
Contents
- 1 कल्याणीनगर कार अपघात प्रकरण: अगरवाल कुटुंब साधे नाही तर अत्यंत क्रुर?
- 1.1 कल्याणीनगर कार अपघात प्रकरण: आणखीन खुलासे,गोव्याच्या व्यक्तीलाही संपवले होते ?
- 1.1.1
- 1.1.2 लेख- डा. नितीन पवार, संपादक
- 1.1.3 कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात रोज नवीन खुलाशे?
- 1.1.4 अगरवाल कुटुंबाची रोज नवीन माहिती पुढे येत आहे. ..
- 1.1.5 भावांमधे संपत्तीसंबंधी वाद. …
- 1.1.6 दुबयीला जावून अंडरवर्ल्ड मधील Don पर्यंत पोहोच?
- 1.1.7 ड्राइवरचे अपहरण?
- 1.1.8 प्रत्यक्षदर्शींचे पुरावे?…
- 1.1.9 निर्दोष इंजिनियर तरुण तरुणीचे काय?
- 1.1.10 About The Author
- 1.1 कल्याणीनगर कार अपघात प्रकरण: आणखीन खुलासे,गोव्याच्या व्यक्तीलाही संपवले होते ?
कल्याणीनगर कार अपघात प्रकरण: अगरवाल कुटुंब साधे नाही तर अत्यंत क्रुर?
कल्याणीनगर कार अपघात प्रकरण: आणखीन खुलासे,गोव्याच्या व्यक्तीलाही संपवले होते ?
लेख- डा. नितीन पवार, संपादक
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात रोज नवीन खुलाशे?
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात रोज नवनवे होत आहेत. रविंद्र धंगेकर यांनी एक्साईज डिपार्टमेंट चा सुररिंटेंडंट चरणसिंग राजपुतला वेगवेगळय़ा अनेक पब,बार,वगैरे अशा एक आणि ‘दोन’ नंबरच्या धंद्यावाल्यांकडून किती लाच मिळत होती. एजेंट, मालकांची नावे,रकमांचे आकडे इ.माहितीच सविस्तरपणे दिली आहे. अर्थात एक्साईज ने ही बाब नाकारली आहे ! पालकमंत्री अजित पवार यांनी धंगेकर यांनी पुरावे उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. बेजबाबदारपणे काही माहिती देउ नये. असे सांगितल्याची बातमी आहे. पालकमंत्र्यांनी स्वत: अनेक प्रकारचे आरोप करताना असे किती पुरावे यापुर्वीच्या राजकीय जीवनात दिले होते? असा प्रश्न विचारला जात आहे. तर ,’हमाम में सब नंगे‘ असतात ! तसे राजकारणात असतात, म्हणून हे उत्तर अपेक्षितत होते. आणि आता पुढे या प्रकरणात, ‘तपास चालु आहे’ असे पालुपद सतत वाजवले जाईल की निर्भया प्रकरणाप्रमाणे पुणेकर नागरिक हे अपराध्यांना शिक्षा होईपर्यंत लढेल? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. आज आठवडा पुर्ण होउनही पिडीत तरुण व तरुणीचे कुटुंबीय कोण? कुठले आहेत? त्यांना काही मदतीची काही घोषणा पण नाही ! फक्त अगरवाल कुटुंबाचीच चर्चा चालू आहे !
अगरवाल कुटुंबाची रोज नवीन माहिती पुढे येत आहे. ..
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील प्रमुख कुटुंब अगरवाल कुटुंबीयांच्याबद्दल रोज नवीन माहिती पुढे येत आहे. गोव्याचा सिक्वेरा नावाच्या एका व्यक्तीने 100 एकर जमिनीचा अगरवाल कुटुंबांशी व्यवहार केला होता.त्यातुन या व्यक्तीला गोव्यावरुन पुण्यात आणले गेले. त्याला तुरंगाची शिक्षा झाली. तुरंगात तो व्यक्ती 15 दिवसात मृत्यु पावला ! त्याची कोठे काही फारशी चर्चा केली गेली नाही.त्याची मुलगी आली. तिने Dead Body पुण्यातुन गोव्याला नेली. तिने काही तक्रार केली की नाही? का तक्रार केली नाही?तिचे नाव काय? सध्या ती कुठे असते? याचाही सविस्तर तपास या प्रकरणी करणे गरजेचे आहे.
भावांमधे संपत्तीसंबंधी वाद. …
अगरवाल कुटुंबात चार भावांमधे संपत्तीसंबंधी वाद होता. त्यात वडगाव शेरीचा एक शिवसेनेचा उमेदवार असलेल्या व्यक्तीने सांगितलेली माहिती या तपासकामात महत्त्वाची आहे. याच कुटुंबातील महिलेने याच कुटुंबातील व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप केला होता. याच कुटुंबांतील एका भावाने दुसर्याला मी काहीच तुला देणार नाही. असे सांगितले. तेव्हा तो दुसरा भाऊ परदेशात गेला. तिथे त्याने एका अंडरवर्ल्डचा प्रमुख असणार्याची भेट घेउन या शिवसेनेच्या उमेदवाराला ठार मारण्याची सुपारी दिली. त्याप्रमाणे ऐन निवडणुक प्रचारात असताना या शिवसैनिकांवर गोळीबार झाला. तो बचावला. त्या प्रकरणातील काही शुटर/आरोपी हे आजपर्यंत फरारच आहेत, अशी माहिती उपलब्ध होत आहे. हा प्रकार 2009 चा आहे.
