Contents 1. सरदवाडीचे उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे सरांना मानद ‘डॉक्टरेट’ पदवी1.1. सरदवाडीचे उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे झाले डॉक्टर!1.2. 👉 गौरव करणारे मान्यवर —-1.2.1. About The Author1.2.1.1. Dr.Nitin Pawarसरदवाडीचे उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे सरांना मानद ‘डॉक्टरेट’ पदवीसरदवाडीचे उपक्रमशील शिक्षक संदीप किसनराव सरोदे झाले डॉक्टर!शिरूर,दिनांक १ ऑक्टोबर २०२५ |प्रतिनिधी |शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उपक्रमशीलतेसाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या सरदवाडी (ता. शिरूर) येथील शिक्षक श्री. संदीप किसनराव सरोदे सर यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहुमानाने देऊन गौरविण्यात आले आहे. दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना ही मानद पदवी बहाल करण्यात आली.शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सरोदे सरांचा हा सत्कार होत असून त्यांच्या या यशाने संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढला आहे. अनेक वर्षांपासून ते अध्यापन क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्य, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या पुढाकाराने शाळेत विविध नवोन्मेषी प्रयोग राबवले गेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, गुणात्मक प्रगती साधणे, शैक्षणिक सोबतच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक जाणीवा जागृत करणे या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.सरदवाडी विद्यालयातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले असून, शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना दिली गेली आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे सरदवाडी विद्यालयाने शैक्षणिक व सामाजिक कार्याचा उत्तम ठसा उमटविला आहे.मानद डॉक्टरेट बहाल होताच सरोदे सरांनी सांगितले की,”माझ्या या छोट्याशा कार्याला दिलेला हा मान म्हणजे माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. माझ्या शिक्षक व सहकाऱ्यांचे, तसेच विद्यार्थ्यांचे हे यश आहे. या सन्मानामुळे आणखी जबाबदारी वाढली असून समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.”या विशेष गौरवाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सरैदे सरांचे अभिनंदन केले आहे.👉 गौरव करणारे मान्यवर —-शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, ग्रामस्थ, सरपंच व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला.श्रीराम संपतराव शेलार उपसरपंच करंजावणे,सुनिता श्रीकांत देशपांडे उर्फ काळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शीला सुभाष इचके शिक्षिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका,प्रतिभा दत्तात्रय आबुज मुख्याध्यापिका करडेलवाडी प्राथमिक शाळा,छाया घावटे उर्फ पवार सुपा अहिल्यानगर, रामचंद्र व्यवहारे पोलीस पाटील निमगाव भोगी,कांतीलाल निरवणे, ग्रामपंचायत सदस्य शरद वाडी,सुनिता सरोदे, शिक्षिका डेक्कन एज्युकेशन सोसायटीAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनसिग्मंड फ्रायड ने स्त्रीच्या पुरुषाबाबतच्या वर्तनाबद्दल काय सांगितले आहे? शिरूर नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभागनिहाय आरक्षण जाहीर!