
Contents
- 1 भावी आमदार शब्दावरुन पवार – ठाकरे यांच्या कार्यकर्यांमधे मंचर येथे वाद ?
- 1.1 नवनिर्वाचित खासदारांकडून एका नेत्याचा भावी आमदार असा उल्लेख होताच शरद पवार गट व (उद्धव.बा.ठाकरे गट) शिवसेना यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ?
- 1.1.1 मंचर,(ता.आंबेगाव) दि- ११ जून २०२४ : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
- 1.1.2 भावी आमदार आणि राजकारणाची अरिस्टाटल यांची व्याख्या. …
- 1.1.3 धार्मिक अज्ञान ; एक उदाहरण. …
- 1.1.4 भावी आमदार : अजुन विधानसभा निवडणुक व्हायची आहे…
- 1.1.5 मोदी शहा पर्वातील राजकारण. …
- 1.1.6 शिवसैनिकांच्या मग टाळ्या….
- 1.1.7 देवदत्त निकम. ..
- 1.1.8 About The Author
- 1.1 नवनिर्वाचित खासदारांकडून एका नेत्याचा भावी आमदार असा उल्लेख होताच शरद पवार गट व (उद्धव.बा.ठाकरे गट) शिवसेना यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ?
भावी आमदार शब्दावरुन पवार – ठाकरे यांच्या कार्यकर्यांमधे मंचर येथे वाद ?
नवनिर्वाचित खासदारांकडून एका नेत्याचा भावी आमदार असा उल्लेख होताच शरद पवार गट व (उद्धव.बा.ठाकरे गट) शिवसेना यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर ?
मंचर,(ता.आंबेगाव) दि- ११ जून २०२४ : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
भावी आमदार शब्दावरुन पवार (तुतारी) – ठाकरे (मशाल) यांच्या कार्यकर्यांमधे वाद निर्माण झाला. नवनिर्वाचित खासदारांकडून देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख होताच शरद पवार गट व (उद्धव.बा.ठाकरे गट) शिवसेना यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचे मंचर येथे झालेल्या नागरी सत्कार समारंभात नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना या दोन पक्षातील कार्यकर्त्यांमधे वादाची ठिणगी पडली !
भावी आमदार आणि राजकारणाची अरिस्टाटल यांची व्याख्या. …
राजकारण हे अजबच प्रकरण असते. म्हणून अरिस्टाटल ने राजकारण हा बदमाशांचा अखेरचा थांबा स्टॉप असतो.असे म्हटले आहे. ते साधारणपणे तेवीससे वर्षांपुर्वी युनान असे ज्याला म्हटले त्या प्राचीन ग्रिक मधे म्हटले गेले होते.अशी नोंद आहे. अरिस्टाटल ज्याला अरस्तु असेही म्हणतात.हा महापंडित फिलासाफर Phesopher ग्रिक राजा फिलीप यांच्या दरबारात हल्लागार म्हणा किंवा आश्रयाला होता.त्याचा मुलगा राजकुमार अलेक्झांडर ज्याला सिकंदर असेही म्हणतात. एक मुस्लिम मित्र मला म्हणाला की भारतात मुस्लिम धर्म सिकंदराने खरा आणला.आता काय बोयायचे.
सिकंदर किंवा अलेक्झांडर हा इसवी सन पुर्वी साधारणपणे तीनशे ते चारशे वर्षांपुर्वी होवून गेला आहे.इस्लाम इसवी सनानंतर सहाव्या शतकात निर्माण झाला. म्हणजे जवळपास नौशे वर्षिनंतर अस्तित्वात आला.सिकंदराच्या काळात इस्लामच काय ख्रिश्चन धर्मदेखील अस्तित्वात आला नव्हता.नंतर जगावर राज्य करणारे इंग्रज हे आजच्या इंग्लंड बेटांवर आदिम अवस्थेत रहात होते. त्यांचा युरोपशी नंतर संपर्क झाला.मधे समुद्र होता.बहुदा जिला ब्रिटिश खाडी म्हणतात तो हा भाग असावा.
