ब्रेकिंग न्युज शिरुर मधे इंदिरा गांधी पुतळ्याजवळ तरुणाने केली दहशत !
ब्रेकिंग न्युज शिरुर मधे घडली आहे. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ तरुणाने केली दहशत करत शिरुर असताना शिरुर शहरात एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे या तरुणाकडे आढळली आहेत. असे रात्री उशिरा शिरुर पोलिस सुत्रांकडून वृत हाती आले आहे.
ब्रेकिंग न्युज शिरुर मधे इंदिरा गांधी पुतळ्याजवळ तरुणाने केली दहशत !
ब्रेकिंग न्युज शिरुर शहरात एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे तरुणाकडे ; मध्यवर्ती भागात केली दहशत !
शिरुर, दि. 22 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
ब्रेकिंग न्युज शिरुर मधे घडली आहे. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ तरुणाने केली दहशत करत शिरुर असताना शिरुर शहरात एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे या तरुणाकडे आढळली आहेत. असे रात्री उशिरा शिरुर पोलिस सुत्रांकडून वृत हाती आले आहे.शिरुर शहरातील मध्यवर्ती असलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याजवळच्या भागात दहशत करताना तो आढळून आल्यानंतर शिरुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याचे पोलिस सुत्रांकडून ताजे वृत हाती आले आहे .
गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे?
दि. 21/06/2024 रोजी सायंकाळी 8: 50 वाजण्याच्या . सुमारास शिरूर शहरातील इंदिरा गांधी पुतळाचौक ता. शिरूर, जि. पुणे येथे वैभव नितीन भोईनल्नु, वय – २४वर्षे, रा. कामाठीपुरा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे हा आपल्या ताब्यात गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असे एकुण 30,200-/-रु. किंमतीचा मुददेमाल बेकायदेशीरीत्या विनापरवाना जवळ बाळगलेल्या स्थितीत आढळून आला.
शिरुर शहरातील मध्यवर्ती भागात तो ती पिस्टल हातात घेवुन इंदिरागांधी पुतळा चौक, शिरूर परीसरात मोठमोठ्याने शिवीगाळ करून लोकान मध्ये दहशत करताना मिळून आला आहे.असे रात्री उशिरा शिरुर पोलिसांकडून वृत हाती आले आहे.
“या घटनेनंतर पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो . इथं एक तरुण आहे. तो आजच्या तरुणांच्या एका मोठ्या समुहांचे प्रतिनिधीत्व करतो.तो तरुण देशभर आहे. हा तरुण अशा प्रकारच्या एका विशिष्ट शक्तीबरोबर आपली सुरक्षितता शोधतो. का शोधतो ? इतर सर्व लोकशाही संस्थांवर त्याचा विश्वास नाही का ? की त्याला ते माहित नाही ? म्हणजे मुद्दा शिक्षणाचा येतो. मग हा तरुण शिक्षणापासून दूर का गेला ? नेमका किती वयाचा असताना गेला ? कारण शिक्षण असुनही नोकरी मिळणार नाही. असा संदेश त्याला पोचला. तो कदाचित त्याला सोईचा वाटला .कारण दर्जेदार शिक्षण आपण घेउ शकत नाही. हे त्याला समजले. ते चित्र त्याला आजुबाजूला दिसले. ते खोटे नव्हते. तो शिक्षणापासुन इथे बाजुला पडला !
पुढे याला व्यवसाय करायचे म्हटले तर बँक कधीच अर्ज देत नसते. त्यांच्याकडे काही मालमत्ता आहे. त्यांनाच कर्ज देते. नाही फेडले. तर मालमत्ता जप्त करण्यात येवू शकते. याचे काय जप्त करणार ? हा तरुण बहुदा गरीब किंवा कनिष्ट मध्यमवर्गीय असतो. मग हा बाहेरच्या जगाकडे पाहतो .तेव्हा त्याला इतर उदाहरणे दिसतात. सगळे दोन नंबरचे धंदे करुन ,काही मोठे पुर्वाक्षमीचे गुंड भरपुर पैसा पाणी ,कार्यकर्ते, त्यांचा पिण्याखान्याचा खर्च करणारे दिसतात. तिथे तो आसरा शोधतो. पोलिसांकडे आसरा कसा शोधणार ?पोलिस वैयक्तीक काय करणार ?तहसिलदार काय करणार? आमदार कशाला करील ?त्याला जिंकण्याचीच व्युहरचना डोक्यात असते. तेच खासदाराचे ! तेच कलेक्टलचे !
