Contents
📰 शिरूरमध्ये जातीवाचक शिवीगाळ,धमकी,व मारहाण प्रकरणी पाच आरोपींवर ‘अट्रासिटी’चा गुन्हा दाखल?
पुणे, २५ ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी – सत्यशोधक न्यूज
” शिरूर तालुक्यातील सादलगाव येथे ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या पत्नी यांना जातीवाचक अपशब्द,मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी पाच आरोपींवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रकरणाचा तपास निरीक्षक संदेश केंजळे करत होते.आता डी वाया एस पी श्री.प्रशांत ढोले हे करत आहेत.त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.”
शिरूर तालुक्यातील सादलगाव येथे एक ज्येष्ठ नागरिक व त्यांची पत्नी यांना जातीवाचक शिवीगाळी धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 घटनेचा तपशील
शिरूर पोलिस ठाणे गु.र.नं. 610/2025 नुसार, फिर्यादी रामदास गणपत अडसुळ (वय 70) यांनी तक्रार दाखल केली आहे. घटना दिनांक १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सादलगाव येथे घडली.गावात नव्या सरपंचाने एक चांगला पायंडा घातल्याने त्याची प्रशंसा करणारा संदेश What’s app ग्रुप वर फिर्यादी रामदास अडसुळ यांनी टाकला.तो असा होता की 15 ऑगस्ट २०२५ या स्वातंत्र्यदिनी नव्या सरपंचांनी झेंडावंदनाचा मान एका ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांला दिला. ते जुन्या सरपंच अविनाश अशोक यांना सहन झाला नाही.मनात तो राग धरुन आठवडाभराने त्याने फिर्यादीला फोन करुन धमकावले.ही धमकावण्याची घटना 23 ऑक्टोबर 2025 ला घडली.
आरोपी —
1️⃣ अविनाश अशोक पवार
2️⃣ प्रकाश दादा पवार
3️⃣ भैय्या हनुमंत पवार
4️⃣ लाल्या पवार
5️⃣ धुल्या पवार
(सर्व रा. सादलगाव, ता. शिरूर, जि. पुणे),यांतील बहुतेक तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या घरात आहेत.फिर्यादी ७० वर्ष व त्यांची पत्नी वत्सलाबाई या ६३ वर्ष वयाच्या आहेत. या पाच जणांनी फिर्यादीला जातीवाचक अपशब्द वापरून धमकावले, मारहाण केली.
🔹 फिर्यादीचं म्हणणं
फिर्यादींच्या निवेदनानुसार,त्यांना आरोपींनी स्वतःच्या मोबाइल फोनवरुन २३ ऑगस्ट (सकाळी ९.१७ वा.) ला फोनवर सांगितलं की पुन्हा असे मेसेज पाठवलेस तर तुला महागात पडेल’ .म्हणून त्यांच्या पत्नी वत्सलाबाई रामदास अडसुळ त्यांना असे का बोललात? म्हणुन विचारण्यास गेल्या.त्यावेळी आरोपींनी त्यांना जातीवाचक अपशब्द,अपमान व मारहाण केली.
🔹 कायद्याअंतर्गत कलमे
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील खालील कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे —
115(2), 351(2)(3), 352, 189(2), 191(2)
तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कलमं 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) लागू करण्यात आली आहेत.
या कलमांखाली दोषी आढळल्यास कठोर शिक्षा होऊ शकते.
🔹 तपास आणि पुढील कारवाई
या गुन्ह्याचा तपास आधी पोलिस निरीक्षक संदीश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.फिर्यादीकडून मिळालेली माहिती व पुरावे तपासात समाविष्ट करण्यात आले.शिरूर पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित आरोपींना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.ताज्या माहिती प्रमाणे शिरूर पोलिसांकडुन हे प्रकरण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत असल्याने ते डी वाय एस पी,पुणे यांच्याकडे गेले आहे.मात्र फिर्यादीने ‘सत्यशोधक ‘कडे असे सांगितले की एकूण 5 आरोपींपैकी दोघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला.असे समजते. इतर ‘मोठे लोक'(?) असल्याने त्यांना वगळण्यात आले आहे.या कामात वरिष्ठ पोलीस अधिकारी व हा ‘मोठा ‘पुढारी अर्थात अविनाश अशोक पवार यांच्यात, ‘साटेलोटे’ झाले आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या घटनेत दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.१७ च्या आसपास रामदास अडसुळ यांना फोन आल्यानंतर ते घाबरले.त्यांचा बी पी वाढला.म्हणुन त्यांच्या पत्नी वत्सलाबाई रामदास अडसुळ,वय-६३ वर्षे या संबंधीत व्यक्तीकडे काय झाले म्हणुन विचारण्यासाठी गेल्यावर तेथे लोक जमले.आरोपींनी त्यांना शिवीगाळी, धमकी व मारहाणही केली.त्या घरी परत आल्या.त्यांनी ११२ नंबरवर पोलीस मदतीसाठी फोन केला.पोलीस आले.दवाखान्यात तपासणी व उपचारही झाले.ती तारिख २४ ऑगस्ट २०२५ होती.मात्र याच दिवशी आरोपींनी त्यांनाच मारहाण,विनयभंग व दागिने गहाळ करण्याचा आरोप फिर्यादी व त्यांचा मुलगा व सुन यांच्यावर केला.तशी तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली.मात्र या दिवशी आरोपी दवाखान्यात उपचार घेत होते.त्यांचा मुलगा दुरगावी होता.
या घटनेला दोन अडीज महिने झाले आहेत.दरम्यान च्या कालावधीत (२४ ऑगस्ट २०२५) रोजी तुम्ही केस मागे घ्या.तुमची माफी मागतो.असेही आरोपींने फिर्यादीला सांगितले होते.तरी फिर्यादीस न्याय हवा आहे. पाचही आरोपीवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कारवाई व्हावी.सध्या आरोपीकडील लोक फिर्यादीकडे व त्याच्या घराकडे रागाने पहात घरासमोरुन जातात.त्यामुळे ते सतत भितीच्या छायेत वावरत आहेत.
🔹 परिसरात प्रतिक्रिया
सादलगाव परिसरात या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संघटनांनी घटनेचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात दलित अत्याचार विरोधी मंच व मानवाधिकार समिती यांनी शिरूर पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे.
🔹 संदर्भ व पार्श्वभूमी
अलीकडे ग्रामीण भागात जातीवाचक गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद सांख्यिकी (NCRB) अहवालातून दिसते.पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि वेळेवर आरोपपत्र दाखल करण्याची गरज आहे.
अधिक माहितीसाठी बाह्य दुवे :
- https://ncrb.gov.in – राष्ट्रीय गुन्हे नोंद सांख्यिकी मंडळ
- https://indiacode.nic.in – अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम
- https://satyashodhak.blog – सत्यशोधक न्यूजवरील समाजन्याय लेख
🔹 निष्कर्ष
शिरूरमधील ही घटना केवळ एका कुटुंबाचा अपमान व मारहाण नाही, तर सामाजिक समतेच्या मूल्यांवर आघात आहे.पोलिसांनी जलदगतीने तपास पूर्ण करून न्याय मिळवून देणे हीच लोकांची मागणी आहे.
