आदर्श शिक्षिका पुरस्कार ‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल’ कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल कांचन सोनवणे पाटील !
आदर्श शिक्षिका पुरस्कार 'माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल' कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल कांचन सोनवणे पाटील यांना मिळाला आहे. त्यामुळे कारेगाव,शिरुर व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आदर्श शिक्षिका पुरस्कार ‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल’ कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल कांचन सोनवणे पाटील !
आदर्श शिक्षिका ठरल्या कारेगावच्या कांचन सोनवणे !
शिरूर :
श्री.अनिल डांगे
(अनिल डांगे यांच्याकडून)
आदर्श शिक्षिका पुरस्कार ‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल’ कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल कांचन सोनवणे पाटील यांना मिळाला आहे. त्यामुळे कारेगाव,शिरुर व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवारांना दरवर्षी ‘ग्रामीण युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य’ यांच्यावतीने विशेष पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी संपूर्ण महाराष्ष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवारंकडून विहित नमुन्यात नामांकन अर्ज मागविण्यात आले होते.
मोठ्या प्रमाणात आलेल्या नामांकन अर्जाची छाननी करुन निवड समितीने मोठ्या मुश्किलीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांची निवड निश्चित केल्याचे जाहीर करुन शैक्षणिक क्षेत्रातील “आदर्श शिक्षिका” हा मानाचा पुरस्कार माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल सौ. कांचन सोनवणे पाटील यांना जाहीर झाल्याचे घोषित केले असल्याची माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या वतीने प्रतिनिधी शौकत शेख आणि शकील मानियार यांनी सांगितले.
आदर्श शिक्षिका सौ.कांचन सोनवणे येणार गौरव ग्रंथात !
हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार असून मान्यवारांच्या शुभहस्ते पुरस्कार्थीना या कार्यक्रम प्रसंगी विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचे प्रतिनिधी शेख यांनी पुढे सांगितले. तसेच सर्व पुरस्कार्थी मान्यवारांचा अल्पपरिचय आणि त्यांच्या कार्याचा लेखाजोखा ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘गौरव ग्रंथ’ या पुस्तकातून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही प्रतिनिधी मानियार यांनी सांगितले.
आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड झाल्याने सौ. कांचन सोनवणे यांनी द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले असून यापुढे आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक उत्साहाने आणि जोमाने काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार असून हा पुरस्कार सर्व ‘माईलस्टोन’ टिमला समर्पित करत असल्याचे सोनवणे मॅडम यांनी सांगितले.
कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव. …
त्यांच्या निवडीने ‘माईलस्टोन’ चे सर्व संचालक, शिक्षक वृंद, पालक आणि सर्व विद्यार्थी तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर विशेष कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यानिमित्ताने काही बाबींवर सत्यशोधक न्युज न्युज पोर्टल ची टिम काही भाष्य नक्कीच करणार आहे. वर्तमानपत्रांप्रमाणे डिजीटल माध्यमांना खुप स्वातंत्र आहे.वर संपादक नाही.त्याची strategy नाही.जाहिरातदारांची मनधरणी नाही.शब्दांना संख्येची मर्यादा नाही.कोनताही व्यक्ती अशी साईट सुरु करू शकतो.अभिव्यक्त होवू शकतो.इथे कोनती लाबी नसते.पुर्वग्रह नसतात.
आजवर खर्या आदर्शांना पुरस्कार दिला गेला नाही…
आदर्श शिक्षिका किंवा आदर्श शिक्षक हे आताच्या काळात दुर्मिळ झाले आहेत.त्या सौ. सोनवणे मॅडम यांचे अभिनंदन केले पाहीजे. ग्रामीण युवा पत्रकार संघांचे अभिनंदन केले पाहीजे. प्रस्थापित व्यवस्थेने कधी खर्या आदर्शांना पुरस्कार दिले असतील असे वाटत नाही. आदर्शाची व्याख्या आता नेमकी कोनती आहे,यावर संशोधन करावे लागेल, असे म्हटले तर अवास्तव होईल असे कोणी म्हणणार नाही.शिक्षक त्याच्या विद्यार्थी कोणत्या दर्जाचा आहे यावरुन समजते.
सरकारी शाळांची व्यवस्था ऐशीतैशीच….
आज शिक्षक copy पुरवतात.विशेषतः दहावी बारावीच्या परीक्षेच्या वेळी हे आपण पेपर देवून वर्गातुन बाहेर पडणाऱ्या आजच्या विद्यार्थांच्या गप्पा ऐका ! म्हणजे समजेल.सातवीच्या कित्येक विद्यार्थांना मराठी वाचता येत नाही. सरकारी शाळांतील शिक्षकांची मुले खाजगी शाळेत शिक्षक टाकत असतात. मग सरकारी शाळांतील मुलांना A B C D कशी येईल?दिल्ली मधे तेथील मुख्यमंत्र्यांनी सरकारी शाळांची व्यवस्था बदलली.चित्र पालटले.हे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिसत नाही असे नाही. पण प्राधान्यक्रम वेगळे.मग आधी खुर्ची वाचवणे,ईडीपासुन बचाव करणे,आमदार धरुन ठेवने म्हणजे दुसऱ्या बाजूला जाणार नाहीत यावर आपली ताकद लावणे.सुमार दर्जाचे राजकिय कार्यकर्ते सांभाळणे,इ.गोष्टींवर सर्व उर्जा ,पैसा जाणार नाही तर काय होईल? शिक्षकांचा राजकिय कार्यकर्त्यासारखा वापर करणे,मग शिक्षक कशाला कुणाची काळजी वाहील?वर आमदार त्याचा माणुस,किंवा तो आमदाराचा माणुस असल्यावर !
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे एक चित्र. …
मी एकदा फिल्डवर्कवर काम करत असताना एका गावातील मुख्याध्यापकांनी प्रत्येक शालेय पुस्तकात आधी जी घटनेची उद्देशिका असते ती पाहिलीच नव्हती! त्यातल्या स्वातंत्र्य,समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता,गणतंत्र, समाजवादी,सार्वभौम या शब्दांचा अर्थ सांगता येईना ! तोच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. त्याचा थांगपत्ता नाही.दहावीपर्यंत मुले नुसती वर ढककली जात आहे. खाजगी शाळामधे नियमित ट्युटोरियल मधे विद्यार्थ्याला 100% मार्क्स असतात.पण चक्क मराठी भाषेतील लिखाण वाचता येत नाही. म्हणजे काय समजायचे ! मात्रभाषेचे एकुणच जिवनात काय महत्व असते हे स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शिकवणार्या पालकांना नेमके कोण सांगणार.पुढे सीइटी,वगैरे परिक्षामधे पुन्हा स्पर्धेत कशी दमझाक होते,त्याचा अनुभव पालकांना आहे.
लिहावयाचा उद्देश हा आहे की समाजधुरीनांची जबाबदारी आज जास्त वाढली आहे. अशाच समाजधुरीनांपैकी एक सौ.सोनवणे मॅडम आहेत.त्यांचा उचीत असाच हा गौरव आहे.पत्रकार बांधवांचा असा उपक्रम स्तुत्य निश्चित स्तुत्य आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com