चॅरिटेबल ट्रस्ट, ‘ममता’ कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात !
चॅरिटेबल ट्रस्ट, 'ममता' कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. चॅरिटेबल ट्रस्ट,'ममता' चे श्री.नितीन दादा पाटील यांच्या हस्ते 'माझी जीवन शाळा' च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले आहे.या नवीन शाळा व उपक्रमाचे शिरुर शहरातील नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.
शिरुर, दि.17 जुन : ( डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज)
चॅरिटेबल ट्रस्ट, ‘ममता’ कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. चॅरिटेबल ट्रस्ट,’ममता’ चे श्री.नितीन दादा पाटील यांच्या हस्ते ‘माझी जीवन शाळा’ च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले आहे.या नवीन शाळा व उपक्रमाचे शिरुर शहरातील नागरिकांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.
Pay back to Society. ..
तसे खुप चॅरिटेबल ट्रस्ट देशात आहेत.ते सामाजिक, सेवाभावी उपक्रम चालवतात.शाळा वृद्धाश्रम वगैरे चालवतात. त्यांच्या मागे हेतु मात्र वेगळा असतो. राजकारण करणे,जातीभेद करणे किंवा कर वाचवणे असे बरेच काही हेतू असतात.तर काही स्वत:कडे काहीही अतिरिक्त धन नसताना एका सामाजिक जाणिवेतुन समाजाला Pay Back To Society ‘ या तत्वानुसार कार्य करत असताना दिसतात.म्हणून ,’ दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती !‘ या उक्तीप्रमाणे अशा कार्याचा गौरव तर केला पाहीजेच. पण त्याला तन मन धनाने सहकार्य करणे हे देखील समाजाचे एक कर्तव्य असते.
चॅरिटेबल ट्रस्ट, ‘ममता’ कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला -शिरुर
दानशुरतेमागचे रहस्य?….
शिरुरमधे ही दानशुर काही कमी नाहीत. पण अंधश्रध्दामुलक कार्यांना (?) दान देत असतात.एक वृद्धाश्रम शिरुर ला आहे.काही वर्षांपुर्वी आमची टिम त्याला भेट द्यायला गेली होती.सरकारी मदत न घेता आम्ही कसे उत्कृष्ट वृद्धाश्रम चालवतो ते त्यांनी सांगितले. हळुच आवाजात असेही सांगितले की,’ आम्ही फक्त मारवाडी, ब्राम्हण व फार फार तर मराठ्यांनाच प्रवेश देतो. बाकीच्यांना कशाला उगच इथे घ्यायचे?’.तर अशी मानसिकता ! तर काहींचा दानधर्म म्हणजे ,’ सौ की दाढी निकालना और एक को शेंडी लगाना ‘ असा आहे. शंभर रुपयांचे शोषण समाजाचे करायचे आणि पाच लोकांना दान द्यायचे. म्हणजे पंच्यांनव लोकांचे केलेले आर्थिक शोषण लपवणे हा त्या मागचा उद्देश ! शिवाय हा दानधर्म बहुदा तथाकथित धार्मिक उपक्रमांना द्यायचा. कदाचित यांना धर्म म्हणजे अफुची गोळी आहे हे चांगले माहित असावे. दारुच्या नशेप्रमाणे धर्माची नशा असते.आपल्याकडे धर्म ‘आप’क्षा जातीची नशा जरा जास्तच असते ! तो भाग वेगळा !
छोट्या विद्यार्थींना झालेला आनंद अवर्नणीय !
Slaves are enjoying slavery…..
त्या नशेत लोक त्यांचे किमान आर्थिक शोषण कसे होते, याचा विचार करायचाही विसरुन जावेत. हे देशात सर्वत्र असल्याने हे सहज वाटते. समाजालाही आनंद वाटतो. Slaves are enjoying Slavery असा सर्व प्रकार होवून जातो. प्रबोधनाचे कार्यक्रम , व्याख्यानमाला होतात.त्याला उपस्थिती कमी असते.काही वेळा तर मुद्दाम लोकांना Divert करण्यासाठी त्याच दिवशी त्याच वेळेला दुसरा असा slavers ला आवडणारा आणि मनोरंजक कार्यक्रम ठेवला जातो. त्यात आणखीन राजकिय प्रभाव वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सुमार अक्कल असलेले लोकप्रतीनिधी करताना दिसत असतात. यथा राजा तथा प्रजा असते.तसे यथा प्रजा तथा राजा ही असते. हे आपण विसरत असतो. लोकनिंदेच्या भयास्तव बुद्धिजीवी याकडे दुर्लक्ष करतात. शिरुर शहरातील बुद्धीजीवींबद्दल नंतर लिहीता येइल ! हे ही लिहिण्याचे कारण हे आहे की आमच्या पोर्टलच्या नावात ‘ सत्यशोधक‘ हा शब्द आम्ही विनाकारण घेतलेला नाही.आणि ही ‘ सत्यशोधक’ ची सुरुवात आहे. ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है’ हे समजून जावे.
अविस्मरणीय क्षण!
ममता चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रशंसनीय कार्य. ..
तर गरीब, निराधार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात आणि मायेची उब देणारी संस्था म्हणजे ‘ ममता चॅरिटेबल ट्रस्ट !’ ही शिरुर मधे उदयाला आली आहे. या सामाजिक संस्थेमार्फत शिरूर येथील गरीब, गरजू मुलांना,विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन पाटील दादा यांनी दप्तर वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. ‘ सावली ‘ संस्थेमार्फत ‘ माझी जीवन शाळा ‘ आपल्या शिरूर शहरात घेतली जात आहे. गोरगरिबांच्या मुलांना फ्री शिक्षण दिले जात आहे . त्या शाळेला मायेची ऊब देणारी संस्था म्हणजे ‘ममता चॅरिटेबल ट्रस्ट’ ही आहे. या सामाजिक संस्थेमार्फत श्री. नितीन दादा पाटील यांनी दप्तर वाटपाचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमात नितीन दादा पाटील , राऊत सर, समीर सर शाळेच्या शिक्षिका पल्लवी इसावे आणि पालकवर्ग उपस्थित होता .
एकंदरीत अशा कार्यक्रमाची दखल पारंपारीक मिडीया घेत नाही. पण जग नित्य बदलत असते. पापाचे घडे भरत असतात. तसेच पितपत्रकारितेचा अतिरेक आपण पाहीला . मांजराला वाटते आपण डोळे मिटले तर माणसांचेही डोळे मिळतात. तसा मुख्य प्रवाहातील मिडीया समजत होता. एक मोठे गंडांतर भारतीय लोकशाहीवर आले होते. अशा ‘ आणीबाणीच्या ‘ काळात भारतातील यु ट्यूबर, ब्लागर, फेसबूक, व्हाट्सएप इ.आधुनिक तंत्रज्ञान आले. त्यावर भारतीय लोकांनी भरभरुन विश्वास ठेवला. देशाला मोठ्या संकटातून वाचवले. हे सारख्या जगाने पाहिले. त्यातुन धडा घेतला पाहिजे !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com