
Contents
- 1 शिरूर दरोडा बातमी : दरोडेखोरांनी केला १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास!
- 1.1 शिरूर दरोडा घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ!
- 1.1.1 घटनेचा सविस्तर तपशील:
- 1.1.2 चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज—–
- 1.1.3 फिर्यादीचे विधान—-
- 1.1.4 गुन्ह्याची सविस्तर नोंद अशी आहे:
- 1.1.5 पोलिसांची कारवाई—-
- 1.1.6 गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण—-
- 1.1.7 अशा घटनांपासून बचावासाठी टिप्स—
- 1.1.8 पोलिसांकडून आवाहन—-
- 1.1.9 लेखाचा सारांश—–
- 1.1.10 सत्यशोधक च्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन••••
- 1.1.11 कारेगाव येथे शेततळ्यात दुर्दैवी अपघात: दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, दोन जखमी
- 1.1.12 About The Author
- 1.1 शिरूर दरोडा घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ!
शिरूर दरोडा बातमी : दरोडेखोरांनी केला १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास!
शिरूर दरोडा घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ!
दिनांक १२ ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी |
शिरूर दरोडा घटनेमधे तालुक्यातील शिरसगाव काटा येथे वृद्ध महिलेला मारहाण करून १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. शिरूर पोलिसांकडून तपास सुरू.
शिरूर दरोडा घटनेत दरोडेखोरांनी १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केलेला आहे.त्यामुळे शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात शिरसगाव काटा हे गाव आहे.येथे ही दरोड्याची घटना घडली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी एका शेतकऱ्याच्या घरातून तब्बल १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला आहे. ही ताजी घटना उघड झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
फिर्यादी श्री. अमोल अशोक कुंजीर ,वय -३१ वर्षे, व्यवसाय – शेती, राहणार -चव्हाणवाडी, शिरसगाव काटा यांनी ही माहिती दिली आहे. या दिलेल्या माहितीनुसार ही घटना १० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ ते ११ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १२.३० या वेळेत घडली.
अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून, घरातील वृद्ध आईला कशाने तरी तोंडावर व डोक्यात मारहाण केली. तिचा प्रतिकार थोपवला.तसेच घरातील सोन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले.
चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज—–
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी खालील ऐवज चोरला आहे:
1. दोन गंठण – वजन सुमारे २ तोळे – अंदाजे किंमत ₹८०,०००/-
2. कानातील फुले व वेल – वजन सुमारे १ तोळा – अंदाजे किंमत ₹४०,०००/-
3. मनी मंगळसूत्र – वजन सुमारे ५ ग्रॅम – अंदाजे किंमत ₹२०,०००/-
एकूण चोरलेला माल ₹१,४०,०००/- किंमतीचा आहे.
फिर्यादीचे विधान—-
श्री. कुंजीर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे –
“माझ्या आईवर हल्ला करून तिच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेले गेले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून, चोरट्यांनी लबाडीचा व हिंसात्मक मार्ग अवलंबून माझे व आमच्या कुटुंबाचे मोठे नुकसान केले आहे. अज्ञात आरोपींना तातडीने पकडून कारवाई करावी.”
गुन्ह्याची सविस्तर नोंद अशी आहे:
• गुन्हा क्र. – 587/2025
• कायदा कलम – भा.दं.सं. कलम 309(6), 305
• गुन्हा दाखल वेळ – 11 ऑगस्ट 2025, सायं. ६:४० वा.
• एंट्री नंबर – 49/2025
• दाखल अधिकारी – पोलीस उपनिरीक्षक चव्हाण
• तपास अधिकारी – पोलीस उपनिरीक्षक नकाते
पोलिसांची कारवाई—-
घटनेची माहिती मिळताक्षणी शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धेतली.तेथे घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज, संशयितांचा मागोवा, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या इसमांची चौकशी सुरू केली आहे.
शिरुर पोलिसांनी स्थानिक रहिवाशांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आले आहे. पोलिसांनी सांगितले की, हा गुन्हा गंभीर प्रकारचा असून आरोपींना लवकरच पकडले जाईल.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण—-
गावातील ही घटना ऐकल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ! रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे, खिडक्या नीट बंद ठेवणे, शेजाऱ्यांमध्ये संपर्क ठेवणे, तसेच संशयित हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळविणे, असा सल्ला शिरुर पोलिसांनी दिला आहे.
अशा घटनांपासून बचावासाठी टिप्स—
• आपल्या घरात CCTV बसवणे.
• रात्रीच्या वेळी अंगणातील दिवे सुरूठेवणे.
• मौल्यवान वस्तू सुरक्षित पेटीत व लॉकरमध्ये ठेवणी.
• शेजाऱ्यांशी सतत संपर्क ठेवणे.
• घराजवळील संशयास्पद हालचाली त्वरित नोंदवणे.
पोलिसांकडून आवाहन—-
शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेविषयी कुणाकडेही काही माहिती असल्यास किंवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास शिरूर पोलीस स्टेशनला संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
लेखाचा सारांश—–
शिरसगाव काटा येथे घडलेली ही घटना फक्त चोरी नाही.वृद्ध महिलेला मारहाण करून केलेला दरोडा आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना भेट द्या•••••
1. Maharashtra Police Official Website
3. Criminal Law in India – IPC Sections
4. Crime Prevention Tips – Maharashtra Police
सत्यशोधक च्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन••••
कारेगाव येथे शेततळ्यात दुर्दैवी अपघात: दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, दोन जखमी
शिरूर मधुन १९ वर्षीय तरुणी बेपत्ता – कुटुंबीयांची मदतीची विनंती !
1 thought on “शिरूर दरोडा : दरोडेखोरांनी केला १,४०,००० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास!”