
शिरुर पोलिस स्टेशन
Contents
- 1 Dog Bite Shirur : पिसाळलेल्या कुत्र्याने सय्यदबाबा नगरमधे घातला ‘हाय तौबा’ धिंगाना ! लहान मुल,मुलगी,प्रौढासह 20 ते 25 जणांंना केले घायाळ !
Dog Bite Shirur : पिसाळलेल्या कुत्र्याने सय्यदबाबा नगरमधे घातला ‘हाय तौबा’ धिंगाना ! लहान मुल,मुलगी,प्रौढासह 20 ते 25 जणांंना केले घायाळ !
Dog Bite Shirur 25 Injured
दि.15 एप्रिल 2024 |सत्यशोधक न्युज|
” Dog Bite : शिरुरमधील सय्यदबाबा नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने घातलेला थरकाप – २० हून अधिक नागरिक जखमी! पालिका, पालक आणि तरुणांनी काय घ्याव्यात खबरदारी? रेबीज म्हणजे काय, उपाय आणि प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती या बातमीत वाचा.”
पिसाळलेल्या कुत्र्याने सय्यदबाबा नगर,शिरुर, होलार आळी परिसर अशा विभिन् परिसरात आज धुमाकुळ घातला. घातला . लहान मुल,मुलगी,प्रौढासह 20 ते 25 जणांंना अक्षरश: घायाळ केले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यांचा अनुभव दररर्षी—-
या दिवसांत कुत्री पिसाळण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत असते.याकडे ल क्ष न ठेवता करण्यात येणारा हलगर्जीपणा याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. कुत्रं पिसाळले तर काही ठराविक लक्षणे आपण दरवर्षी अनुभवतो.पण लक्षात ठेवत नाही.कोनत्या महिन्यांमधे साधारणपणे कुत्री पिसाळतात.ती कोनती लक्षणे दाखवतात.त्यापासुन सावध कसे राहावे.लहान मुलांना जास्त काळ कुत्र्यांपासून लांब ठेवणे हे कसे आवश्यक आहे. हे तरूण तरुणी,पालक,कार्यकर्ते,नगरपालिका प्रशासन यांची जबाबदारी आहे.पण त्याकडे आपले दुर्लक्ष होते.त्याचा परिणाम असा भोगावा लागतो.म्हणुन याची काळजी घेतली पाहीजे.
पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: फाडले !—
ही घटना आज दि.15 एप्रिल 2025 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिरुर मधे घडल्याने नागरिकांमधे घबराहट निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे अगदी लहान मुलही यातुन बचावले नाही.लहान मुले,मुली,तरुण मुलगा,पौढ महिला अशा लोकांना तीव्र स्वरुपात या पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: फाडले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याला स्थानिकांनी केले ठार?——
या पिसाळलेल्या कुत्र्याला स्थानिकांनी ठार मारल्याचेही सांगण्यात आले आहे.त्यानंतर सर्व पिडीतांना शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे महत्वाची लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने पिडीत व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली.सर्व पिडीत हे गरीब कुटुंबातील आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने पिडीत रुग्नांना ससुन रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे.तर तर काही जण अहमदनगरकडे उपचारासाठी गेले आहेत.
कुत्रा पिसाळणे म्हणजे काय?
याला पिसाळी रोग असे म्हणतात.यामधे कुत्र्याच्या लाळेमधे रेबीजचे विषाणु निर्माण होतात.ते निर्माण झाल्यानंतर तो कुत्रा दहा दिवसात मरतो.असा कुत्रा माणसाला चावला व जखम झाली तर त्या जखमेमधे कुत्र्यातील विषाणु माणसाच्या शरीरात जातात.हे विषाणू माणसाच्या चेतापेशी ( nerve cells) मार्फत माणसाच्या मेंदुत जातात.त्यामुळे याकडे दुर्लक्ष्य केले व योग्य वेळी उपचार घेतले नाहीत तर मनुष्य पिसळतो.म्हणजे त्याच्या मेंदुत गेलेले विषाणू (virus) हे मेंदुतील पेशींवर हल्ला करुन मेंदुला इजा पोहोचवतात.त्याचा आधी जबडा व स्नायु मेंदुच्या नियंत्रणाबाहेर जातात.माणसास रेबीज झाल्यास तो वाचण्याची शक्यता फार कमी असते.त्याचबरोबर तो वाचल्यास मेंदुला इजा पोहोचल्याने तो आयुष्यभर पक्षाघातास बळी पडण्याचा संभव असतो.त्यामुळे माणसाचे मेंदुवरील म्हणजे स्वत:वरील नियत्रंण सुटते.माणसाचा मृत्यु देखील होउ शकतो ! उपचारामधे प्रतिबंधात्मक रेबीज ही लस रुग्णाला दिली जाते.जखम झाली असल्यास जखमेमधे लस दिली जाते.अशा रुग्णाला डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवावे लागते.सतत लक्ष ठेवुन रुग्णाला नियंत्रणात आणावे लागते.
या पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला इतका जोरदार होता की प्रत्येकक्ष ठिकाणी पळापळ झाली ! हाय तौबा झाली.प्रौढ महिला देखील स्वत: चा बचाव करु शकली नाही.उपलब्ध छायाचित्रांमधे पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेतल्यामुळे झालेल्या जखमांची तिव्रता आपण समजु शकता.
पिसाळलेला कुत्रा चावल्यास काय करावे?
कुत्रा जिथे चावला असेल ती जागा नीट पहावी.कुत्र्याचे दात लागले आहेत की त्याचे पंजे लागले आहेत हे आधी नीट पहावेत.जखम कितपत झाली आहे हे पाहून घ्यावे.नंतर ती जखम स्वच्छ पाण्यानू धुवून घ्यावी.जखमेतुन रक्त येत असल्यास घाईघाईने घरातील कोनताही मलम किंवा लोशन त्यावर लावू नये.स्वछ धुतल्यानंतर त्या जखमेवर स्वच्छ कापडाची पट्टी बांधावी.त्यानंतर ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जावे.कुत्रा रस्यांवर फिरणारा आहे की घरगुती पाळीव कुत्रा आहे हे नीट डॉक्टरांना समजावून सांगावे.त्यामुळे डॉक्टरांना निदान करुन उपचार करणे सोपे जाते.काही अंधश्रध्दा उदा.पाळीव कुत्रा चावल्याने काहीच होत नाही किंवा इंजेक्शने दिलेला कुत्रा चावल्याने काहीच होत नाही.या सोडून द्याव्यात.डॉक्टरांना दाखवावे.चार विशिष्ट दिवसांनंतर असणार्या लसीचा कोर्स पुर्ण करावा.चारही लशी योग्य डॉक्टरांनी दिलेल्या तारखांना आठवण ठेउन काळजीपुर्वरक घ्याव्यात.हयगय करू नये ! या रेबीज आजाराचे परिणाम चार पाच दिवसात दिसु शकतात तसे 15/20 वर्षांनंतरही दिसु शकतात. ही त्याकडे दुर्लक्ष्य करु नये.केवळा कुत्राच नाही तर मांजर,माकड असे पाळीव प्राणी चावल्यावर देखील हीच सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.
नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी—-
यातुन एक गोष्ट स्पष्ट होते की या महिन्यांमधे दरवर्षी कुत्री पिसाळतात हे माहित असुन पालिका प्रशासनाने पुर्व खबरदारी घेतलेली नाही.प्रमुख महत्वाचा उपचार व लशी अद्याप शिरुरसारख्ला मोठ्या शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणे किती महत्वाचे आहे?
नगरपरिषदेच्या वतीने याबाबत कुत्र्यांचे निर्बीकरण काही प्रमाणात केले होते.ते पुर्ण करावे.या दिवसांमधे कुत्री पिसाळण्याचे प्रमाण दरवर्षी जास्त असते.तसेच एका वेळी अनेक कुत्री पिसाळु शकतात.हल्ला करु शकतात. वेड्या माणसामधे जशी प्रचंड ताकत येते ,तशीच पिसाळलेल्या कुत्र्याच्या बाबतीत असते.म्हणून त्याच्या समोर न जाता बचावात्मक भुमिका घेउन आपण,आपली मुले व इतरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
1. रेबीजबाबत माहिती – WHO (World Health Organization):
👉 https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/rabies2. Dog Bite Treatment Guidelines – Ministry of Health, India:
👉 https://main.mohfw.gov.in/sites/default/files/Final%20NHP%20Rabies%20Guidelines_0.pdf3. Animal Birth Control (Dogs) Rules, 2023 – पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार:
👉 https://moef.gov.in/wp-content/uploads/2023/04/ABC-Rules-2023.pdf4. रेबीज लस मिळण्याची ठिकाणं – Aarogya Setu App किंवा आरोग्य सेवा संकेतस्थळ:
👉 https://www.nhp.gov.in/