
Contents
- 1 Loksabha Election : डॉ.अमोल कोल्हे यांना आम्ही का मतदान करायचे असे प्रश्न विचारणारे फलक शिरुर शहरात ?
- 1.1 Loksabha Election 2024 Amol kolhe
- 1.1.1 शिरुर,दि.28 एप्रिल: (प्रतिनिधी)
- 1.1.2 ‘तुम्ही पाच वर्षात शिरुर शहरासाठी काय केले ? कृपा करुन सांगा?’
- 1.1.3 तुम्ही कस काय आम्हाला मतदान मागता ?आम्ही तुम्हाला का ‘मतदान करु?’—-
- 1.1.4 लढत अटितटीचीच….
- 1.1.5 जरांगे पाटील फॅक्टर. …
- 1.1.6 मोदी शहा यांच्याबाबत महाराष्ट्रात नाराजी…..
- 1.1.7 दोन्ही बाजुंनी ‘प्रयोग’ होणार?
- 1.1.8 About The Author
- 1.1 Loksabha Election 2024 Amol kolhe
Loksabha Election : डॉ.अमोल कोल्हे यांना आम्ही का मतदान करायचे असे प्रश्न विचारणारे फलक शिरुर शहरात ?
Loksabha Election 2024 Amol kolhe
शिरुर,दि.28 एप्रिल: (प्रतिनिधी)
Loksabha Election : डॉ.अमोल कोल्हे यांना आम्ही का मतदान करायचे असे प्रश्न विचारणारे फलक शिरुर शहरात काही भागात लावण्यात आल्याने या फलकांची व त्यावरील मजकूरांची चर्चा शहरात जोरदार चालु आहे.मागील पाच वर्षात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुरमधील नागरिकांच्या अडीअडचणींकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे हे स्पष्ट दिसत आहे.”

डॉ.अमोल कोल्हे,विद्यमान खासदार असुनही शिरुर शहरात एवढी नाराजी का आहे,यावर डॉ.कोल्हे यांनी विचार करण्याची गरज आहे.
‘तुम्ही पाच वर्षात शिरुर शहरासाठी काय केले ? कृपा करुन सांगा?’
एक फलकावरील मजकूर होता की ‘तुम्ही पाच वर्षात शिरुर शहरासाठी काय केले ? कृपा करुन सांगा?’तर दुसरा फलकावरील मजकूर होता,’कोल्हे साहेब पाच वर्षात तुम्ही दुसऱ्यांदा शिरुर शहरात आले मत मागायला पण शिरुर शहरातल्या लोकांना पाच वर्षात एक रुपयाचा तुम्ही निधी दिला नाही, आम्ही कस काय मतदान करणार तुम्हाला ते सांगा ?’
मी एक शिरुरकर ,’तुम्ही डॉक्टर असताना सुध्दा कोरोनाच्या काळात शिरुर शहरामध्ये एकदा सुध्दा आले नाहीत? शिरुर शहराला कसली सुध्दा मदत केली नाही ?’
तुम्ही कस काय आम्हाला मतदान मागता ?आम्ही तुम्हाला का ‘मतदान करु?’—-
असा प्रकारचे फलक शहरातील भागात लावण्यात आले . शिरुर लोकसभा मतदार संघात आघाडीचे उमेदवार खासदार डॉ .अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होत असून दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार केला जात आहे .
लढत अटितटीचीच….
शिरुर लोकसभा मतदार संघात माजी खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अनुक्रमे महायुती व महाविकास आघाडी चे तुल्यबळ उमेदवार आहेत.ही निवडणुक अटीतटीची होईल यात शंका नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची लोकप्रियता आणि छोट्या पडद्यावर डा.अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भुमीका साकारुन घराघरांत पोचलेले व त्यामुळे लोकप्रिय उमेदवार आहेत.शिवाय शरदचंद्रजी पवार यांच्या बालेकिल्ल्यात ते उभे आहेत.शरदचंद्रजी पवार यांच्या भक्कम पाठिंब्यावर .ही लोकसभा निवडणुक शरदचंद्रजी पवार यांच्या प्रतिष्ठेची बनली नाही तरच नवल ! ते आणि त्यांचे चाहते त्यांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पुर्ण शक्ती लावणार हे नक्कीच !
जरांगे पाटील फॅक्टर. …
शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत.मराठा/कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवून आक्रमक पवित्रा घेऊन राज्यातील महायुतीच्या सरकारला पळो की सळो करुन सोडले होते. त्यामुळे जरांगे पाटील फॅक्टर महायुती बरोबर राहिल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना फटका देईल हे काही प्रमाणात का होईना शक्य दिसते.पण जरांगे पाटील आणि माळी समाजातील असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांची एकमेकांवर आव्हाने प्रतिआव्हाने यांचा परिणाम डा.अमोल कोल्हे हे माळी समाजातील असल्याने मराठा माळी तेढ निर्माण होवून त्याचा फायदा शिवाजीराव आढळराव पाटील यांना होईल का?तर तो झाला ही असता.पण मधे शरदचंद्रजी पवार यांचे आवाहन बहुतांशी मराठा समाज पाळेलच ! शिवाय जरांगे पाटील यांचे आवाहनही महायुतीचे उमेदवार पाडण्याचे आहे.यात शिवाजीराव आढळराव पाटील यांना फटका बसेल अशी चिन्हे आहेत.
मोदी शहा यांच्याबाबत महाराष्ट्रात नाराजी…..
संपुर्ण महाराष्ट्रात केंद्रातील मोदी व शहा यांच्याबाबत केवळ नाराजी नाही तर संताप आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमधे जाणे हे महाराष्ट्रातील लोकांना आवडलेले नाही.मोदी शहा यांचे गुजरातप्रेम महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा जास्त आहेत.त्यामुळे त्यांना ही बाब महागात पडण्याची शक्यता मोठी आहे.
त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात आज बर्याच राजकिय तज्ञांना देखील सांगता येणे शक्य होईना.त्यात शिरुर शहराचा विचार केला तर डा.अमोल कोल्हे हे शिरुरला कधीच आले नाहीत.नागरिकांना संपर्क करायचा झाल्यास त्यांना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क करता आला नाही. त्यांनी शिरुरला एक कार्यालय ठेवणे आवश्यक होते. असे बर्याच लोकांना वाटते.पण शिरुर मधुन कमी मतदान झाले तरी शिरुर लोकसभा मतदार संघ शिरुर शहराव्यतिक्त इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. शिरुरमधील विद्यमान सर्व नगरसेवक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे आहेत.अपवाद असणारे नगरसेवक किती प्रभावी ठरणार आहेत, याचे उत्तर नकारात्मकच आहे.विद्यमान आमदार अशोक पवार हे शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावंत आहेत.ते दोनदा आमदार झाले आहेत. पुढे साहजिकच प्रमोशन होवून मंत्रीपद मिळावे या प्रयत्नात ते आहेत.
दोन्ही बाजुंनी ‘प्रयोग’ होणार?
या संग्रामात छोटे मोठे प्रयोग दोन्ही बाजुंनी होत आहेत.अशा प्रकारच्या पाट्या शिरुर शहरात लावल्या जाणे हे त्याचाच एक भाग आहे. प्रचाराचाच एक भाग आहे. असे म्हणायला जागा आहे. शिरुरला आले नाहीत हा तेवढा मोठा विषय नाही.खासदाराने मतदार संघात उद्घाटणे,लग्न समारंभ करत बसणे हे काम करायचे नसत. तर लोकसभेत मतदार संघातील प्रश्न मांडुन ते सोडवणे हे असते.जास्तीत जास्त निधी मतदारसंघासाठी आणणे आवश्यक असते.खासदार निधीचा योग्य सर्वसमावेशक वापर करणे अ अपेक्षित असते.याबाबत कुणाचे दुमत होणार नाही. आता निकालाची वाट पहाणै एवढेच नागरिकाच्या हातात आहे.
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
1. भारत निवडणूक आयोग (Election Commission of India):
https://eci.gov.in
(शिरुर मतदारसंघाची अधिकृत माहिती व उमेदवारांचे तपशील)
2. MyNeta.info (उमेदवारांचे आर्थिक व गुन्हेगारी माहिती):
https://myneta.info
(डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांचा तपशील पाहण्यासाठी)
3. लोकसत्ता – शिरुर निवडणूक बातम्या:
https://www.loksatta.com/elections
(महाराष्ट्रातील निवडणुकीवरील राजकीय विश्लेषणासाठी)
4. NDTV Marathi – निवडणूक विश्लेषण:
https://marathi.ndtv.com
(राजकीय घडामोडींवर राष्ट्रीय व स्थानिक बातम्या)
5. ABP माझा – लोकसभा निवडणूक 2024 अपडेट्स:
https://marathi.abplive.com/loksabha-election
(प्रचार, चर्चा, आणि उमेदवार विश्लेषण)
6. PRS Legislative Research (खासदारांचे कामगिरी अहवाल):
https://prsindia.org
(डॉ. कोल्हे यांच्या संसदीय कामगिरीचा तपशील)
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून–
शिरुर लोकसभा मतदार संघ: सरशी आढळराव पाटील की डॉ.अमोल कोल्हे यांची होणार? का आणि कशी ? ते वाचा…