
पती-पत्नीवर हल्ला ; गुन्हा दाखल
पती-पत्नीवर हल्ला झाल्याची घटना सविंदणे येथे!
शिरूर ,दिनांक १४ सप्टेंबर २०२५ |प्रतिनिधी |
” शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात कौटुंबिक वादातून महिलेला पती व एका महिलेकडून मारहाण. FIR नं. 648/2025 गुन्हा दाखल. पोलिस तपास सुरू.”
शिरूर तालुक्यातील नाथ नगर वस्ती, काळुबाई मंदिराजवळ, सविंदणे येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता घडली असून, फिर्यादी सौ. किशोरी विशाल लघे ,वय ३८, व्यवसाय – शेतमजुरी, रा. नाथ नगर वस्ती यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
गुन्ह्याची माहिती•••
गु.र.नं. : 648/2025
कलमे : BNS कलम 118(1), 117(2), 115(2), 351(2), 351(3), 52, 3(5)
फिर्यादी : सौ. किशोरी विशाल लंघे, वय ३८ वर्षे, शेतमजुरी, राहणार, सविंदणे,तालुका- शिरुर, जिल्हा- पुणे.
आरोपी :
1. विशाल उर्फ गणेश नामदेव लंघे
2. जया राजेंद्र पोखरकर
(दोन्ही रा. नाथ नगर वस्ती, काळुबाई मंदिराजवळ, सविंदणे)
घटनास्थळ : नाथ नगर वस्ती, काळुबाई मंदिराजवळ, सविंदणे, ता. शिरूर
घटना वेळ : १२/०९/२०२५, सकाळी अंदाजे १० वाजता
तक्रार नोंद तारीख : १४/०९/२०२५, वेळ १:५०
घटनेची हकिकत—
फिर्यादी सौ. किशोरी लघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी विशाखा हिला जयश्री उर्फ जया राजेंद्र पोखरकर (आरोपी क्र. २) हिने घरी बोलावले. फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचताच आरोपी जया व फिर्यादीचे पती विशाल उर्फ गणेश नामदेव लंघे (आरोपी क्र. १) उपस्थित होते.
त्यावेळी जयश्रीने फिर्यादीच्या मुलीला “आईला मारायचे आणि बैठक बसल्यावर ‘मी नाही मारले’ असे सांगायचे” असे सांगितले. त्याचवेळी जयश्रीने फिर्यादीच्या उजव्या हातावर व मनगटावर चावा घेतला. प्रतिकार करताच आरोपी विशालने लाकडी काठीने फिर्यादीच्या हातावर व डोक्यात वार करून दुखापत केली.
याशिवाय जयश्रीने फिर्यादीला पोटात व इतर ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच “हिला सोडचिट्ठी दे” असे आरोपी विशालला उद्देशून सांगितले.
जखमी झालेल्या फिर्यादीला शिरूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल, पुणे येथे रेफर करण्यात आले.
पोलिस कारवाई–
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये विशाल उर्फ गणेश नामदेव लंघे व जया राजेंद्र पोखरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार : पो. हवा. कोथळकर
तपास अंमलदार : पो. हवा. /1898 उबाळे विशाल
निष्कर्ष—–
कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
2. महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
सत्यशोधक च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••
रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरात मारहाणीचा प्रकार : नोकरी करणाऱ्या युवकावर सहा जणांचा हल्ला
Breaking News Bangladeshi In MIDC: चक्क ४ बांगलादेशी नागरिक रांजणगाव MIDC !
शिरूरमध्ये ३.५६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त – एकाला अटक