धार्मिक अज्ञान ; एक उदाहरण. …
तर असे धार्मिक बाबतीतील ‘ज्ञान’ सर्व धर्मांच्या अनुयायांमधे दिसुन येते.पुर्वी सर्वच हिंदु होते.असे सांगणारी एक संघटनाच आहे.पण हा शब्दच मुळात अकराव्या बाराव्या शतकात प्रथम आढळतो.तो पारशी लोकांनी आजच्या भारतातील सर्व लोकांसाठी वापरला आहे.पारशी डिक्शनरीत हा शब्द आहे.त्यापुर्वीचे साहित्य वेद,उपनिषदे,पुराणे,ब्राम्हण्यके,आरण्यके,रामायण,महाभारत या संस्कृत ग्रंथांमधे सुद्धा आढळत नाही.ज्ञानेश्वरी या मराठी ग्रंथात सुद्धा आढळत नाही. असे समजल्यावर सुद्धा तो माणुस ऐकायला तयार नसतो.हे ही ‘ज्ञान’ तसेच !
भावी आमदार : अजुन विधानसभा निवडणुक व्हायची आहे…
राजकारणावरुन विषय निघाला.पण अजुन विधानसभा निवडणूक पुढे बर्याच दिवसांनंतर आहे.आणि अजुन बर्याच घडामोडी घडायच्यात.आघाड्या बिघाड्या व्हायच्यात.जागावाटप ह्वायचे आहे.मग उमेदवारांच्या मुलाखतीचे वगैरे फार्स व्हायचे आहेत.मग उमेदवार निश्चित होईल.अनेक उमेदवार रिंगणात असतील.निवडणुक होईल.वादग्रस्त ईव्हीएम मशिनद्वारे त्या होतील.हे जवळपास निश्चित आहे. मग त्यात काय होते ते त्यावर आक्षेप घेणार्या लोकांना माहिती आहे,असा त्यांचा दावा असतो. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. कोणीतरी निवडुन येईल किंवा आणले जाईल.मग तो आमदार होईलच.
मोदी शहा पर्वातील राजकारण. …
पण वर अरीस्टाटलचे एक वाक्य आपण कोट केलं आहे.ते खरं वाटावं असच आजही म्हणावे लागेल की काय? कार्यकर्त्यांना पुढे करुन आपला दावा पुढे रेटायचा .असाही प्रकार असतो.दबावतंत्र असे म्हणतात म्हणे त्याला ! ते करायला कार्यकर्यांची उत्साह कामी येत असावा.पण चांगले आहे. निष्ठा असणे काही वाईट नाही.आता तर कार्यकर्ते नेत्यापेक्षा जास्त मुत्सद्दी निघायला सुरुवात झाली आहे. हे नवे पर्व शहा मोदींनी कोनते ते आपरेशन कमळ सुरु केले.तेव्हापासुन !ऐतिहासिक नोंद घ्यावी असे सर्व राजकारण आजच्या घडीला सुरु झाले आहे. हे मात्र खरे ! आणि अरास्टाटल महाराजांनी उद्गारलेले वाक्य आजच्या स्धितीत कसे असू शकते ते एखादा महापंडितच सांगु शकतो.
शिवसैनिकांच्या मग टाळ्या….
तर शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल डा.अमोल कोल्हे यांचा मंचर येथे सवाद्य मिरवणूक व नागरी सत्कार समारंभ करण्यात आला होता. या समारंभात व्यासपीठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व संघटन मंत्री या दोन वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा जागांपैकी दोन जागा विशेषतः आंबेगाव विधानसभा जागेचा समावेश असावा असा उल्लेख करताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
देवदत्त निकम. ..
या पार्श्वभूमीवर बोलत असताना ‘ देवदत्त निकम यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांनी उत्कृष्ट नियोजन केले’ असे सांगत असतानाच त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करताच शिवसेनेतील प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यासपीठ सोडून जोरदार घोषणाबाजी केला. संताप व्यक्त करत गोंधळ घातला.
शिवसेना कार्यकर्त्यांचा गोंधळ व घोषणाबाजी पाहून खासदारांनाही आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.
यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांना शांत व समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी डॉक्टर कोल्हे कार्यकर्त्याजवळ आले असता ‘तुम्हाला उमेदवार निवडीचा अधिकार कोणी दिला’ असा जाब शिवसैनिकाकडून जागेवरच विचारून संताप व्यक्त केला गेला.
मंचर शहर येथील नागरी सत्कार समारंभामध्ये नागरिकांना याची डोळा याही देही गोंधळ दोन पक्षातील वादावादी अंतर्गत वाद पहावयास मिळाला.