
शिरुर तालुका- मारहाणीची घटना !
Contents
रांजणगाव गणपती जवळ कारेगावमधे हातात दांडके,कोयता घेउन साउथ फिल्म स्टाईल हगामा ! रांजणगाव पोलिसांनी सहा जणांना ठोकल्या बेड्या !
रांजणगाव गणपती एम आय डी सी मधे सहा जणांना मारामारी प्रकरणी पोलिसांनी केले जेरबंद !
रिपोर्ट : डा.नितीन पवार,संपादक
राजणगाव गणपती हे शिरूर तालुक्यातील ठिकाण आठ विणायकांपैकी एक अर्थात अष्टविणायकांपैकी एक म्हणजे श्रद्धेचे,भक्तीचे,पावित्याचे मानले जाते. म्हणजे जात होते. आता ते तसे मानले जाते का ? आणि कोनकोनत्या कारणांनी हे परिसरातील लोक जाणतातच ! नुकतीच इथे अगदी साउथ फिल्म स्टाईल मधे हाणामारी,फोडाफोडी झाली आहे.रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी अर्थातच सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत!
चार पाच मोटार सायकलींची तोडफोड…..
रांजणगाव गणपती एम आय डी सी परिसरात जवळच कारेगाव आहे.आज मितीला हा सर्व परिसर एम आय डी सी किंवा यश ईन चौक म्हणून संबोधला जायला लागला आहे. तर दि.27 मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रांजणगाव एम आय डी सी पोलिसांना फोनद्वारे माहीती मिळाली.ती अशी की कारेगाव मधील आय टी आय रोडलगतच्या कारेश्वर इंग्लिश मेडियम शाळेसमोर अज्ञात व्यक्तींनी चार पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड केली आहे. एक मोटर सायकलही पेटवून दिली आहे.
ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे हे आपल्या सहकारी पोलिस अधिकारी व पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पेटलेली मोटर सायकल विझवली.
याठिकाणी जमलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षामधुन नेले….
रांजणगाव गणपती जवळील या घटनेबाबत आनंद लक्ष्मण खाडे,वय-19 वर्ष, रा.खारेगाव,ता.शिरुर,जि.पुणे याने फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरुन फिर्यादी आनंद लक्ष्मण खाडे व त्याचा मित्र अक्षय कुटे यांना किरकोळ कारणावरुन रणजीत शितोळे,तेजस शितोळे,धनंजय शिरफुले,रोहन बोटे,शंकर करंजकर व इतर तिघांनी बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांच्याकडील रिक्षामधुन फिर्यादीला जबरदस्तीने बसवून रांजणगाव एम आय डी सी मधील आय टी आय रोडलगतच्या कारेश्वर इंग्लिश मेडियम शाळेसमोरील कंपनीसमोर नेले. तेथे त्यांना हाताने,लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच तेथे लावलेल्या पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड केली.एक मोटर सायकल पेटवून तिचे नुकसान केले.
रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
रांजणगाव गणपती पोलिसांचा चांगली कामगिरी. ..
रांजणगाव गणपती परिसरातील या गुन्ह्यातील आरोपींची नावे,पत्ते मिळवणे व त्यांचा शोध घेण्याच्या या कारवाईत पोलिस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांनी तपास पथकात सहायक पोलिस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे ,सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे ,पोलिस कान्टेबल विजय शिंदे यांना योग्य त्या सुचना देउन आरोपींचा शोध घेण्याआठी रवाना केले. या पधकाने पद्धतशीरपणे शोध घेतला.त्यांनी रणजित गंगाराम शितोळे, वय-34 वर्ष, धनंजय सतीश शिरफुले,वय- 20 वर्ष, तेजस अनिल शितोळे, वय-21 वर्ष, शंकर जालिंदर करंजकर,वय-19 वर्ष, गिरीश गोविंद कराळे ,वय-19 वर्ष, प्रेमराज मधुकर वाघमारे,वय-19 वर्ष, सर्व राहणार कारेगाव,ता.शिरूर, जि.पुणे यांना अटक केली आहे. न्यायालयाने दि.1 जुनपर्यंत आरोपींना पोलिस कस्टडी रिमांड मजुर केला आहे. यातील दोन विधीसंघर्षित बालकांची नावे व पत्ताही निष्पन्न केला गेला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी कारवाईत सहभागी. …
या कामगिरीमधे मा.पंकज देशमुख,पोलिस अधिक्षक,पुणे ग्रामीण, मा.रमेश चोपडे,अपर पोलिस अधिक्षक,पुणे,श्री.प्रशांत ढोले ,उपविभागिय पोलिस अधिकारी, शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे, सहा.पोलिस निरिक्षक श्री.मनोजकुमार नवसरे,बजरंग झेंडे,पोलिस उपनगरीक्षक निळकंठ तिडके,पोलिस उपनिरीक्षक सविता काळे,सहा.फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस काॅन्स्टेबल उमेश कुतवळ,विजय शिंदे, पो.हवा.ब्रम्हा पोवार,विलास आंबेकर,पो.ना.मानिक काळकुटे या टिमने अथक परिश्रम घेतले.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलिस निरिक्षक श्री. मनोजकुमार नवसरे, रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशन हे करत आहेत.
मात्र काही प्रश्न समोर येतातच ! मुलांची वये कमी आहेत. कुमारवयीन मानसशास्त्र समजु शकते. यावयात नव्याने शरीरात संचारलेली ताजी उर्जा कुठे वापरायची ? हे या वयातील मुलांना घरातून,शाळेतून , समाजातुन समजले पाहीजे.पण ते का समजत नाही ? कारण स्पष्ट आहे.समाजातच तशी आदर्श माणसे या मुलामुलींना कुठे दिसत नाहीत. का दिसत नाहीत ? तर आज कुणाला प्रतिष्ठा,मान,सन्मान,अधिकार,पैसा,संपत्ती,यश मिळते?ते या वयातील मुलांना दिसते.काय दिसते तर भाईंना ,पैशावाल्यांना,वेश्यावृत्तीला,भ्रष्ट अधिकार्यांना,भ्रष्ट पुढार्यांना हे मिळते.कल्याणीनगर कार अपघात प्रकरण याचे ताजे उदाहरण आहे. मग या वयातील मुले अशा लोकांचे, चित्रपटातील प्रसंगांचे अनुकरण करतात.परिणामी त्यांच्या हातून गुन्हे घडतात.
उत्तेजित करणारी फिल्मी हाणामारीची दृष्ये विशेषता दक्षिण भारतीय, साउथ इंडियन फिल्मे या कोवळ्या वयातील मुलांना तसे करण्यास निश्चितच प्रोत्साहन देतात. पण या वयोगटांतील मुलांनी चित्रपटांचे शूटिंग कसे केले जाते ते पहावे.त्यावरील व्हिडीओ यु ट्यूब वर उपलब्ध असतात.ते किती नकली असतात ते कळेल.ते प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल हे समजेल !