शिरूर, दि. 28 जुलै 2026 Shirur Court News घटनेत शिरूर न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोषींना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.मारहाण व चोरीच्या गुन्ह्यांतील हे आरोपी आहेत. Shirur Court News:प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) यांचा निकाल शिरूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये दोषी आरोपींना कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास शिरूर पोलीस स्टेशनने केला होता. Shirur Court News:दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोषींना कारावास! पहिल्या प्रकरणात गुन्हा क्रमांक 597/2021 मध्ये मारहाण, दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी आरोपी शंकर भीमराव समिंदर (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) याला भारतीय दंड संहिता कलम 326 अंतर्गत दोषी ठरवत एक वर्ष साधा कारावास व ₹2,000 दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. याच प्रकरणातील इतर आरोपी भीमराव लक्ष्मण समिंदर, बळीराम भीमराव समिंदर, काळूराम भीमराव समिंदर आणि छाया भीमराव समिंदर यांना भारतीय दंड संहिता कलम 323 अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी ₹500 दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. दुसऱ्या प्रकरणात गुन्हा क्रमांक 233/2025 मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 309(4) व 3(5) अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी मारुती मसाराव मस्के (रा. कुंभारी, ता. पुसद, जि. यवतमाळ) याला दोषी ठरवत एक वर्ष तीन महिने कठोर कारावास व ₹2,000 दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही प्रकरणांची सुनावणी जे.एम.एफ.सी. न्यायालय, शिरूर येथील न्यायाधीश एस. डी. वानखेडे यांनी केली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सागर कदम यांनी कामकाज पाहिले. पहिल्या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, तर दुसऱ्या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी केला. Read more》》》》 Shirur Crime : कुख्यात गुंड योगेश मचाले टोळीवर MCOCA लागू; विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Crime News : शिरूरमध्ये कुर्हाडीने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल