
Contents
- 1 Arwind Kejariwal Factor मोदी शहांना किमान 30 जागांवर नुकसान पोचवील ?
- 2 Arwind Kejariwal Factor In Loksabha Election 2024
- 2.0.1 अरविंद केजरीवाल तात्पुरते बाहेर. ..
- 2.0.2 Arwind Kejariwal Factor: संविधान, हुकुमशाहीचा धोका व डा. बाबासाहेब आंबेडकर—
- 2.0.3 दिल्लीकरांचा अपमान?—
- 2.0.4 इंडिया आघाडीचे एक प्रमुख शिलेदार—
- 2.0.5 30 जागांवर च निकाल अरविंद केजरीवाल बदलू शकतात | Arwind Kejariwal Factor |–
- 2.0.6 बहुजन समाज पक्ष आणि उत्तर प्रदेश—
- 2.0.7 ‘मंगळसुत्र’ वगैरे विधाने—-
- 2.0.8 अरविंद केजरीवाल यांचे ‘विक्टिम कार्ड’?—-
- 2.0.9 Match Fixing झालेलेच आहे—
- 2.0.10 About The Author
Arwind Kejariwal Factor मोदी शहांना किमान 30 जागांवर नुकसान पोचवील ?
Arwind Kejariwal Factor In Loksabha Election 2024
Editorial | Satyashodhak News |
Arwind Kejariwal Factor यांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जामिनामुळे मोदी-शहा जोडीसमोर 30 जागांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे का? दिल्लीपासून हरियाणा, महाराष्ट्र ते शिरूर लोकसभा मतदारसंघापर्यंत केजरीवाल फॅक्टर किती परिणामकारक ठरेल? वाचा सत्यशोधक न्युज संपादक डॉ. नितीन पवार यांचा सखोल राजकीय विश्लेषणात्मक लेख.”
अरविंद केजरीवाल यांना अखेर सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.वीस दिवसांचा ! हे मोदीजी आणि अमित शहा यांना कदाचित अपेक्षित नव्हते! न्या.चंद्रचूड यांच्या या निकालाने अनेक संभावना निर्माण केल्या आहेत.”
अरविंद केजरीवाल तात्पुरते बाहेर. ..
अरविंद केजरीवाल यांचे जेलमधुन बाहेर पडताच पहिले भाषण पहा.जेलमधे त्यांनी जणु पुर्ण स्क्रिप्टच तयार केली आहे. त्यांनी प्रथम हल्ला चढवला आहे तो हुकुमशाहीवर.ही तथाकथीत देखील कोणी म्हणू शकते.कारण पेपरवर्क ठिकठाक करुनच मोदी सरकारने बर्याच अलिकडच्या कारवाया केल्या.त्यात अरविंद केजरीवाल यांना ऐन लोकसभा निवडणुक 2024 चा प्रचार रंगात आला असताना जामीन मिळणे ही एक सहज बाब आहे की काही ‘दुरचे’ (?) नियोजन आहे, हे काळच ठरवेल ! (Arwind Kejariwal Factor)
Arwind Kejariwal Factor: संविधान, हुकुमशाहीचा धोका व डा. बाबासाहेब आंबेडकर—
अरविंद केजरीवाल यांनी आल्या आल्या पहिल्या भाषणात संविधान धोक्यात, हुकुमशाहीचा धोका,डा बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर जास्त जोर दिलेला दिसला.पंजाब, हरियाणा मधे 30 टक्केंच्या आसपास दलितांची लोकसंख्या आहे. तीच या दोन राज्यामधील आम आदमी पार्टीच्या यशात महत्त्वाची भूमिका आधीही बजावणारी होती.आता पुन्हा यांनाच भावनिक आवाहन केल्याप्रमाणे त्यांचे पहिले भाषण होते.
दिल्लीकरांचा अपमान?—
लोकांनी 70 पैकी 67 जागा अरविंद केजरीवाल यांना विधानसभेत दिल्यानंतरही ते आम आदमीचे मुख्यमंत्री असुनही मोदी सरकारने त्यांना जेलमध्ये टाकले म्हणजे या लोकांचा,दिल्लीच्या लोकांचाच अपमान केला आहे, असे पटवून देण्यात ते यशस्वी होण्याची शक्यता आहे. दिल्लीमधे 7 लोकसभेच्या जागा आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत.त्या भारतीय जनता पक्षाच्या हातून गेल्यात जमा आहेत.असे निरिक्षक देखील सांगत आहेत. हरियाणा मधील 10 जागांवर ज्या आता भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यावर देखील तेथील शेतकरी आंदोलन ,Antiincumbacy Factor,शेतकऱ्यांची नाराजी,स्वता: अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे आहेत.त्यांनी जर तेथुन भारतीय जनता पक्षाला तडाखा दिला तर हा Arwind Kejariwal Factor भारतीय जनता पक्षाला महागात पडणार आहे. अशी शक्यता आहे. म्हणुनच भारतीय जनता पक्षाच्या एक एक जागा कमी करण्याची भाषा होत असते. जागा जिंकण्याची भाषा होत नाही.
