
Contents
जिवीतहानी व लुट अशा गुन्ह्यांतील आरोपींना 48 तासात पोलिसांनी पकडले !
जिवीतहानी व लुट अशा गुन्ह्यांतील तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले !
शिरुर,दि.11 जुन : (प्रतिनिधी)
जिवितहानी व लुट अशा गुन्ह्यांतील आरोपींना 48 तासात पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. या गुन्ह्यांतील तिघांसह इतर चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
जिवीतहानी व लुट झाली होती. ..
जिवीतहानी व लुट असा आरोप असलेले पुणे जिल्ह्यातील ओतुर पोलिस ठाण्यात भारतीय दंड कायदा कलम 302 प्रमाणे दि.8 जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यामधे नवाब अहमद शेख यांचा मृत्यु झाला होता.नवाब अहमद शेख,वय- 72 वर्षे हे एकटेच ओतुर येथील वडार वस्तीजवळील पानसरे यांच्या पडिक बिल्डींगमधे रहात होते.ते तेथे एकटेच रहात होते.ओतुर येथील कांदा मार्केटमधे मिळेल ते काम करत होते. दि.8 जुन रोजी नवाब अहमद शेख हे रहात असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यांच्या हनुवटी व गळ्यावर मारहाण झाली होती.त्याची चिन्हे दिसत होती.हे ओतुर पोलिसांना आढळून आले होते. त्यांचा गळा दाबून संपवण्यात आले होते . असेही पोलिसांच्या लक्षात आले होते. त्याबाबतची फिर्याद शादाब नवाब शेख,वय-42 वर्ष,राहणार-निमोण तास ,ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद ओतुर पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
अनोळखी इसमांच्या संशयास्पद हालचाली. …
जिवीतहानी व लुट असा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या घटनेमधे अज्ञात व्यक्तीने कोणत्या कारणामुळे हा गुन्हा केला? याचा अंदाज पोलिसांनी केला.त्यानंतर जवळपासचे सर्व सी सी टी वी तपासण्याच्या सुचना मा.पोलिस अधिक्षक श्री.पंकज देशमुख,पुणे ग्रामीण यांनी ओतुर पोलिसांना केल्या.ओतुरचे पोलिस निरीक्षक श्री.अविनाश शिळीमकर,स्थानिक गुन्हे शाखा याचे तपास पथक व ओतुर पोलिस स्टेशनचे तपास पथक अशीज्ञदोन पोलिस पथके तयार करुन घटनास्थळी येणार्या सर्व रोडवरील सी सी टी वी फुटेज तपासण्यास सुरुवात केली.तेव्हा त्यांना घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर सात अनोळखी इसमांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या.त्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यांची ओळख पटवून घेतली.
गुन्ह्याची कबुली दिली? ….
नंतर सफाईदार पद्धतीने ग्रामीण पोलिस व ओतुर पोलिसांनी आरोपी विलास बाबा वाघ,वय-20 वर्षे ,प्रकाश बाबा वाघ, वय-19 वर्षे,भिमा गणेश हिलम,वय-25 वर्षे,हे तिघेही राहणार-कन्या शाळेजवळ,ओतुर,ता.जुन्नर,जि.पुणे यांच्यासह इतर चार विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले.त्यात या सर्वांनी मृत नवाब शेख यांना संपवले आहे. असे तपास केला असल्याचे निष्पन्न झाले. मयत नबाब शेख यांचे दोन मोबाईल फोनही मिळाले.या सर्वांनी कट रचुन लुट करण्याच्या उददे्शाने सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींवर भारतीय दंड विधान कायदा कलम 396,120(ब) हे कलम ही वाढवण्यात आले आहे. आरोपी एक ते तीन यांना माननीय न्यायालयांत हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे.
कामगिरीत वरिष्ठ पोलिस अधिकारी. …
ही कामगिरी पार पाडण्यामधे पोलिस अधीक्षक श्री.पंकज देशमुख,पुणे ग्रामीण, अपर पोलिस अधीक्षक श्री. रमेश चोपडे ,पुणे विभाग,एस डी पी ओ श्री.क्ष्रीधर चौधर,जुन्नर विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक श्री. अविनाश शिळीमकर,ओतुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. लहू थाटे,पोलिस सब इन्पेक्टर अजित पाटील ,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस अंमलदार दिपक साबळे,राजु मोमीण,अतुल डेरे, संदिप वारे,अक्षय नवले,अक्षय सुपे,ओतुर पोलिस स्टेशनचे अंमलदार महेश पठारे,देविदास खेडकर,ज्योतिराम पवार,वाळशीराम भवारी,नदीम तडवी या सर्वांनी पार पाडली आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे हे करत आहेत.
गुन्ह्यामधे क्रुरता…..
हा गुन्हा साधारण नाही.प्रचंड क्रुरता यामधे आहे.कोनत्याही संवेदनशील व्यक्ती हा प्रकार समजल्यानंतर अस्वस्थ झाल्यावाचून राहू शकत नाही. अशा गुन्हेगारांना जबर शिक्षा व्हायला पाहीजेच .असे मत अनेक वाचकांनी सत्यशोधक न्युज, न्युज पोर्टलला प्रतिक्रिया दिली आहे. 72 वर्षीय वृद्धास जो जवळपास निराधार दिसतो आहे.पडक्या घरात आपले उर्वरित आयुष्य घालवत होता.असा वृद्ध काय या वयात कुणाला काही त्रास देत असेल.पण आजकाल थेट माणुस मरु शकतो.इतके निर्दयपणे मारहाण करण्यास ही कुमारवयीन मुले धजावतात तरी कसे.अशा क्रुर घटना क्वचित का होईना शिरुर मधेही झाल्या होत्या. पण या आरोपींचे वय किती कमी आहे.
सामाजिक जबाबदारीचा विषय. …
हा सामाजिक जबाबदारीचा विषय आहे.आपण असे काय पेरले की जे अशी फळे देत आहे. असा विचार समाजाला करावा लागेल. पुणे ग्रामीण शाखेने केलेली त्वरित कारवाई नक्कीच वाखानण्यासारखी आहे.48 तासात या गुन्हेगारांना पकडलं.त्यांच्याकडुन गुन्हा कबुल करुन घेणे.ही कामगिरी नक्कीच कौतुकास पात्र आहे.कानुन के हाथ बहुत लंबे होते है,असे म्हटले जाते.मात्र गांभिर्याने घेत तत्काळ कर्तव्य बजावले तर अशा नराधमांना ‘सुट्टी’नक्कीच मिळणार नाही.इतर या मानसिकतेचे संभाव्य गुन्हेगार यातुन धडा घेतील.तर बरे होईल. या गुन्हेगारांवर कलम 302 लागले जाणे योग्य असेच आहे,असे म्हणता येईल.