PM Vishwakarma Yojana 2026 Maharashtra: कारागीर आणि पारंपरिक व्यवसायिकांसाठी केंद्र सरकारची योजनाPM Vishwakarma Yojana 2026 अंतर्गत पारंपरिक कारागीर आणि हस्तकला व्यवसायिकांना प्रशिक्षण, कर्ज आणि आर्थिक सहाय्य दिले जाते.

PM Vishwakarma Yojana 2026 नुसार ₹3 लाख रुपयांचे कर्ज, प्रशिक्षण, टूलकिट, अनुदान इ. ची संपूर्ण माहिती या लेखात सत्यशोधक ब्लॉग/न्यूज चा प्रयत्न आहे.

19 जुन 2026

Contents

PM Vishwakarma Yojana 2026 बाबत ‘सत्यशोधक’ ची भुमिका—

Satyashodhak News Blog शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी, दलित, आदिवासी, बहुजन व सर्व जात, धर्म, वर्गातील वन्चित, गरजु व पीडीतासाठी शासकीय, वैचारिक, नवीन तन्रे, सामाजिक, आर्थिक व अगदी मनोरंजन, क्रिकेट, चित्रपट अशा सर्व अन्गानी प्रयत्न करण्याचा ध्यास घेतो.

आमचे कर्तव्य काय आहे?

हे आम्ही समाज व सरकारला आवर्जून सांगतो.देशाच्या अर्थपुर्ण व सर्वान्गिन प्रगती व महासत्ता बनण्याच्या निश्चयाशी निष्ठा ठेवतो. लेखन व आधुनिक साधने न्यूज साईट, ब्लॉग, यु ट्यूब, AI इ. चा वापर करुन हे काम करण्याचा आमच्या मतेनुसार प्रयत्न करतो आहोत. आम्हाला पद, पैसा, प्रतिष्ठा, पुरस्कार कशाचीही अपेक्षा नाही.

PM Vishwakarma Yojana 2026 जनतेच्या पैशातुनच!

साधनान्ची कमतरता पडली तर समविचारी कार्यकर्त्यांना मदतही मागतो. आधुनिक युगात साधनान्ची आवश्यकता असतेच. याच भुमिकेतील एक भाग म्हणून कायदेशीर व विकासासाठी असतार्या योजना विशेषतः विद्यार्थ्यांच्या उपयोगाच्या, कष्टकरी जनतेसाठी असणार्या योजना ज्या त्यांच्याच कररुपी पैशातून त्यांच्यासाठी चालवल्या जाणार्या योजना व शिष्यवृत्ती इ. ची माहिती आम्ही देणार आहोत. याची वाचकानी नोंद घ्यावी.

📌 PM Vishwakarma Yojana 2026 म्हणजे काय?

PM Vishwakarma Yojana 2026 ही भारत सरकारची पारंपरिक कारागीर व हातमाग कामगारांसाठी विशेष योजना आहे.PM अर्थात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे. मी स्वतः या योजनेचा लाभ घेतला आहे.

सुतार, लोहार, कुंभार, सोनार, नाभिक, शिंपी, मातीशिल्पकार यांसारख्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना आर्थिक व कौशल्य विकास सहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

तुम्हाला अधिक अधिकृत माहिती खालील संकेतस्थळावर मिळेल:
👉 https://pmvishwakarma.gov.in


🎯 PM Vishwakarma Yojana 2026 चे उद्दिष्ट

  • पारंपरिक कारागिरांचे सक्षमीकरण करणे. पारम्पारिक उत्पादन पद्धती नाकारता येणार नाही. त्याला अधिक आधुनिक स्वरुप देता येईल. असे आम्ही मानतो.
  • कौशल्य विकास प्रशिक्षण या योजनेमधे दिले जाते. ते कौशल्य फक्त कागदावर घेऊ नका. कारण ते स्वतः स्वाभिमानाने उत्पन्न मिळवण्याचे साधन आहे.
  • सुलभ कर्ज सुविधा या योजनेद्वारे दिली जाते.
  • डिजिटल व्यवहाराल प्रोत्साहन देऊन अधिक क्षमतेने जास्त निर्मिती करता येईल.

💰 PM Vishwakarma Yojana 2026 अंतर्गत लाभ

🟢 1️⃣ कर्ज सुविधा

  • पहिला टप्पा: ₹1 लाख (5% व्याजदर) कर्ज लाभार्थीला दिले जाते.
  • दुसरा टप्पा: ₹2 लाख पर्यंत कर्ज सूविआ दिली जाते.

🟢 2️⃣ टूलकिट अनुदान

  • ₹15,000 पर्यंत टूलकिट सहाय्य म्हणजे आपण घेतलेल्या कामासाठी आवश्यक यन्त्र सामग्री या योजनेद्वारे दिली जाते.

🟢 3️⃣ प्रशिक्षण भत्ता

  • प्रशिक्षण काळात दररोज ₹500 भत्ता प्रशिक्षणार्थीला दिला जातो.

👥 पात्रता निकष

• अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
• त्याचा पारंपरिक कारागिरी व्यवसाय असावा.
•  तो स्वयंरोजगार निर्मिती करणारा व्यवसाय असावा.
• एक कुटुंबातील एक सदस्य या योजनेला पात्र राहिल.


📄 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते तपशील
  • व्यवसाय प्रमाणपत्र (लागू असल्यास)

🖥 PM Vishwakarma Yojana 2026 Online Application Process

🔹 Step-by-Step अर्ज प्रक्रिया

1️⃣ https://pmvishwakarma.gov.in वर जा
2️⃣ “Apply Online” निवडा
3️⃣ आधार OTP पडताळणी करा.
4️⃣ व्यवसाय माहिती भरा
5️⃣ अर्ज सबमिट करा


📋 कोणते व्यवसाय पात्र?

पारम्पारीक —

  • सुतार काम
  • लोहार काम
  • कुंभार काम
  • शिंपी काम
  • नाभिक काम
  • सोनार काम
  • मातीशिल्पकार काम
  • बूट बनवणारे कौशल्य

(अधिकृत यादी संकेतस्थळावर उपलब्ध)


🏦 कर्ज प्रक्रिया कशी चालते?

  • अर्ज मंजूर झाल्यावर बँकेमार्फत कर्ज मिळते.
  • 5% व्याजदर
  • डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन

📞 हेल्पलाईन

  • PM Vishwakarma Helpline: 1800-267-7777

📊 PM Vishwakarma Yojana 2026 सारांश

घटक माहिती
कर्ज ₹3 लाख पर्यंत
व्याजदर 5%
टूलकिट ₹15,000
प्रशिक्षण भत्ता ₹500 प्रतिदिन

⚠️ सामान्य चुका

❌ चुकीचा व्यवसाय निवडणे
❌ आधार कार्ड नंबर mismatch होणे.
❌ बँक खाते लिंक नसणे


📌 महत्वाच्या सूचना

  • एक कुटुंबातील एकच सदस्य पात्र आहे.
  • डिजिटल व्यवहार आवश्यक
  • प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.

गरीबी, बेरोजगारी, विषम साम्पत्तिक स्थिती आणि कष्टकर्याला त्याच्या स्रमाचा योग्य बोबदला न देऊन त्याचे आर्थिक शोषण हे प्राचीन काळापासून होत असलेले एक दृष्टचक्र आहे. परंतु देशाने लोकशाही व्यवस्थेचा स्विकार केल्यावर शोषण हा गुन्हा ठरतो. रोजगार हा हक्क ठरतो. म्हणून कष्ट करणार्या वर्गाने आपले हक्क व कर्तव्य याबाबत जागरुक असणे आवश्यक असते. अन्यथा तो फसवला जातो. नागवला जातो.

” अर्थात योग्य शिक्षण हेच व्यापक परिवर्तनाचे साधन आहे. ही बाब कायम लक्षात ठेवली पाहिजे “

❓ FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1. PM Vishwakarma Yojana 2026 अंतर्गत किती कर्ज मिळते?

👉 ₹3 लाखांपर्यंत.

Q2. टूलकिट अनुदान किती मिळते ?

👉 ₹15,000.

Q3. अर्ज कुठे करावा?

👉 https://pmvishwakarma.gov.in

आणखीन काही योजना पुढील लिंकवर क्लिक करुन मिळेल—

शासन योजना म्हणजे काय? | महाराष्ट्रातील योजना व फायदे (Complete Guide 2026)

Ladki Bahin Yojana Maharashtra 2026: लाडकी बहीण योजना : ₹1500 दरमहा मिळणार |

Maharashtra Scheme 2026: मागेल त्याला शेततळे योजना!

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

You missed