इंडिया आघाडीचे एक प्रमुख शिलेदार—
अजुन निवडणुकीचा चौथा,पाचवा, सहावा,सातवा चरण बाकी आहे. अशा स्थितीत साहजीकच अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीचे एक प्रमुख शिलेदार असल्याने इतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश,हिमाचल,उत्तराखंड,बंगाल येथे त्यांच्या मोठ्या संख्येने सभा होणार. Victim Card ते निश्चितच वापरतील ! देशामधील सर्व भाषांमधे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधे केलेल्या कामाची जाहिरात केली गेली आहे.मराठी भाषिक लोक सहज सांगताना आपण पहात असतो,की अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधे लाईट बील माफ केले,सरकारी शाळा हाय फाय केल्या.इ.इ.यावर अरविंद केजरीवाल हे या राज्यांमधे जोर देतीलच.
30 जागांवर च निकाल अरविंद केजरीवाल बदलू शकतात | Arwind Kejariwal Factor |–
महाराष्ट्रात अजुन 24 जागांवर निवडणुक व्हायची बाकी आहे. उत्तर प्रदेश मधे अजुन 54 जागांवर निवडणुक व्हायची बाकी आहे. या ठिकाणी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना अधिक धीर येईल हे ही खरे आहे. त्याचा परिणाम होवुन 10/15 जागांवर इंडिया आघाडीची सरसी होवू शकते.दिल्ली बाबत बोलले जात आहे की तेथे मनोज तिवारी यांची जागा देखील भारतीय जनता पक्षाला सोपी राहिली नाही.हरियाणा मधील सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज यांची जागा देखील भारतीय जनता पक्षासाठी सोपी राहिली नाही. अशात अचानक अरविंद केजरीवाल दिल्ली व हरियाणा मधे भारतीय जनता पक्षाला पिछाडीवर टाकतील तर जवळपास 30 जागांवर चे निकाल अरविंद केजरीवाल बदलू शकतात. यावेळी मोदी लाट नाही,असे भारतीय जनता पक्षाचे लोकही सांगतात.Normal लेवलला निवडणुक आहे ,असे दिसते.असे जेव्हा असते तेव्हा Antincumbussy Factor थोडा अधिक तीव्र होतो.
बहुजन समाज पक्ष आणि उत्तर प्रदेश—
अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच आज शुन्य जागा असलेल्या बहुजन समाज पक्षाला पश्चिमी उत्तर प्रदेश मधे चांगले वातावरण आहे.त्या पक्षाला 6/7 जागा मिळाल्या तर त्या भाजपच्या खात्यातुनच वजा होतील.मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांच्यात शितयुद्ध चालू असताना मोदींना इथे फटका (?) बसणे किंवा देणे हे घडु पहात आहे.आकाश आनंद या मायावती यांच्या भाच्याचे तोंड भारतीय जनता पक्षांबद्दल जास्तच बोलायला लागल्यानंतर मायावती यांनीच बंद केलेले आपण नुकतेच पाहीले.बसपा बर्याच काळ सत्तेपासून दुर राहिला आहे.मायावती यावेळी ‘वेगळा’ प्रयोग करत आहेत, असे समजते. त्याचा परिणाम होवुन त्यांना काही जागा मिळतील असा अंदाज आहे.आणि तेथे भारतीय जनता पक्षाशी पडद्यामागुन ,’काहितरी’ (?) होवु घातले असल्याचे सांगितले जाते. अनेक भ्रष्टांना (?) ईडी मार्फत तुरंगात टाकल्याचे सांगत असताना इलेक्टोरल बान्ड मात्र बुमरंग होवुन भ्रष्टाचार किंवा काळा पैसा या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष अडचणीत आला तर आहेच.त्यात राहूल गांधी सांगतात की प्रत्येक कुटुंबांला एक लाख रुपये देवून आम्ही कोट्यावधी गरीबांना लखपती बनवू.कारण मोदी यांनी फक्त अदाणी अंबानी यांना अब्जाधीश,कोट्याधीश बनवले म्हणून ! उद्योगपतींना सवलत देवून जनतेचा पैसा घालवला तो आम्ही जनतेला किमाण लखपती बनवण्यासाठी वापरू.
