Mahar Matang Sambandh सविंदणे गावातील दोन मातंग भावांच्या शौर्याची लोककथासविंदणे गावाच्या लोकस्मृतीत सांगितली जाणारी दोन मातंग भावांच्या शौर्याची कथा | विशेष लेखमाला – महार मातंग संबंध

Mahar Matang Sambandh  अर्थात पारंपरिक दोन कथीत अस्पृश्य जाती आज एकमेकांच्या समोर शंकास्पद, अविश्वासाची भूमिका घेऊन उभे आहेत.या पार्श्वभूमीवर महार- मांग संबंध ही एक विशेष मालिका आम्ही लिहीत आहोत. अगदी पारंपारिक एका सत्य घटनेचा आढावा घेऊन आम्ही पुढील लेख लिहीत आहोत वाचकांनी जरूर वाचावेत.

Mahar Matang Sambandh :महार – मातंग सम्बन्ध पुर्वपिठीका

Mahar Matang Sambandh लेख लेखमाले बाबत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्यात.महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती आहेत. त्या सर्व जातींना न्याय मिळावा असे आमचे मत आहे. हे आम्ही  मी स्पष्ट करत आहोत. त्याचबरोबर काही वास्तव सत्ये व इतिहास  सांगण्याचा प्रयत्न करत आहोत!

गाव सविन्दणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, येथे एक दंतकथा म्हणा, लोककथा म्हणा, परंतु सत्य घडलेली घटना असण्याची ती दाट शक्यता आहे, याचे कारणही आहे. त्या ठिकाणी आजही केली जाणारी पूजाअर्चा; त्या ठिकाणांमध्ये अंतर; गावाची रचना; गावाची वेस; आतला गाव आणि वेशी वेशीबाहेरचा समाज; गाव! जसेच्या तसे आहे!

अर्थातच जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार, माहितीनुसार मिळालेली माहिती अशी आहे. ही माहिती माझे वडील आणि त्यांच्या पेक्षा काही वर्षांनी मोठे असलेले त्यांचे चुलत भाऊ, अतिशय जुन्या पिढीतील जवळपास 100 वर्षे जगलेले हे दोन महार चुलतमाऊ, यांनी वेगवेगळ्या वेळेस सारखी माहिती मला सांगितली, मी माध्यमिक शाळेत असताना!

त्याकाळी शिवा महार, भिवा महार, अमुक मान्ग, तमुक कुणबी अशी थेट नावाला जात जोडलेली असे. आणि हे अगदी सहज व सर्वमान्य होते!

सिताराम बुवा (वारकरी असल्यामुळे हे बुवा) वडीलान्चे थोरले भाऊ व व त्यांचा चुलत भाऊ असणारे शिवा महार! हे दोघेही जवळपास शंभर वर्षे जगले!

Mahar Matang Sambandh : दोन मातंग भाऊ विडा उचलतात

दोघे अतिशय बुद्धीिमान, चाणाक्ष, आणि दूरदृष्टी असणारे होते. मागील पिढीकडून पुढील पिढीकडे भूतकाळातील, इतिहासातील माहिती पुढे सांगण्याचे महत्त्व या दोघांनाही कळत असे. आणि या दोघांनी महार जातीच्या म्हणून असलेल्या वस्ती वस्तीपासून वेगळे राहण्यास सुरुवात पहिल्यांदा केली. शेताजवळ जाऊन राहिले. त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी पटलेली होती.

आता त्यांच्या नंतरचे सर्व वंशज पवार नावाने ओळखले जातात. जातीचा उल्लेख करायची हिंमत नको कोणाची होत नाही. तर हा बाबासाहेबांच्या नंतरचा भाग. बाबासाहेब यांचे विचार स्वीकारल्यामुळे जातीचा उच्चार निघून गेला. आडनाव शिल्लक राहिले!

या व्यतिरिक्त गावातील म्हणजे महार आणि माता गोष्टी एकत्र असणाऱ्या गावाबाहेरील एका वस्तीतील मातंग वस्तीमध्ये असणारे लोकही सांगतात. त्यानुसार पुष्कळ वर्षांपूर्वी गावाच्या त्या वेळच्या प्रतिष्ठेला तडा जाणारी घटना घडत होती.

काही अंतरावर असणाऱ्या एका गावातील सरंजामी काळातील सरंजामदार असलेला एक वतनदा गावामध्ये येत असे. त्याचा अतिशय किमती रुबाबदार आणि सशस्र पेहराव असे. रात्री अंधार होताच गावामध्ये शिरत असे.

तो वतनदार अतिशय तगडा, लढवय्या, आणि प्रशिक्षित असावा. बरोबर त्या काळातील तलवार, भाला, आणि इतर साहित्य बरोबर असलेला असावा. तो त्या गावातील एका गुरवाच्या बाईकडे जात असे. पहाट होताना तो तिच्या घरातून बाहेर पडत असे, आपला घोडा परत त्याच्या गावाच्या विरुद्ध दिशेने रवाना करत असे.

गावाची प्रतिष्ठा पणाला लागली

थोड्या दिवसानंतर गावात चर्चा सुरू झाली. गावकर्याना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला असे ते गाव होतं व आहे. आजही आहे.

त्या काळातील गावातील प्रतिष्ठित पाटील, जोशी, वगैरे यांची बैठक झाली आणि अशा प्रकारे गावांमध्ये येणारा हा व्यक्ती गावामध्ये येतो आणि जातो ही बाब गावाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही असे एकमत झाले. आणि आता घोडेस्वार याला गावात येण्यास बंदी करणे किंवा त्याच्याशी लढाई करून ठार मारणे असे दोन मार्ग उपलब्ध होते.