पण एक जागा त्याला सापडते. मोठे भाई किंवा दोनर नंबरवाले ! तिथं बसता बसता आधार वाटायला लागतो . हे मोठे भाई किंवा काही वेळेस राजकिय प्रतिनिधी असतात. त्यांचे एक मात्र असते. ते राबीनहुड प्रकारातले असतात. किमान तसे भासवतात. काही प्रमाणात खर्चही करतात. त्यांना भोवती तरुण, आज्ञाधारक व निष्ठा ठेवणारी पोरं पाहिजे असतात. ऐन एखाद्या महत्वाच्या वेळेस हा Robinhood नक्कीच मदत करतो.मग तो अशा तरुणांना देवासमान वाटू लागतो.तसे ते सांगतातही.
सांगण्याचे कारण हे की लोकशाहीतील मान्यताप्राप्त संस्था, यंत्रणा काही आधार देउ शकत नाही. दुसरे हे की याला मित्र काही आयटीयन्स थोडेच भेटणार ! भेटतात ते त्याच्यासारखेच ! तशीच स्थिती असणारे.हे सुद्धा त्याच्यासाठी एक सेफ्टी झोन असतो.त्यात तो रमतो. दुसरीकडे कुठे रमणार ? ग्रंथांमधे रमणे फार लांब.आणि ते काही पैसा थोडाच देतात ? पण इथं short cut मधे पैशावाले झालेले आदर्श समोर असतात !
मग त्यांचे अनुकरण या तरुणांपैकी धाडसी तरुण व आता फार गळ्यापर्यंत आलेले तरुण स्वत:ही असेच यशस्वी होण्याची स्वप्ने पाहू लागतात ! त्यातली ही सुरुवातीची स्टेप असते. जर एकदा पोलिसांचा मार आणि जेलचे अन्न,चहा,डास,ढेकणं यांचा थोडासा अनुभव आला की मग कायमचे गुन्हेगार बनतात.
समाजात कोणाचे कोणाला काही घेणेदेणे नाही. प्रत्येकजण आपल्या कोशात ! स्वत:पर्यंत आल्यावरच बोंबा मारणारा ! त्यात प्रस्थापित जाती. त्यावर आधारलेले मान सन्मान! किती जणांनी ब्राम्हणांचे लग्न अटेंड केले आहे? नाहीच !कारण ते सांगतही नाहीत आणि बोलवतही नाहीत ! उरलेला सगळा बहुजन समाज ! जातींची उतरंड आणि त्या उतरंडीत कोणी तरी आपल्या खाली आहे,याचे समाधान.वरचा किंमत देत नाही. जातीच्या गर्वामुळे. त्यामुळे सर्वच समाज अनेक तुकड्यांनी बनलेला आहे.
परिणामी व्यवस्था चुकीची बनते. ती अनेकांचा बळी घेते.म्हणून आपल्याला नेहमी आपल्या देशातील समस्यांचे मुळ या व्यवस्थेमधे सापडते.ती युनिक आहे.एकमेवाद्वितीय आहे. जगात कुठेच अशी व्यवस्था नाही.संविधानाने व्यवस्था दिली.पण ज्यांच्या हातात ती गेली ते पारंपारीक व्यवस्थेची सवय पिढ्यानपिढ्या अगदी रक्तात भिनलेले समाजातील वर्ग व जातीतल्या लोकांकडे गेले. ते जैसे थे वादी असतात.कारण त्यांना रडिमेड सोई पारंपारीक व्यवस्थेमधे असतात.म्हणूनच आपल्याला आपले लोकप्रतीनिधी नेहमी असेच दिसतात.मिळतात.
एवढ्या सगळ्या बर्डनखाली अल्पशिक्षित ,निराधार स्थितीत तरुण भाई,गुंड,लोकप्रतीनिधी, mussal man असा Godfather चा किंवा व्यसनाचा आधार घेतो.”
–—- संपादक डा.नितीन पवार, शिरुर.
भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल. …
शिरुर पोलिसांनी वैभव नितीन भोईनलु याच्याविरूध्द सरकारतर्फे भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) क्रिमिनल लॉ. ऍक्ट च्या कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस कॉन्सेबल नितेश थोरात यांनी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अभिजित पवार हे करीत आहेत . अशीही माहिती शिरुर पोलिसांकडून मिळाली आहे.
या घटनेनंतर शिरुर शहरात खळबळ उडाली आहे. या विषयावरच शिरुरमधे रात्री उशिरापर्यंत नागरिकांमधे चर्चा चालू होती.शिरुर मधील नागरिकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण करणार्या अशा घटना चिंताजनक ठरल्या जात आहेत. शिरुर पोलिसांचा धाक किती प्रमाणात उरला आहे किंवा नाही, असा प्रश्न या घटनेमुळे शिरुर शहरातील नागरिकांमधे निर्माण झाला आहे .
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com