दुबयीला जावून अंडरवर्ल्ड मधील Don पर्यंत पोहोच?
अगरवाल, धारीवाल,केजरीवाल या आडनावाच्या लोकांना सहसा बनिया पण अहिंसावादी,भित्रे,भांडणे न करणारे असे सहसा मराठी माणुस तरी समजतो. पण या भावांमधील एक दुबयीला जावून अंडरवर्ल्ड डान ला भेटतो.सुपारी देतो. खरी सुपारी ! जी सर्वसामान्य माणुस केवळ ऐकुण असतो किंवा चित्रपटांमधे पहात असतो. ‘सुपारी’ ला घाबरत असतो. पुणेकर माणुस तर आणखीन जास्त घाबरट ! पण या पुण्यात राज्याबाहेरुन येवून इतके धाडस करतो. म्हणजे सहजासहजी हे खरेही वाटत नाही. पुण्यात येणे,किंवा महाराष्ट्रात परराज्यातून येणे असा काही काही objection घेण्याची बाब नाही. पण पुढे जावून ताजा कारनामा मात्र चकित करणारा आहे.
रात्री उशिरा अपघात झाला. तत्पासुन या कुटुंबाची यंत्रणा कामाला लागली असे दिसते. प्रथम आरोपीला पिझ्झा, बर्गर वगैरे दिल्याची माहिती. दुसरे आता उघड होत असलेली म्हणजे ससुन हास्पिटल च्या वैद्यकीय अधिकाऱ्यापर्यंत व lab प्रमुखापर्यंत पोचणे. ससुनचा रिपोर्ट चुकीचा होता व तो आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याचा नव्हता. तर दुसर्या कुणाच्या तरी रक्ताचा होता. ही बाब पुढे येणे म्हणजे इथे वैद्यकीय अधिकारी व lab प्रमुखांना निश्चितच धमकी व लाच देण्याचे प्रयत्न चालू होते. यांना नंतर अटकही झाली आहे. ससुनच्या रक्ताचा DNA दुसर्याच व्यक्तीचा होता. तर औंध येथे जे रक्त तपासणीसाठी दिले होते,ते आरोपीचे होते. ही बाब पुढे आली.
ड्राइवरचे अपहरण?
नंतरही विशिष्ट अशी यंत्रणा नक्की सतत कार्यरत होती. कारण गाडीचा ड्रायव्हर परस्पर घरी न पोचता दुसरीकडे नेला गेला. त्याला कोणी मारहाण केल्याची माहिती नाही. पण पुढे त्याची सुटका करण्यात आल्यानंतर त्याला तु स्वताकडे हा ड्रायव्हरचा रोल घे ! असा दबाव , धमकी,लालच दिले जात होते. अशी माहिती पुढे आली. म्हणजे एक मोठी टिमच या आरोपीला वाचवण्यासाठी कार्यरत होती. तिचा संपुर्ण तपास करणे आवश्यक आहे. मिनिटामिनीटाला काय घडले याचा छडा लावणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षदर्शींचे पुरावे?…
आजही हा अपघात घडला त्यावेळी जे प्रत्यक्षदर्शी पुरावे म्हणून महत्त्वाचे ठरणार आहेत.त्यांना धमकी,दबावातून जावे लागत असल्याची बातमी आहे. म्हणजे ही छुपी टिम मोठी आहे, असे दिसते. ती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यादेखील संपर्कात असु शकते. इतकेच नाही तर तपास यंत्रणेतीलही काही व्यक्ती त्यांमधे असु शकतात.पोलिस सुत्रांकडून दिली जाणारी माहिती मोजुन मापुन दिली जात आहे. आरोपीच्या इतर मित्रांबद्दल माहीती स्पष्टपणे पुढे येत नाही. ते देखील या तपासाकामी महत्त्वाचे साक्षीदार ठरु शकणार आहेत. एक आमदार जखमी, किंवा मृतांच्या घरी सांत्वनासाठी किंवा माणुसकीच्या नात्यानेही जात नाही. अजुनही गेला नाही. पण आरोपीकडे तातडीने गेला. ही बाब लक्षणीय आहे.आणि आरोपीला वाचवण्यासाठी कार्यरत असणारी जी कोनती टिम मोठी टिम असु शकेल? याचा तपास करण्यासाठी ही बाजु तपासणे गरजेचे आहे’ .
निर्दोष इंजिनियर तरुण तरुणीचे काय?
पोलिसांपुढे आव्हान आहे की निर्दोष इंजिनीयर तरुण तरुणीला न्याय द्यायचा की धनदांडग्यांचा बचाव करायचा? मात्र न्याय नाही दिला गेला तर समाजात काय मेसेज जाईल? अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळेल का? भविष्यात ही प्रवृत्ती आणखीन किती बळी घेईल? यावर विचार करुन मागचं पुढचं सगळं या अगरवाल कुटुंबाच खरं खोटं बाहेर काढावे व महाराष्ट्राला आपली क्षमता व न्यायप्रियता दाखवून देता येईल!