एस टी बस ची ब्रेझा गाडीला धडक ! तर शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत सविंदणे येथे पुतण्याची चुलत्याला जीवे मारण्याची धमकी !
एस टी बस ची ब्रेझा गाडीला धडक ! तर शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत सविंदणे येथे पुतण्याची चुलत्याला जीवे मारण्याची धमकी ! असे दोन गुन्हे शिरुर पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
एस टी बस ची ब्रेझा गाडीला धडक ! तर शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत सविंदणे येथे पुतण्याची चुलत्याला जीवे मारण्याची धमकी !
एस टी बस ची ठोकर लागुन एक जखमी तर दुसर्या घटनेत चुलत्याला जीवे मारण्याची धमकी !
शिरुर , दि. 22 जुन : ( श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
एस टी बस ची ब्रेझा गाडीला शिरुरमधे धडक ! तर शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत सविंदणे येथे पुतण्याची चुलत्याला जीवे मारण्याची धमकी ! असे दोन गुन्हे शिरुर पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
‘संपादकिय टच”
” गावांमधील संघर्ष प्रामुख्याने जमिनीवरुन होतात हे आपल्याला माहीत आहे. जमीन शेतकर्यांना जीव की प्राण असते.एक तर ते पुर्वी उपजिवीकेचे प्रमुख साधन होते.शेतीवरच आधारित किंवा शेतीला पुरक सुतारकाम,लोहारकाम,कुंभार काम,केरसुन्या बनवणे व विकणे किंवा त्यांची देवाण-घेवाण शेतकर्यांशी करणे हे चालत आहे.
इथे सामाजिक बाब ही ठरली जाते की या शेतीच्या तुकड्यासाठी भाऊ भावाचा रहात नाही. मुलगा बापाचा रहात नाही. मुलगी (जावयी हिस्सेदार) आईची रहात नाही. परिणामी पुर्वी मुख्य बाब असलेली कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे. नातेसंबंध फक्त लग्नकार्याला,मयतीला आणि हिश्शासाठीच उरलेले आहेत.हे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन का आले?यामागे संपत्तीची अतिरिक्त लालसा तर आहेच ! पण व्यक्तीचे स्वतःच्या सुरक्षिततेचे भय हे एक आहे.त्यातुन नात्याचे भान सुटुन कलह ,संघर्ष आणि हिंसाचार वाढला.भारतीय संस्कृतीत एक हिडीस प्रकार निर्माण होण्यामध झाला.
परिणामी तुरुंगात या संघर्षातून जाणार्यांची संख्या बरीच जास्त आहे. जमीन हडप करणे,काही वारसदारांना परंपरागत शेतमालकीतुन बेदखल करणे,परस्पर दुसर्याच्या वाट्याची जमीन विकणे ,वाटणीमधे नेहमीच आडवे येणे,मिटींग घ्यायचे ठरले तर मुद्दाम उपस्थित न राहणे.विषय पुढे ढकलणे,तिसराच मुद्दा उदाहरणार्थ पुढे आणुन मुळ मुदयाला बगल देणे,बांध कोरणे,अतिक्रमण करत राहतो, खोटे दावे करणे,परस्पर निर्णय घेणे,माहिती न सांगणे,माहिती लपवणे ,कागदपत्रे गहाळ झाली आहेत असे खोटे सांगणे.असे एक ना अनेक बहाणे करुन जमीन हडप करणे किंवा वाटणीत आडकाठी आणून स्वताकडेच जमीनीची मालकी किंवा वहिवाट ठेवणे अशी कृत्ये करणे हे गावातील काही लोक अगदी भोळेपणाचा आव आणून करत असतात.
त्यातुन एक विचित्र परिस्थिती गावागावांमधे निर्माण झाली आहे. गाव तलाठी वगैरे गावपातळीवरील शासकिय माणसांनी भ्रष्टाचाराचा कळस करुन अनेकांना बेवारस केले.देशोधडीला लावले.”
हाताने फिर्यादीस मारहाण…..
याबाबत सविस्तर हकिकत अशी की ता. 21/06/2024 रोजी सकाळी 8:15 वाजण्याचा सुमार होता. संविदणे गावच्या हददीत फिर्यादी रवींद्र मारुती पडवळ यांच्या राहत्या घरी ते नाष्टा करत होते. त्यावेळी आरोपी त्यांचा भाउ बाळु पडवळ व त्यांचा पुतण्या प्रणव बाळु पडवळ तेथे आले. या दोघांनी फिर्यादीच्या राहत्या घरामधे अनाधिकृत बेकायदा प्रवेश केला. आधारकार्ड व पासबुक मागितले.तसेच दोघांनीही रवींद्र मारुती पडवळ यांना शिवीगाळ व दमदाटी करून हाताने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली .त्यामुळे 1) बाळु पडवळ , 2) प्रणव बाळु पडवळ , दोघे राहणार- सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या विरुदध शिरुर पोलिस स्टेशनला कायदेशीर फिर्याद आय पी सी कलम 452,323,504,506 ,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री.रमेश भगत हे करत आहेत.
दुसर्या घटनेत ब्रिझा कारला मागून ठोकर….
तर दुसर्या एका घटनेमधे दि. 21/06/2024 रोजी दुपारी 1: 00 वाजण्याच्या सुमारास शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे गावच्या हददीत पुणे ते अहमदनगर हायवे रोडवरमारूती सुझुकी शोरूमच्या समोर ही दुसरी घटना घडली आहे. त्यात फिर्यादी बाबासाहेब गवारी, राहणार- शिरूर यांच्या ताब्यातील ब्रेझा गाडी नं एम एच 12 आर एफ 1537 ही ते स्वतः चालवत होते.त्यावेळी ते पुणे ते नगर रोडवर होते.तेव्हा ते शिरूर बाजुकडे येत होते. तेव्हा त्याच्या पाठीमागुन एस.टी.बस येत होती .या येणार्या एस. टी. बसचा क्रमांक एम. एच. 14 बी.टी. 3350 असा आहे.त्यावरील चालक बाळु रघुनाथ लोंढे, राहणार- सारोळा सोमवंशी,तालुका – श्रीगोंदा, जि. अहमदनगर याने त्याच्या ताब्यातील सदरची बस ही हयगयीने अविचाराने चालवली.
रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष. ….
रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवली.अशाच स्थितीत त्याने ब्रिझा कारला पाठीमागील बाजुस ठोकर मारली. कारच्या पुढे चाललेल्या दुचाकीस ठोकर बसली.त्यामुळे ठोकर लागुन अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार रावसाहेब बो-हाडे, राहणार- बोराडेमळा , शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे याला किरकोळ दुखापत झाली आहे.त्याच्या वहानांचे नुकसान झाले आहे. त्यास एस टी चालक बाळु कारणीभुत झाला आहे. म्हणुन फिर्यादी रावसाहेब बो-हाडे याने एस. टी. बस रघुनाथ लोंढे याच्यावर क्रमांक एम. एच. 14 बी.टी. 3350 वरील चालक असलेल्या बाळु रघुनाथ लोंढे , रा . सारोळा सोमवंशी, ता. श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर वरील चालकाविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर आय पी सी 279,427, मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत करत आहेत. हे दोन्ही तपास पोलीस निरीक्षक श्री. जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहेत.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com