Advertisement Pune Nagar Highway Robbery करणार्यांना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्यात राजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले आहे.पुढे वाचा सविस्तर बातमी… रांजणगाव, प्रतिनिधी, 1 जुलै 2026 Contents1 Pune Nagar Highway Robbery-एक घटना2 Pune Nagar Highway Robbery : नेमकी घटना काय?3 मुख्य आरोपी गजाआड:साथीदार अद्याप फरार4 या पथकाने केली कामगिरी5 FAQs : वारन्वार विचारले जाणारे प्रश्न—5.1 1. Robbery (दरोडा) म्हणजे काय?5.2 2. Robbery आणि Theft (चोरी) मध्ये काय फरक आहे?5.3 3. Robbery केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते?5.4 4. Robbery प्रकरणात FIR कोण दाखल करू शकतो?5.5 5. Robbery प्रकरणातील पीडित व्यक्तीचे काय अधिकार आहेत?6 👉आणखीन खास,’शिरुर क्राईम’वाचा —7 👉आणखीन माहितीसाठी व अधिक बातम्या—.8 mahapolice.gov.in8.1 👉Shirur Crime News :8.2 About The Author8.2.1 Dr.Nitin Pawar8.3 ❤️ Support Satyashodhak Blog Pune Nagar Highway Robbery-एक घटना पुणे-नगर महामार्गावर ढोक सांगवी गावाच्या हद्दीत आयशर ट्रक चालकाला दुचाकी आडवी लावून धमकावत सोन्याची चैन आणि रोकड जबरीने चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. Pune Nagar Highway Robbery : नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार दिनाक 27 जून 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निखील प्रविण सोनवणे,राहणार- मोशी, पुणे, मूळ राहणार- बाभळगांव, जिल्हा-बीड हे आपल्या आयशर ट्रकमध्ये निगडी येथून लोखंडी पाईप भरून बाभळगावच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत क्लिनर विकास गोरे आणि सुनिल सुर्यवंशी हे देखील होते. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक पुणे-नगर रोडने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ढोक सांगवी गावाच्या जवळ आला होता. पाठीमागून आलेल्या एका अज्ञात दुचाकीवरील दोन इसमांनी ट्रकसमोर आपली दुचाकी आडवी लावली. ट्रक थांबवला. त्यानंतर ट्रकच्या क्लिनर साईडच्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला.फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील रोकड असा एकूण ३५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेला शोध, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी,शिरूर उपविभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे व त्यांच्या तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी घटनास्थळाच्या व परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी केली. यादरम्यान गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना ठोस माहिती मिळाली. ती अशी की सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी बाळासो काळे,वय-21 वर्षे, राहणार- कारेगांव, तालुका,शिरूर, जिल्हा-पुणे याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. मुख्य आरोपी गजाआड:साथीदार अद्याप फरार माहिती मिळताच तपास पथकाने कारेगाव परिसरात सापळा रचला. मुख्य आरोपी विकास उर्फ विकी काळे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. त्याने आपले साथीदार अक्षय उर्फ सोन्या बाळासाहेब जगताप (वय-24 ) आणि सिद्धार्थ उर्फ सिद्धू मच्छिंद्र गायकवाड (वय 20, दोघे राहणार-कारेगांव) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. Pune Nagar Highway Robbery घटनेतील मुख्य आरोपी विकास काळे याला 29 जून 2026 रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 2 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील त्याचे इतर दोन साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या पथकाने केली कामगिरी सदरची धडकेबाज कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगावचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सपोनि सागर घोरपडे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल भगत, जनार्दन शेळके, अमोल चव्हाण, विजय शिंदे, उमेश कुतळ आणि मंगेश थिटे यांच्या पथकाने केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे. Advertisement : दर आठवड्याला पहा तृप्ती फिल्म्स प्रोडक्शनचा भन्नाट एपिसोड FAQs : वारन्वार विचारले जाणारे प्रश्न— 1. Robbery (दरोडा) म्हणजे काय? Robbery म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून हिंसा, धमकी किंवा बळाचा वापर करून मालमत्ता बेकायदेशीरपणे हिसकावून घेणे. भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत हा गंभीर गुन्हा मानला जातो. 2. Robbery आणि Theft (चोरी) मध्ये काय फरक आहे? चोरीमध्ये (Theft) मालमत्ता गुपचूप चोरली जाते, तर Robbery मध्ये मारहाण, हिंसा किंवा जीविताला धोका निर्माण करून मालमत्ता हिसकावली जाते. 3. Robbery केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 नुसार दरोडा हा गंभीर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा असू शकतो. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कठोर कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 4. Robbery प्रकरणात FIR कोण दाखल करू शकतो? पीडित व्यक्ती, तिचे नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी किंवा गुन्ह्याची माहिती असलेली कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यात FIR दाखल करू शकते. 5. Robbery प्रकरणातील पीडित व्यक्तीचे काय अधिकार आहेत? पीडित व्यक्तीला FIR ची प्रत मोफत मिळण्याचा, निष्पक्ष तपासाचा, न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्याचा तसेच लागू असल्यास नुकसानभरपाई व कायदेशीर मदत मिळविण्याचा अधिकार आहे. 👉आणखीन खास,’शिरुर क्राईम’वाचा — Shirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाई Shirur Crime News Gharfodi: शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी! 👉आणखीन माहितीसाठी व अधिक बातम्या—. mahapolice.gov.in 👉महाराष्ट्र पोलीस विभागाची अधिकृत माहिती. puneruralpolice.gov.in 👉पुणे ग्रामीण पोलीस विभागाची अधिकृत माहिती व नागरिक सेवा. 112.gov.in 👉आपत्कालीन मदतीसाठी राष्ट्रीय 112 सेवा. ncrb.gov.in 👉गुन्हेगारीविषयक अधिकृत आकडेवारी व अहवाल. mha.gov.in 👉गृह मंत्रालयाची अधिकृत माहिती. 👉Shirur Crime News : https://www.satyashodhak.blog/mr/shirur-crime-news/ 👉Shirur Crime News Gharfodi : https://www.satyashodhak.blog/mr/shirur-crime-news-gharfodi/ 👉Shirur Crime News Gavathi Daru : https://www.satyashodhak.blog/mr/shirur-crime-news-gavathi-daru/ जाहिरात दरपत्रक About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Missing Woman Case : मोराची चिंचोली येथील 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता; शिरूर पोलिसांकडून शोध सुरू