
Dr.Nitin Pawar,Editor,Shirur.
Contents
क्रिकेट मधे आता अमेरिकाही ! ट्वेंटी२० वर्डकप 2024 चे सामनेही अमेरिकेत होणार !
क्रिकेट चे वेड अमेरिकनांना लागले तर आलिंपिकमधे अमेरिकनांची अवस्था भारतासारखी होईल का ?
लेख- डा.नितीन पवार,संपादक.
क्रिकेट खेळ ब्रिटिशांचा ! पण….
क्रिकेट हा खेळ तसा ब्रिटीशांचा ! ब्रिटिश अधिकारी भारतातील ड्युटीवर असताना वेळ घालवण्यासाठी क्रिकेट खेळायचे.एक गोष्ट त्यांना फायद्याची ठरायची.ती म्हणजे हे गोरे लोक कसे दिसतात ? आणि हा कसला खेळ खेळत आहेत? असा प्रश्न आजुबाजुच्या त्यावेळच्या आपल्या पुर्वजांना पडत असे.म्हणून ते ब्रिटीश अधिकारी क्रिकेट खेळत असताना काही अंतरावर उभे राहून कौतुकाने तो खेळ व असे गोरे लोक पहात असत. गोर्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न मात्र सुटला.त्यांना फिल्डींगचा त्रास होत असे.पण बाजुला उभ्या असलेल्या लोकांना हाताने खुणावले की अगदी चठाओढ लागून ते भोळे गावकरी त्या,’सिमापार‘ झालेल्या चेंडूच्या मागे धावत असत. त्चेंयावेळी भारतात स्टेडीयमस नव्हते. कोठेही झाडीझुडुपात गेला तरी चपळाईने तो हुडकून गोर्या साहेबांकडे फेकत.साहेब परत निवांतपणे खेळ खेळत बसत.
लार्डसवर विश्व करंडक जिंकला आणि….
क्रिकेट या विदेशी खेळाने भारतीयांना तेव्हापासुन जे वेड लावले ते खताच्या क्षणापर्यंत! क्रिकेट खेळ पुढे भारतीयांचाच जणु खेळ बनला.भारताने इंग्लंडमधील लॉर्डस मैदानावर विश्वचषक जिंकून जणू ब्रिटेनवर विजय मिळवला.भारतीय क्रिकेटसाठी वेडेपिसे झाले.क्रिकेट भारत व भारतीय उपखंडात वाढत राहिला.पण ब्रिटेन व युरोपमधून अमेरिका खंडावर कब्जा मिळवणार्या या गोर्या साहेबांच्या इंग्लंडमधे कमी होत गेला.आज आहे.पण प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे आहेत.क्रिकेट वेडे नाहीत.भारत मात्र आज जागतिक क्रिकेटची सर्व सुत्र आपल्याकडे बाळगुन आहे.पण अमेरिका,रशिया,चीन सारखे देश क्रिकेट का खेळत नाहीत?असा प्रश्न मला व अनेकांना पडत असे.नंतर या प्रश्नाचा उलगडा झाला.
क्रिकेट खेळच फार लांबलचक….
क्रिकेट हा खेळ तसा खुप लांबलचकच ! दिवसभर खेळला जातो.तर एक सामना सहा दिवस म्हणजे पुर्वीचा कसोटी सामना चाले.त्यानंतर निकाल ! बहुदा दोन्ही इनिंग पुर्ण न झाल्यामुळे अनिर्णित राहायचा. नंतर सहा दिवसांवरुन कसोटी सामना पाच दिवसांवर आणला गेला.त्यानंतर 60 ओव्हरचा एकदिवशीय सामना सुरु झाला.नंतर 50ओव्हरचा एकदिवसीय क्रिकेट सामना सुरु झाला. एका दिवसात निकालने !अन्यथा पाच सहा दिवस क्रिकेटपटु,अंपायर,कामेंटेटर आणि लाखो करोडो क्रिकेट शौकिन या एकाच खेळात गुंतुन रहायचे.
