क्रिकेटमधील वादातून मांडवगण फराटा येथे गोळीबार; शिरूरमध्ये खळबळ
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेच्या वादातून धक्कादायक गोळीबाराची घटना घडली आहे. Shirur Crime Breaking अंतर्गत समोर आलेल्या या प्रकरणात पिस्तुलातून फायरिंग करत जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Contents
Shirur Crime : Breaking Firing News:
पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेच्या वादातून ही गंभीर घटना घडली. यात पिस्तुलातून फायरिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील फिर्यादी मिथुन उर्फ अमोल आनंदा चैगुले (वय 31, रा. मांडवगण फराटा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ क्रिकेट ग्राउंड येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या बॅनरवर फोटो न लावण्याच्या कारणावरून सुत्रधार शिंदे यांच्याशी आधीच वाद झाला होता.
हा वाद मिटवण्यासाठी योगेश मचाले व मिनीनाथ गव्हाणे यांच्या सांगण्यावरून फिर्यादी आपल्या मित्रांसह मैदानावर गेले. तेथे उपस्थित अक्षय पाटील व पप्पु कड यांनी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान पप्पु कड याने आपल्या जवळील पिस्तुलातून फिर्यादीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फायरिंगनंतर फिर्यादी व त्यांचे मित्र मैदानावरून पळून जात होते.सुत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, दिगंबर शेंडकर व इतर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुत्रधार शिंदे, पप्पु कड, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, मिनीनाथ गव्हाणे, दिगंबर शेंडकर तसेच इतर अज्ञात आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. व आर्म्स अॅक्ट अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
ओरोपीवर दाखल कलम:
शिरुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर-235/2026, भारतीय न्याय संहिता कायदा कलम 109,189(2),191(2),352,351,(2)(3)सह आर्म अँक्ट 3,25,27 मुं पो अधि.135.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Read more Shirur Crime :
Shirur Crime News : शिरूरमधील गुन्हेगारीच्या ताज्या बातम्या | Satyashodhak News
Shirur Crime News: धोकादायक गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई, अकोला कारागृहात स्थानबद्ध
Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई
