

Contents
शिरूर पोलिस स्टेशन चे पी आय मा.श्री.ज्योतीराम गुंजवटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतली पहिल्यांदाच पत्रकार परिषद !
शिरुर पोलिस स्टेशन चे पथक शांतताभंग रोखण्यासाठी व शाळा,काॅलेजेस सुरु होणार असल्याने रोडरोमियोच्या बंदोबस्तासाठी सज्ज !
शिरुर, दि. 17 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
शिरूर पोलिस स्टेशन चे पी आय मा.श्री.ज्योतीराम गुंजवटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतली पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. आता शिरुर पोलिस स्टेशन चे पथक शांतताभंग रोखण्यासाठी व शाळा,काॅलेजेस सुरु होणार असल्याने रोडरोमियोच्या बंदोबस्तासाठी सज्ज असल्याचे सांगत ‘असामाजिक घटकां ‘ ना इशारा दिला आहे.
शिरुर पोलिसांचा चांगला लौकीक. …
शिरुर पोलिस स्टेशन हे आपल्या सकारात्मक कार्यासाठी प्रसिद्ध आहे.तत्पर आहे. अनेक एक से एक मोठी,अवघड,गुंतागुंतीचे गुन्हे आणि गुन्हेगार शिरुर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.शिरुर पोलिस स्टेशन ला एक से एक बढकर अधिकार्यांची परंपरा आहे. श्री.ज्योतिराम गुंजवटे यांनी काही दिवसांपूर्वी शिरुरचा चार्ज घेतला होता.आणि ही परंपरा पुढे चालु ठेवली आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणुक 2024 चा मोठा कार्यक्रम शांतता व सुव्यवस्थेत पार पडला.शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये निवडणुक शांततेत पार पडली.
जुन महिना आला. शाळा काॅलेजेस सुरु होणार असल्याने विद्यार्थी विद्यार्थीनी यांची शिरुर शहरात सुरु होणार. तारुण्यसुलभ आकर्षणातुन आपण सर्व वयाच्या एका टप्प्यावर गेलेलो असतो. जाणार असतो. जात असतात.पण आपल्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश नाही.त्यामुळे तरुण वयात निर्माण होणारे भावभावनांचे कल्लोळ ,त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करावे ? याचे कोनतेही शिक्षण तरुण तरुणी यांना नाही.उलट विकृत लैंगिक भावनांवर आधारलेल्या हिंदी चित्रपटांचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न कळत नकळत तरुण तरुणी आणि समाज यांमधे होते.उदाहरणार्थ डर चित्रपट !
शिरुरचे पोलिस निरीक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांनी घेतली पत्रकार परिषद. ….
वरील पार्श्वभूमीवर नहमीप्रमाणे शिरुर पोलिस स्टेशन मधे आज दि-१७ जून २०२४ रोजी सकाळी ११:३० वा सुरू झालेल्या मिटिंग मध्ये पी.आय.ज्योतीराम गुंजवटे पत्रकारांशी विविध विषयांवर सवांद साधला.सुचना दिल्या.माहीती दिली.एक मुद्दाअसाही होता की पत्रकार,सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला ,धमकी, इजा झाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.त्याचबरोबरीने शिरूर शहरातील मुख्य रस्त्यावर होणाऱ्या बेशिस्त पार्किंग वर कारवाई करण्यात येणार आहे. शिरूर नगरपालिकेकडे प्रस्ताव देऊन सम-विषम ,पार्किंग बोर्ड पार्किंग बोर्ड,नो पार्किंग बोर्ड,विविध ठिकाणी लावला जाणार आहे वगैरे.
चिंतनीय बाबींमधे काही विचार होणे आवश्यक आहे.आजचा काळ असा आहे की वाईट करणे यापेक्षा चांगले करणे अवघड आहे. त्याला प्रतिष्ठा नाही. भ्रष्ट ,भाई,बदफैलींच्या भोवती माणसे जमा होतात.सज्जनांपासून दुर जातात.त्यामुळे माध्यमांतील बातमीदार,पत्रकार, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक उत्साहाने आणि त्याग करणारे लोक प्रस्थापितांना नको असतात. ते त्यांना कोणत्या ना कोनत्याही मार्गाने त्रास देवू पहात असतात.हे खरे आहे.