त्या काळात सुपारीचा विडा ठेवला जात असे, ज्याच्यात हिम्मत असेल तर तो उचले आणि ते काम करण्याची तयारी दर्शवित असे. ते काम करत असे. त्यात तो यशस्वी होत असे किंवा अयशस्वी होत असे.

तर गावातील 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार यापैकी कोणाची हिम्मत होईना, अशी त्या घोडेस्वाराची दहशतच तेवढी होती. गावातील मांगवड्यातील दोन भावांनी हा विडा उचलला. गावातील भल्याभल्यांना घाम फुटलेला होता. या दोन मांगांना (असाच शब्द शब्द वापरला जात असल्याने मी तो वापरत आहे) त्याची भीती वाटत नव्हती.

कारण त्यांना खात्री होती, धाडस होते, रांगडेपणा होता म्हणून त्यांनी तो विडा उचलला.

आता तारीख आणि साल काही तेवढे माहित नाही. संध्याकाळची ती वेळ झाली. तो घोडेस्वार वेशीच्या आत येऊ लागताच या दोन बंधूंनी त्याला अडवले.

अभुतपुर्व लढाई, एका भावाचे शीर उडवले

आणि तिथून पुढे सुरू झाला एक अभूतपूर्व, उपेक्षित राहिलेला, जगाच्या नजरेला न पडलेला असा दोन मातंग भाऊ आणि घोडेस्वार यांच्या मधला रक्तरंजित हल्ले, प्रति हल्ले यांचा खेळ! एकमेकांवर हल्ला करणे, वार करणे, प्रति वार करणे, पडणे, उठणे, पुन्हा उभे राहणे असा हा तीन व्यक्तींमधला संग्राम सुरू झाला. दोन मांग भावांना हा वतनदार तोडीस तोड उत्तर देत होता. तो पारंपारिक शास्त्रानी सज्ज असा होता.

शिर पडल्यानन्तही धड लढत होते

गावातल्या एका ठिकाणी दोन मग भावांपैकी एकाची मुंडके कलम झाले, पडले. आणि आजही तेवढ्याच खात्रीने लोक सांगतात की मुंडके उडालेले धड त्या घोडेस्वाराच्या मागे गावाबाहेर साधारण अर्धा किलोमीटर असलेल्या गावाबाहेरील वेशीबाहेरील सध्याच्या नरवडे मळ्याजवळ एका ठिकाणी ते धड मुंडक्याशिवाय लढत होते, शेवटी पडले!(शब्दश: अर्था घेऊ नका) Mahar Matang Sambandh लेखमालेची पार्शभूमी समजून घेताना Mahar Matang Sambandh व गावगाडा याची माहिती व सामाजिक बाबी समजून घेताना पुढील लेखामधे या सत्यकथेचा उपयोग हौईल!

दुसर्या भावाने अखेर घोडेस्वारालाMahar Matang Sambandh कन्ठस्नान घातले:विडा जिन्कला

आणि शेवटी तिथे धड पडले. दुसरा भाऊ त्याच ताकतीने लढत होता आणि शेवटी त्या घोडेस्वाराला देखील कंथस्नान घालण्यात आले. विडा जिन्कला. पण दोन मांग भावांपैकी एक गावाच्या प्रतिष्ठेसाठी शहीद झाला.

याची आठवण म्हणून गावात दोन-तीन दगड लावलेले आहेत, आणि गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी धड पडले त्या ठिकाणी मांगोबा नावाचे देवस्थान छोटे होते. आता ते थोडे बांधण्यात आलेले आहे. इतर मंदिरांच्या मानाने त्याच्यासाठी ‘बिग बजेट’ उपलब्ध झाले नाही.

काही मातंग बांधव, विशेषता काही मातंग महिला, या दोन्ही ठिकाणी जाऊन पूजा-अर्चा करतात. एक ठिकाण गावात आहे, वेशीच्या आत आतमध्ये, आणि दुसरे ठिकाण गावाच्या बाहेर आहे.

तिथे मी आणि माझा एक मित्र जाऊन बसत असू आणि तेथे ठेवलेले नारळ फोडून खोबरे खात असू. अशीच मांग जातीच्या लढवय्या परंपरेतील एक घटना! ही सत्य घटना आहे! कदाचित गावातील आणखी जुने लोक (एक अर्जुन पडवळ पाटील होते) याबद्दल जास्त माहिती सांगू शकतील.

गावच्या कागदोपत्रे जर कुठे माहिती मिळत असेल, तर ती असू शकते आणि नसूही शकते. कारण महार मांगाच्या नोंदी काही कुठे विशेष जास्त ठेवलेल्या आढळत नाहीत.

Mahar Matang Sambandh या लेखमालेत पुढे- महार मान्ग सलग शब्द का उच्चारला जातो? कोण हे बन्धन तोडु पाहतोय.

🙏आवडल्यास शेअर करा, सामाजिक ऐक्य व सामाजिक न्याय प्रथापित करण्यास हातभार लावा. दुष्टान्चे प्रयत्न हाणून पाडा🙏

👉सत्यशोधक सत्यशोधकच्या अशाच कथा, कविता, आणि सत्यकथा वाचा. पुढील लिंकवर क्लिक करुन—

👉 Buddha Compassion : बुद्धाची करुणा आजही जपली ! घायाळ पक्षाला दिले जीवदान!

👉बालवधू वेश्या बनल्याची कथा

👉;गावातील रहस्यमय सावली; : एक हॉरर कथा !

Advertisement
Advertisement

👉वाचकाना अधिक अभ्यासासाठी लिन्कस

भारताचे संविधान

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय:

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभाग

IMG 20260611 WA0480 1
जाहिरात दरपत्रक

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support