24 August 2026 Jivangaurav Award : शाहीर रामहारी भाट पेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, वाचा सविस्तर..तमाशा कलेतील ज्येष्ठ शाहीर व अभिनय संपन्न कलावंत रामहारी भाट पेडकर यांना विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.Contents1. ●Jivangaurav Award :कार्यक्रम तासगाव येथील साने गुरुजी नाट्यगृहात संपन्न2. ●Jivangaurav Award :सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरेचे महत्त्व2.1. ●आणखीन लेख वाचा2.2. About The Author2.2.1. Dr.Nitin Pawar●Jivangaurav Award :कार्यक्रम तासगाव येथील साने गुरुजी नाट्यगृहात संपन्नतासगाव येथील साने गुरुजी नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उमा बाबाजी तमाशा कलावंत संघटनेच्या वतीने सावर्डेचे सुपुत्र स्वप्नील पाटील (भैय्या) यांच्या हस्ते ८७ वर्षीय शाहीर रामहारी भाट पेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.●Jivangaurav Award :सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरेचे महत्त्वयावेळी तमाशा कलावंतांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि तमाशा कलेची अस्मिता जपावी, असा सूर कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. तमाशा अभ्यासक डॉ. संपतराव पार्लेकर यांनी तमाशा कलेचा इतिहास आणि सांगली जिल्ह्यातील तमाशा परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमाची सुरुवात वाटेगाव येथील स्वरबहार शहनाई ग्रुपच्या शहनाई वादनाने झाली. यावेळी रणशिंग वादनही सादर करण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष भास्कर सदाकळे यांनी प्रास्ताविक करत तमाशा कलावंतांच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. या मागण्या शासन दरबारी मांडून कलावंतांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन स्वप्नील पाटील यांनी दिले.Jivangaurav Award स्वीकारल्यानंतर शाहीर रामहारी भाट यांनी आपल्या कलाप्रवासाचा आढावा घेत गण, गौळणी, कवने, छकडी, अभंग, पोवाडे आणि वगनाट्यांचा उल्लेख केला.त्यांनी तमाशा परंपरेतील ज्येष्ठ कलावंतांवर आधारित छकडीही सादर केली.कार्यक्रमास सांगली जिल्ह्यासह विविध भागांतील तमाशा फडांचे मालक, कलावंत, पत्रकार, अभ्यासक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सलिम सावर्डेकर यांनी आभार मानले.●आणखीन लेख वाचाMaharashtra Brahmin Community : महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाची राजकीय आणि सामाजिक स्थिती: एक सखोल विश्लेषणAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनVadgaon Rasai Suicide Case : वडगाव रासाईच्या जिगनूचे शब्द ! “भूक लागली आहे” — हे शेवटचे शब्द ठरले!