Contents 1. शिरूरमध्ये दारूसह एक इसम ताब्यात; पोलिसांची कारवाई2. Read more >>>>>2.0.1. About The Author2.0.1.1. Dr.Nitin Pawarशिरूरमध्ये दारूसह एक इसम ताब्यात; पोलिसांची कारवाईशिरूर,दिनांक 7 डिसेंबर 2025 | प्रतिनिधी|” शिरूर पोलिसांनी सरदवाडी परिसरात धडक कारवाई करत बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या 57 वर्षीय इसमाला ताब्यात घेतले. टॅगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या 11 सीलबंद बाटल्या असा एकूण 440 रुपयांचा दारू माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(E) नुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.शिरूर शहरातील बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या सततच्या कारवाईचाच हा एक भाग आहे.”शिरूर पोलिसांनी सरदवाडी परिसरात केलेल्या कारवाईत बिगर परवानाधारक देशी दारू विक्री करणाऱ्या 57 वर्षीय इसमाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी (6 डिसेंबर 2025) दुपारी करण्यात आली.पोलिस अंमलदार रविंद्र तात्याबा काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मौजे सरदवाडी येथे पुणे–शिरूर रोडलगत असलेल्या हॉटेल रायगडच्या समोरील चायनीज हॉटेलच्या आडोशात आरोपी विष्णु आप्पा लष्करे (वय 57, रा. सरदवाडी) देशी दारूची बेकायदेशीर विक्री करताना आढळून आला.कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण 440 रुपयांच्या किंमतीच्या टॅगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या 11 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. हा माल आरोपीकडे बिगर परवाना आढळून आला.या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) अंतर्गत गुन्हा क्रमांक 871/2025 नोंदवला असून पुढील तपास पो.हवा. कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दाखल अमलदार म्हणून पो.हवा. शिंदे यांनी नोंद केली. प्रकरणाची जबाबदारी प्रभारी अधिकारी पो.नि. संदेश केंजळे यांच्याकडे आहे.Read more >>>>>गोडसेमळा, चांडोह येथे कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण – शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलशिरुर नगरपालिका निवडणूक 2025 : उपजिल्हा रुग्णालय का होत नाही?Breaking News: शिरूर पोलिस ठाण्याची मोठी कारवाई — विदेशी दारूचा साठा जप्तAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन‘घुंगरू’ वाजणार ! इशक्याचा नाद खुळा “: शिरुर पंचक्रोशीत 24 डिसेंबर पासुन शूटिंग! शिरूरमध्ये टेक्समो 10 HP इलेक्ट्रिक मोटार चोरी : अज्ञात चोरट्याचा शोध सुरू