सांभाळायला दिलेला 3 वर्षाच्या मुलाचे अपहरण !
पण रांजणगाव MIDC पोलिसांनी कारवाई, पंजाब मधून मुलाची केली सुखरूप सुटका !
दिनांक १७ सप्टेंबर २०२५ | प्रतिनिधी |
” रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कामगिरी! तिन्ही वर्षांच्या मुलाचे अपहरण करून पंजाबमध्ये नेण्यात आले होते. पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.”
रांजणगाव MIDC पोलिसांनी औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या महीलेच्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून पंजाबमध्ये घेऊन गेलेल्या दोन परप्रांतीय व्यक्तींना,जोडप्याला रांजणगाव MIDC पोलिसांनी पंजाब मधून अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली आहे.या घटनेने शिरुर व रांजणगाव MIDC परिसरात एकच खळबळ उडाली आहे.’आम्हाला मुलबाळ नाही,या मुलाचा आम्हाला लळा लागला होता.त्यामुळे भावनेच्या भरात आम्ही हे कृत्य केले’ असे या बिहारी जोडप्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार काजल महेंद्र पडघान या महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलगा आयुष यासह रांजणगाव MIDC परिसरात राहतात. १५ सप्टेंबर रोजी सकाळी काजल पडघान कामावर गेल्या. मुलगा आयुष याला ते सांभाळण्यासाठी शेजारी राहणार्या जोडप्याकडे ठेवत असत.पण हा मुलगा व जोडपे रोजच्याप्रमाणे दिसले नाही.मुलगाही दिसेना.त्यांची पाचावर धारण बसली.नंतर स्थानिक पातळीवर शोध घेतल्यानंतर देखील मुलाचा माग काढता आला नाही. मुलगा सापडत नसल्यामुळे काजल यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्या तक्रारीच्या आधारे रांजणगाव MIDC पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान शेजारी राहणारे जुगलकिशोर उर्फ अंजुम यादव व त्यांची पत्नी सुमन यादव यांच्यावर अर्थातच संशय घेण्यात आला.
तेव्हा हे जोडपे आढळून आले नाही.रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे हे जोडपे पंजाब मधे असल्याचे पोलिसांना समजले.तत्काळ पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या देखरेखीखाली तत्काळ पंजाब गाठले.पंजाब राज्य पोलिसांनाही या तपासात घेतले.खात्री केली.आरोपींना कानोकान खबर न लागेल अशा पद्धतीने सापळा रचला. या जोडप्याला ताब्यात घेतले.
रांजणगाव MIDC पोलिसांच्या या पथकाने पंजाब राज्यातील लुधियाना येथे रवाना होवुन ही कारवाई पार पाडली.तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरू केलेल्या शोध मोहिमेत अखेर अपहरण करणारे दोन्ही आरोपी— जुगलकिशोर उर्फ अंजुम यादव (३७ वर्षे) व त्यांची पत्नी सुमन यादव (वय ३६) — यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून लहान मुलगा आयुष याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
१७ सप्टेंबर रोजी पहाटे आरोपींना अटक करून रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. मुलाची आई काजल यांना पोलिसांनी मुलगा परत दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या कारवाईबद्दल स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक मा. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. उमेश कुत्तळ, विजय सरजिने, संकेत जाधव आदींसह लुधियाना पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
1. महाराष्ट्र पोलिसांची अधिकृत वेबसाइट
🔗 https://www.mahapolice.gov.in
2. पुणे ग्रामीण पोलिस – अधिकृत ट्विटर (X) हँडल
🔗 https://twitter.com/puneruralpolice
3. गुन्हे व कायदे विषयक माहिती (Bharatiya Nyay Sanhita / IPC)
🔗 https://indiacode.nic.in
4. अपहरणविरोधी व बालक संरक्षण माहिती – National Crime Records Bureau (NCRB)
🔗 https://ncrb.gov.in
5. Childline India (1098) – बालक संरक्षण सेवा
🔗 https://childlineindia.org
सत्यशोधक च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन ••••••
शिरूरमध्ये डॉक्टरला मारहाण – बाबुराव नगरात घटनेची नोंद !
दलित मुली, ‘कोथरूड प्रकरण’, पोलिसांची वर्तणूक आणि आजची स्थिती — एक संपादकीय
