नाशिक येथील घटनेचा भिम छावा संघटनेकडून शिरुरला निषेध !
नाशिक येथील घटनेचा भिम छावा संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. नाशिकच्या तथाकथित हिंदु युवा वाहिनीच्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी भिम छावा संघटना, शिरुर शाखेने केली आहे. या घटनेचा निषेध करणारे निवेदन भिम छावा संघटनेकडून शिरुर पोलिसांना देण्यात आले आहे.
नाशिक येथील घटनचा भिम छावा संघटनेकडूननिषेध करण्यात आला आहे. नाशिकच्या तथाकथित हिंदु युवा वाहिनीच्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी भिम छावा संघटना, शिरुर शाखेने केली आहे. या घटनेचा निषेध करणारे निवेदन भिम छावा संघटनेकडून शिरुर पोलिसांना देण्यात आले आहे.
नाशिक मधील घटनेचा ‘भिमछावा’ संघटनेकडून निषेध. ..
महापुरूषांची व विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणे खपवुन घेतले जाणार नाही. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
नाशिक शहरातील नागसेन नगर मधील तथाकथित धार्मिक संघटनेच्या प्रथमेश संदिप चव्हाण याला व त्याच्यामागे असणार्यांवर कडक कारवाई करावी, असे भिम छावा संघटनेने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे.या घटनेमधे नाशिक शहरातील एका तथाकथित हिंदु युवा वाहिनीच्या व्यक्तीने नागसेन नगर परिसरात डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर लाल रेषा मारुन त्यांचा अपमान व विटंबना केली आहे अशी बातमी आल्यानंतर राज्यभर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.अस्पृश्य,शुद्राचा स्पर्श करुन घेवु नये अशा आशयाचा मजकूर छापुन नाशिक शहरात व सोशल मीडियावर पसरवला होता.या पत्रकात त्याने विशिष्ट जातीचा व झेंड्याचा उल्लेख केला होता. असे या निवेदनात म्हटले आहे. शिरुर पोलिसांनी या निवेदनाचा स्विकार केला असुन ते संबंधित अधिकार्यांना पाठवून घटनेचा तपास करण्यात येईल असे सांगितले आहे.
नाशिक शहरात ऐतिहासीक काळाराम मंदिर सत्याग्रह डा बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता….
नाशिक शहरात ऐतिहासीक काळाराम मंदिर सत्याग्रह डा बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.त्याच काळाराम मंदिरात त्याकाळी अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. तो मिळावा म्हणून डा बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. त्याकाळात तेथे असलेल्या सनातनी ब्राम्हण व सवर्णांनी हा विरोध केला होता.सरकार इंग्रजांचे होते.इंग्रज अधिकार्यांनी हा प्रश्न हाताळताना प्रागतिक ,सामाजिक न्यायास अनुकुल भुमिका घेत गुन्हे दाखल केले होते. डा बाबासाहेब आंबेडकर यांनी ही कायदेशीर लढाई लढली होती.काळाराम मंदिरात त्याकाळच्या अस्पृश्य समाजाला प्रवेश मिळाला होता.आज नाशिक शहर प्रागतिक विचारांचे आहे.पुरोगामी विचारांचे आहे. सामाजिक, जातीय ,धार्मिक सलोखा नाशिक शहरात आहे.त्याकाळच्या अस्पृश्य समाजाने आज मोठी प्रगति केली आहे. शहरात सामाजिक शांतता आहे.
नाशिकचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत. ..
अशा परिस्थितीत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अशा घटना घडत आहेत. केंद्रातील सरकारही बनले आहे. आज 2024 आहे1927 नाही.जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत अमुलाग्र बदल झाले आहेत. नाशिकचा उल्लेख प्राचीन काळातील ग्रंथांमधे आहे.असाही दावा असतो. रामायणातील दंडकारण्य हा नाशिकचा भाग आहे, असे मानले जाते. शुर्पनखा या रामायणातील पात्राचे हे ठिकाण मानले जाते. ही राक्षसीण होती.तिचे नाक लक्ष्मणाने कापले होते,असा रामायण या मुळच्या संस्कृत ग्रंथात उल्लेख आहे.नासिकाया संस्कृत शब्दापासुन नाशिक हा शब्द तयार झाला आहे. असे काही अभ्यासक मानतात.तर रामायण काळ हा आर्यांच्या भटकंतीच्या प्रवासात अफगानिस्तान येथे होता.इथपर्यंत काही अभ्यासक निष्कर्ष काढतात.अर्थात आजच्या अफगानिस्तानात ! काही अभ्यासक तर ते आजच्या इराण पर्यंत जातात.रामायणातील वर्णन केलेल्या ठिकाणांचा व ग्रह नक्षत्रांच्या अवकाशातील स्थानाचाही उल्लेख रामायण या मुळ संस्कृत ग्रंथात आहे.त्यावरुनही अभ्यासक निष्कर्ष काढत असतात.
इंडोनेशियापर्यंत रामायणाचा प्रभाव. ….
रामायणही एकच नाही.आणि अनेक भाषांमधे आहे.आजच्या इंडोनेशियापर्यंत रामायणाचा प्रभाव होता असे दिसते.एकुणच नाशिक हे खुप जुने आहे. आजही नाशिक जिल्ह्यात आदीवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे.ब्रम्हगिरी, त्र्यंबकेश्वर अशी ठिकाणे आहेत.परिसरातील भाग आदिवासी बहुल आहे.म्हणजे जास्त जुना आहे.इथं अस्पृश्यतेची प्रथा होती हेही खरे आहे. आता ती नाही.सांस्कृतीक शहर म्हणून नाशिक शहर ओळखले जाते.दर बारा वर्षांनी कुंभमेळा इथे भरतो. अनुसुचित जाती,जमातींची लोकसंख्याही इथे मोठी आहे.याच शहरातील काळाराम मंदिराचे ब्राम्हण पुजारी लोकसभेला बहूजन समाज पक्षाचे उमेदवार होते.असा हा सामाजिक प्रवास या शहराचा आहे.
नाशिक शहर टार्गेट का?
हिंदु किंवा हिंदुत्व म्हणुन आजच्या संघटना ,पक्षाचे लोक ,अनुयायी कार्यकर्ते इथे आहेत. सामाजिक किंवा धार्मिक बाबतीत या ठिकाणाचे महत्व लक्षात घेता नाशिक शहरातुन काही सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरण करुन राजकिय फायदा मिळवण्याची एक प्रवृत्ति जी देशभर आहे. अशी प्रवृत्ति व संघटना अशी सामाजिक व धार्मिक स्थळे त्यांच्या कारस्थानांसाठी निवडू शकतात.जेणेकरुन या ठिकाणाचे देशभरातील महत्व लक्षात घेता ते भावनीक उत्तेजना देउन समाजात तेढ,संघर्ष, दंगली घडवण्याची शक्यता असते. म्हणून नाशिकच्या नागसेन नगर परिसरात या घटना घडणे हे सावधानतेचा इशारा ठरु शकतो.नागसेननगर भाग दलितबहुल आहे.तेथील दलितांना भडकावून राज्यभर दोन समाजात कटुता,संघर्ष निर्माण करणार्या अशा घटना चिंताजनक आहेत.हे खरे ! यातुन अशा देशविघातक प्रवृत्तींना वेळीच अटकाव करणे हे पोलिसांचे काम आहे.सरकारचेही काम आहे.
आजचा समाज प्रतिगामी प्रवासाला तयार नाही….
आजच्या काळात अस्पृश्यतेचा पुरस्कार करण्याचा विचार किती हास्यास्पद आहे.हे या संघटनेच्या अध्यक्षाला माहित असुनही तो मुद्दाम डिवचतो आहे.हे ठरवून घडवले असावे,अशी नक्कीच शक्यता आहे. आणि असे कोण करु शकतो, हे आजच्या लोकशाही भारतात लपवणेही सोपे राहिलेले नाही. प्रतिगामी प्रवासाला भारतीय लोक आज तयार नाहीत. नवीन पिढी Digital आणि online असणारी आहे.तिला असल्या गोष्टींमधे काडीचेही मान्यता नाही.पुढे देखील नाही. डा. बाबासाहेब आंबेडकर यांना यासाठी वापरण्याचा प्रयोग अनेकदा केला गेला आहे. पण आजच्या स्धितीत महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न पोलिस व सरकारने हाणून पाडले पाहिजेत.किंवा काही वस्तुस्थितिवरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून ती वस्तुस्थिति लपवणे हा ही उद्देश यामागे असु शकतो.
हे निवेदन देताना भिम छावा संघटनेचे शिरुर तालुका अध्यक्ष श्री.चेतन साठे , प्रकाश डंबाळे,विनोद भालेराव,मयुर भोसले,कय्युम शेख,निलेश वाघ,अमित तराळ इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com