
रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशन
Contents
रांजणगाव पोलिसांचे दुर्लक्ष, ‘ या केस ‘ मधे ‘ गंभीर’ बाब ठरु शकते ?
रांजणगाव पोलिसांकडे व सत्यशोधक न्युज कडे पिडीताची जीव वाचविण्यासाठी धाव ?
शिरुर दि.20 जुन : (प्रतिनिधी)
रांजणगाव पोलिसांचे दुर्लक्ष, ‘ या केस ‘ मधे ‘ गंभीर’ बाब ठरु शकते ? यातील पिडितानेरांजणगाव पोलिसांकडे व ‘सत्यशोधक न्युज’ कडे जीव वाचविण्यासाठी धाव घेतली आहे.असे दिसते. एक जबादार पत्रकार व सत्यशोधक न्युज, न्युज पोर्टल या विषयात विनंतीच करत आहोत.कारण या केसमधे गुंतागुंत तर आहेच पण याआधी यातील पिडीत फिर्यादी अजित हनुमंत ढेरंगे,वय – 23 वर्षे, राहणार- हमालवाडी ,कुरूंद, ता.पारनेर,जि.अहमदनगर असे आहे.
रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना….
रांजणगाव पोलिस स्टेशनने या केसमधे 15 फेब्रुवारीला फिर्यादी याची फिर्याद रांजणगाव पोलिस स्टेशनला दाखल केली होती. रांजणगाव पोलिस स्टेशनने या प्रकरणातील आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 307,364,141,143,144,148149,504,506 आर्म अक्ट 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेली ही घटना होती.ती अशी की दिनांक. 14 फेब्रुवारी 2024 रोजी रांजणगाव ते बाभुळसर रोडला हा प्रसंग घडला होता. जखमी फिर्यादी मैक्स केअर हास्पिटल, मंचर येथे आय सी यु मधे असताना जबाब दिला होता.फिर्यादीवर आरोपी ज्यांची संख्या 6 आहे. त्यात एक महिला आहे यांनी फिर्यादी अजित ढेरंगे याला गाडीत बसवून भांबार्डे येथे जिथे महिला आरोपीचे घर आहे.तेथील डोंगरावर नेले होते. तेथे त्याच्यावर प्राणघातक वस्तुंनी अनेक आघात व घाव केले होते.नंतर तो मरणासन्न अवस्थेत तेथे पडला .
बेशुद्ध अवस्थेतुन थोडी शुद्ध आल्यावर तो कसाबसा रस्यावर आला.रस्त्यावर तो पडला.कोणीतरी त्याला केली.नंतर तो मंचर येथील दवाखान्यात उपचार घेत असताना पोलिसांनी त्याचा जाब घेउन पुढील तपास सुरू केला होता.आरोपींवर रांजणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
प्रेमसंबंधांचा मामला?
आरोपींनी अजित ढेरंगे याला इतक्या जबर अशा प्रकारची मारहाण ,वार तर महिला आरोपीने फिर्यादीत लिखीत माहितीनुसार चपलीने भरपुर मारले होते.जवळ जवळ जीव गेला आहे .समजुन ते हल्याच्या ठिकाणाहून बरोबर आणलेल्या गाडीतून माघारी गेले होते.अजित ढेरंगेच्या अंगावरील जखमा व प्राणघातक वस्तुने केलेले आघात यावरुन या घटनेची गांभिर्यता स्पष्ट होते. फिर्यादी अजित ढेरंगे व इतर महिलेसह सहा जण हे आधी एकमेकांना ओळखत होते.भेटत होते. यात दुसरी महत्वाची बाब म्हणजे अजित ढेरंगे याच्या म्हणण्यानुसार त्याची व महिला आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते.
महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप. …
ती विवाहीत आहे,असे तिने अजित ढेरंगेला सांगितले नव्हते.म्हणून त्याने जिच्याशी प्रेमसंबंध सुरु केले होते.आरोपींमधील दोन जण या महिलेचे भाऊ आहेत.त्यांना हे पटले नव्हते.नंतर या महिलेने अजित ढेरंगे याच्यावर लैंगिक त्रास केल्याचा आरोप केला होता. त्यामधे अजित ढेरंगे तुरुंगातही होता.परंतू तुरुंगातुन घरी परत आला. तेव्हा आरोपी त्याला त्याने जी फिर्याद रांजणगाव पोलिस स्टेशनला दिली होती ती मागे घेण्यासाठी सांगत होते.
