
Contents
शिरूरमध्ये डॉक्टरला मारहाण – बाबुराव नगरात घटनेची नोंद !
शिरुरमधे डॉक्टरला मारहाण करणारा मेडिकल दुकान मालक ?
शिरूर ,दिनांक २१ ऑगस्ट 2025: |प्रतिनिधी |
शिरूरमध्ये डॉक्टरला मारहाण करत त्यांच्या रुग्णालयातच हल्ला; बाबुराव नगरातील घटनेत आरोपीवर मारहाणीचा गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू.
शहरातील बाबुराव नगर परिसरात एका डॉक्टरला मारहाणीची घटना घडली असून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आदिनाथ रामभाऊ शितोळे ,वय 30- वर्षे, धंदा डॉक्टर, राहणार- आशीर्वाद कॉम्प्लेक्स, बाबुराव नगर, मूळ राहणार- गेवराई, जि. बीड यांनी शिरूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या शितोळे क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये असताना आरोपी रवींद्र शिरसाठ (पूर्ण नाव माहिती नाही, राहणार. बाबुराव नगर, शिरूर) हा क्लिनिकमध्ये आला. त्याने फिर्यादी डॉक्टरांना “तू आमच्या मेडिकलमध्ये पेशंटला औषधे का पाठवत नाहीस” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
यानंतर आरोपीने हाताने व बुक्क्याने मारहाण केली. तसेच कमरेचा बेल्ट काढून फिर्यादीच्या हातावर व पाठीवर मारहाण केली. या मारहाणीमुळे डॉक्टरांना दुखापत झाली.असे डॉक्टर फिर्यादीने पोलिसात नमूद केले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा रजिस्टर क्रमांक – 603/2025 ; भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118(1), 115(2), 352, 351(2),(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. भगत करत आहेत. दाखल अधिकारी पोलिस हवालदार श्री. उबाळे हे आहेत.पोलिस निरिक्षक श्री.संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••
Maharashtra Police Official Website
Indian Penal Code – IPC Sections
‘सत्यशोधक’च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••
शिरूर : शिरसगाव काटा येथे घरफोडीची घटना – सोन्याचे दागिने चोरीला, 2.20 लाखांचा ऐवज लंपास!