‘मंगळसुत्र’ वगैरे विधाने—-
भारतीय जनता पक्षाने अलिकडे मंगळसूत्र, शरद पवारांना पक्षात निमंत्रण देणे,अदाणी,अंबानी कांग्रेसलाच आता कोट्यावधी रुपये देत असल्याचे म्हणणे इ.बाबी श्री.नरेंद्र मोदी यावेळी कमजोर पडत असल्याचे सुचक आहे.
अरविंद केजरीवाल यांचे ‘विक्टिम कार्ड’?—-
अरविंद केजरीवाल या Factor बाबत हा लेख प्रामुख्याने नियोजित आहे. जर अरविंद केजरीवाल यांचे Victim card, IIT यन माईंड आणि planing, ‘आप’ चे खासदार संजय सिंह दिल्ली,पंजाब, हरियाणा बाहेर महाराष्ट्र, बंगाल,उत्तर प्रदेश मधे रान उडवुन सभा गाजवत असताना त्यांचेही गुरु अरविंद केजरीवाल स्वत: आले तर भारतीय जनता पक्ष नेत्त्रुत्वाखालील महायुतीला 30 जागांचे तरी नुकसान पोचविल ! आणि हाच आहे अरविंद केजरीवाल Factor ! हा Game Changer ठरु शकतो.जे चार सौ पार चा अंदाज देत आहेत ते फक्त ईव्हीएम हॅक झाले तरच शक्य आहे. अन्यथा नाही.260 ते 270 चा देणार्यांना मात्र या अरविंद केजरीवाल Factor 230/240 पर्यंत आणून सोडेल ! तर मात्र काय होईल?
Match Fixing झालेलेच आहे—
आणि काही लोकांच्या म्हणल्याप्रमाणे match fixing झालेलेच आहे. हे खरे झाले तर भारतीय जनता पक्ष साधे बहुमत घेवुन तिसर्यांदा सत्तेत येईल. मात्र संविधान बदल सध्या तरी केवळ अफवाच असावी.कारण संविधानाचाच तर भारतातील प्रस्थापितांना ‘जैसे थे परिस्थिती‘ ठेवण्यासाठी उपयोग करता आला आहे. त्यानुसारच कायदेशीरपणे ते सत्तेत आले.बहुमतात आले.येतील,जातील ! तसे संविधान नसेल तर उलट येथील प्रस्थापितांना अवघड जाईल,महागात पडेल.इंग्रज व डा.आंबेडकरांनी जे धोके दाखवले होते ते आजच्या प्रस्थापितांना निर्माण होतील. हे त्यांनाही माहीत असावे.म्हणून ते संविधान वाचवण्याचाच प्रयत्न जास्त करतील ! ना की संविधान बदलण्याचा !
जाता जाता माझ्या स्थानिक वाचकांना सांगु इच्छितो की ‘शिरुर लोकसभा ‘ ही जागा शिवाजीराव आढळराव पाटील जिंकतील (?) आणि या बदल्यात (?) बारामती सुप्रियाताईंना मिळेल? कोल्हेंना पाडले (?) जाईल ! सगळया पवारांची तिच आजची गरज आहे. हा फक्त माझा अंदाज आहे. कोनता विज्ञानातील सिद्धान्त नाही. तो अंदाज चुकीचाही असु शकतो !
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
✅ 1. https://eci.gov.in – भारत निवडणूक आयोग
2. https://aamaadmiparty.org – आम आदमी पार्टी अधिकृत संकेतस्थळ
3. https://indiankanoon.org/ – भारतीय न्यायप्रणाली व कायदे
4. https://prsindia.org/ – विधिमंडळ व संसद विषयक संशोधन संस्था
5. https://scroll.in – समकालीन राजकीय विश्लेषण
6. https://thewire.in – स्वतंत्र पत्रकारिता मंच
7. https://altnews.in – तथ्य पडताळणी व फेक न्यूजविरोधी कार्य
8. https://boomlive.in – माहिती व तथ्य सत्यापन प्लॅटफॉर्म
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••
Modi :श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्याचे श्री.नरेंद्र मोदी यांचे मतदारांना आवाहन !