त्याचाच पुढचा भाग म्हणजे त्याला फोन करून आरोपींनी केस मागे घेण्याच्या संदर्भात रांजणगावला बोलवले होते.तेथे अजित ढेरंगे आणि त्याचा एक मित्र व आरोपी यांचे बोलणेही चालू होते.तेथे ते बियरही पित बोलत राहिले. त्यावेळी एका गाडीतून अजित ढेरंगे याला वर सांगितलेल्या ठिकाणी नेऊन जबर प्राणघातक हल्ला त्याच्यावर केला होता. त्यातुन तो वाचला.
मृत्युच्या दाढेतुन माघारी. …
आता या घटनेनंतर काही आरोपींना रांजणगाव पोलिसांनी अटक केली होती तर काही जण त्यावेळी सापडले नव्हते.अजित ढेरंगे याच्या म्हणण्यानुसार ते बाहेर फिरतही आहेत.पण त्यांना अद्याप अटक का केली गेली नाही.महिला आरोपीला जामीणही मिळाला असल्याचे अजित ढेरंगे सांगत आहे.मृत्युच्या दाढेतुन माघारी आलेल्या अजित ढेरंगे याच्या म्हणण्यानुसार त्याला त्याच्या घरी जाऊन व रस्त्यात अडवून त्याने दाखल असलेली व वर लिहिलेली कलमे लागली गेलेली फिर्याद मागे घेण्यासाठी धमकी दिली गेली. त्यानंतर त्याने रांजणगाव पोलिस स्टेशनला याबाबत त्याच्या जिवाला धोका आहे, असे त्याने कळवलेही आहे.
आधी एकदा जीव कसाबसा वाचल्यानंतर अशा धमक्यांमुळे अजित ढेरंगे हा भयभित अवस्थेत आहे.असे त्याने सांगितले आहे.उरलेल्या आरोपींना रांजणगाव पोलिसांनी पकडावे अशी भितीपोटी तो वारंवार सांगत आहे.
लाजवर देखील घेउन जात होता. …
अजित ढेरंगे व आरोपी महिला यांचे शरीरसंबंधही होते.असे तो सांगत आहेच.पण नंतर या महिलेने अजित ढेरंगे याच्यावर लैंगिक त्रासाचा आरोप करत त्याला तुरुंगात धाडले होते.हा काय प्रकार आहे? अजित ढेरंगे हा या महिला आरोपीला लाजवर देखील घेउन जात असे,असे सांगतो.मग यात काय सत्य आहे? महिला आरोपी अविवाहित आहे सांगुन अजित ढेरंगे बरोबर संबंध ठेवत असेल तर तिने अजित ढेरंगे वर लैंगिक त्रासाचा आरोप कसा केला ? कशासाठी केला ? महिला आरोपीच्या भावांना हे कृत्य अपमानास्पद व सामाजिक बेइज्जतीचे वाटणे स्वाभाविक आहे.पण त्यांनी कायद्याचा आधार न घेता अजित ढेरंगे याला संपविण्याचा विचार केला व प्रयत्न केला.हे फिर्यादीतील नोंदी व पोलिसांनी केलेली कारवाई व दाखल केलेली कलमे स्पष्ट करतात.
याक्षणी अजित ढेरंगे याने ही फिर्याद मागे घ्यावी अन्यथा त्याला संपविण्याची धमकी दिली जात असल्याचे तो सांगत आहे. अशा स्थितीत हा विषय संवेदनशिल आहे.पुन्हा अजित ढेरंगेवर हल्ला झाल्यास व त्याचा शेवट झाल्यास रांजणगाव पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभुत ठरेल का ? असे प्रश्न निर्माण होत आहे.एकंदरीत अजित ढेरंगे याने सत्यशोधक न्युज कडे ही माहिती सांगितली व मदत मागितली आहे. अशा स्थितीत संभाव्यता लक्षात घेऊन आम्ही या विषयाला वाचा फोडत आहोत. यात आम्ही लिहिलेली माहिती ही एफ आर आय जो रांजणगाव पोलिसांनी नोंदवला होता तो व आता अजित ढेरंगे जे सांगत आहे त्यावरुन लिहीत आहोत.
23 वर्षीय असलेला व अविवाहित असलेला (त्याच्या म्हणण्यानुसार) हा भयभित आहे.त्याला कामानिमीत्त रांजणगाव व इतर ठिकाणी जावे लागते.तो ड्रायव्हर आहे.हे पाहता रांजणगाव पोलिसांनी यावर योग्य तो तोडगा काढावा.हे अपेक्षित आहे.सामाजिक कर्तव्य भावनेतुन सत्यशोधक न्युज ही बातमी देत आहे.यामागे कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न, हेतु नाही.