क्रिकेट आणि आलिंपिकमधील स्थिती…
भारतात क्रिकेटचे वेड वाढत गेले.तसे इतर भारतीय व ऑलिंपिक मधील खेळ यांची आवड राहिली नाही.हाकीमधे 7/8 वेळा भारतीय हाकीपटुंनी जगात प्रथम क्रमांक मिळवुनही त्यांना मान सन्मान या देशात व सरकारकडून मिळाला नाही.क्रिकेटपटू कोट्याधीश झाले.त्यामुळे धनराज पिल्लेसारख्या अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आपण पाहिली.आधुनिक चीन व भारत जवळपास एकाच वेळेस निर्माण झाले.तो चीन आलिंपिकमधे अमेरिकेबरोबर जगात प्रथम क्रमांकासाठी स्पर्धां करु लागला.भारत कसेबसे एखादे रोप्य किंवा ब्रांझ पदक मिळवून हात हालवत मायदेशी परतु लागला.लोकसंख्या त्या काळात जगात दुसर्या क्रमांकाची होती.आता लोकसंख्येचे सुवर्णपदक मात्र भारताने चीनला मागे टाकुन पटकावले आहे.
क्रिकेट मुळे भारतातील इतर सर्व खेळ मागे पडले.जगात हो एक विनोद मानला जावू लागला.एवढी मोठी लोकसंख्या आणि आलिंपिकमधे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पदके !
अहम ब्रम्हास्मी. …
पुण्याएवढे आकारमान असलेल्या कोस्टारिका की काय?त्यांचा खेळाडु आलिंपिकमधे सुवर्णपदक मिळवी.क्युबाचा,उ.कोरियाचा,व्हेनेझुएलाचा खेळाडुही पदके मिळवी.आता गेल्या दोन तीन आलिंपिकमधे जरा किमान इज्जत राखण्यात भारताला यश मिळायला लागले आहे.पुर्वी गुरु शिष्याला गदायुद्ध,मल्लयुद्ध,धनुर्विद्या अशा अनेक विद्या शिकवत असे.पण ना कुस्तीत,ना नेमबाजीत, ना धावण्यात साजेशी पदके मिळत आहेत.अजुन कोसो दुर आहोत आपण जागतिक क्रिडा क्षेत्रात! विश्वगुरु नेमके कोनत्या ज्ञानाच्या क्षेत्रात आपण बनणार आहोत ? की सगळ्याच ? अहं ब्रम्हास्मी ! की शुन्यात? (शुन्यवाद)
चीन अमेरिका क्रिकेट का खेळत नाहीत?
क्रिकेट या सगळ्या हानीचे कारण मोठ्या प्रमाणात आहे.सगळी उर्जा क्रिकेटवर केंद्रित झाली तर इतर खेळांसाठी कुठून आणायची? आता अगदी आश्चर्य वाटावे अशी बातमी आली आहे. टी 20 वर्डकपचे काही सामने वेस्ट इंडीजमधे तर काही अमेरिकेत होणार आहेत.अमेरिकेचाही संघ यावेळी स्पर्धेत सहभागी होत आहे.याचा चीन व रशियाला आनंद होवू शकतो ! अमेरिकन्स देखील भारतीयांसारखे क्रिकेटववेडे झाले तर चीन आलिंपिकवर कब्जा मिळवू शकेल या विचाराने ! क्रिकेट खेळाडुंना नाही पण दर्शकांना आळशी बनवतो.कारण तो दिवसभर चालतो.एक दिवस आराम मिळाला तर दुसर्या दिवशीपण आराम करावा वाटतो ! तसे पर्यायाने एक मोठी लोकसंख्या आळशी बनली नाही तर नवल ! उद्या अमेरिकन तज्ञांना,’कुठुन ही अवदसा आठवली?’,असे म्हणण्याची वेळ येवू नये म्हणजे झाले ! सध्या जरी अमेरिकन टिम मधे अनिवासी भारतीय असु शकतील ! भारतीय लोक आपला एखादा रोग काही केल्या सोडत नाहीत. जसे अमेरिकेत जातीनुसार वधु वर सुचक केंद्रे आहेत.तसे.उद्या मंगळावर गेले तरी असे रोग ही मंडळी घेउन जातीलच !
भावी अमेरिकनांचे मात्र आताच वाईट वाटायला लागले आहे!