आता दंगली होत नाहीत. …..
राजकारणात पुर्वी नेते पक्ष बदलत,भूमिका बदलत असत.पण आता नेत्यांपेक्षा कार्यकर्ते मुत्सद्दी झाले आहेत. गेल्या दोन तीन वर्षांत अनेक पक्षाचे,संघटना,नेते,चिन्हे, आमदार ,खासदार ईडीच्या भितीने म्हणजेच पैसा,संपत्ती जी गेल्या 50 वर्षात निर्माण केली गेली होती.तिच्यावर घाव घातला गेल्यावर सैरावैरा वळु लागले.पण एक गोष्ट त्यात अनेकांच्या लक्षात आली नाही.ती म्हणजे कार्यकर्त्यांची या मधे काय भूमिका राहिली?तर नेत्यांपेक्षा कार्यकर्ते जास्त सावध राहिले.स्वताची सुरक्षितता विशेषतः आर्थिक हितसंबंध ध्यानात घेउन आपला,गट,पक्ष,नाव,झेंडा,चिन्ह निवडले.आता दंगली होत नाहीत. कारण कार्यकर्त्यांना समजुन चुकले आहे.की त्या गोष्टी राजकिय हेतूने असतात.व्यक्तीगत संबंध चांगले ठेवले जातात.नंतर कार्यकर्त्यांना दिर्घकाळ कोर्ट कचेर्या कराव्या लागतात.इतर लोक पळून जातात.
धर्माचा मुद्दा. ….
धर्माची मुद्दा ! धार्मिक उपक्रमांना, कार्यक्रमांना ,सभांना नेहमी एवढा मोठा पोलिस व तत्सम सरकारी यंत्रणा कामाला लावावी लागते.सलोखा समिती काय शांतता कमिटी काय निर्माण कराव्या लागतात.त्या मागे होणारा खर्च करावा लागतो.एक तर जगात असा एक माणुस सापडणे शक्य नाही की तो त्याच्या स्वतःच्या धर्माची पालन करतो आहे. नाहीच. नाटके करतो आहे.धर्म स्वतःच्या सोईनुसार वापरु पहात आहे. सर्व धर्म कालबाह्य झाले आहेत. याचा एकच आणि मोठा पुरावा भरपुर आहे.सर्वश्रेष्ट ईश्वर वगैरे अंतिम, जिला कोणीच निर्माण करु शकत नाही.नष्टही करु शकत नाही. अशा अंतिम सत्तेपेक्षा कोरोना सर्वश्रेष्ट झाला.त्याला घाबरुन सर्व जगाने आपली झाले खिडक्या बंद केल्या.प्रार्थनास्थळांमधे जायचेही बंद केले.तर खराच धार्मिक माणुस असता तर त्याने किमान आपल्या देव,धर्म याला तरी असे बाजुला केले नसते.हे सर्व जगाने पाहिले. इथे सर्वांची परिक्षा झाली.जग चालविणार्या आर्थिक, राजकिय शक्तींनी ती परीक्षा घेतली असावी.पण आपली धार्मिकता,देव,धर्म,पंथ वगैरेची दांभिकता बाहेर आली ! इथे लिहीण्याची इच्छा का तर कुणीतरी एकदा हे बोलावेच लागेल ! लिहावेच लागेल.दरवर्षी सर्व तथाकथित धार्मिक भावना,सामाजिक सलोखा, शांतता कमिटी, पोलिसांची होणारी फरपट ! सरकारी म्हणजेच जनतेची पैसा वायाला जातो आहे.
शिरुर पोलिस स्टेशन कडून रोड-रोमियो चा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली जाणार आहेत. सण-उत्सवांदरम्यान नागरिकांना सण , उत्सव याचा आनंद जास्तीत- जास्त घेता यावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत मात्र डी-जे च्या कर्ण-कर्कश आवाजावर मर्यादा आणणार हे ही या अधिकार्यांनी बजावले आहे.