलाच्या तरुणांनी एकत्र येत मोठा जीव वाचवण्याचा पराक्रम केला आहे. अंदाजे 80 गोवंशांचे जीव वाचवले गेले असून, ही कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे रामबाबा मंदिराजवळ झाली.
बजरंग दलाच्या तरुणांनी पकडले 80 गोवंश ?—
एका पिकअप (MH 12 XX 0754) गाडीत गावरान व जरशी जातीच्या वासरांना तोंड चिकट पट्ट्यांनी घट्ट बांधून अवैधरीत्या कत्तलखान्यात नेले जात होते. ही शंका बाळगून शिरूर बजरंग दलाच्या तरुणांनी ढवळगावच्या तरुणांशी संपर्क साधून गाडीचा पाठलाग केला. शेकडो तरुणांनी जीवाची पर्वा न करता गाडी थांबवली, आणि अखेर गोवंशांना वाचवण्यात यश आले.
अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार, पोलिसांकडून पुढील चौकशी—-
कारवाईदरम्यान गाडीचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. ही संपूर्ण माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पथक पाठवले व क्षीरसागर साहेबांनी घटनास्थळी येऊन 80 गोवंश ताब्यात घेतले.
———
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…