स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात ‘आप’ चें संदीप देसाईं यांचे पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण !
स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात 'आप' चे पश्चिम महाराष्ट्र सचिव संदीप देसाईं यांचे पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण होणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर की वीज ग्राहकांची लुट ? असा सवाल करत आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री. संदीप देसाई यांनी महाराष्ट्र राज्य सरकार व राज्य विद्युत महामंडळ, एम ई सी बी च्या नवीन 'स्मार्ट प्रीपेड मीटर' ' बाबत केला आहे.या नव्या 'स्मार्ट प्रीपेड मीटर' मुळे राज्यातील जनतेवर वाढीव खर्चाचा बोजा टाकण्याचे षडयंत्र यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विरोधात मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे. ते बेमुदत उपोषण आंदोलन आझाद मैदानावर करणार आहेत.
स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात ‘आप’ चें संदीप देसाईं यांचे पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण !
स्मार्ट प्रिपेड मीटर की वीज ग्राहकांची लुट ?
शिरुर, दि. 27 जुन :
(श्री.संदीप देसाई ‘आप’, कोल्हापुर यांच्याकडून )
संदीप देसाई ‘आप’, पश्चिम महाराष्ट्र सचिव
स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात ‘आप’ चे पश्चिम महाराष्ट्र सचिव संदीप देसाईं यांचे पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण होणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर की वीज ग्राहकांची लुट ? असा सवाल करत आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री. संदीप देसाई यांनी महाराष्ट्र राज्य सरकार व राज्य विद्युत महामंडळ, एम ई सी बी च्या नवीन ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ ‘ बाबत केला आहे.या नव्या ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ मुळे राज्यातील जनतेवर वाढीव खर्चाचा बोजा टाकण्याचे षडयंत्र यामागे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विरोधात मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे. ते बेमुदत उपोषण आंदोलन आझाद मैदानावर करणार आहेत.
आम आदमी पार्टीचे पुण्यात जोरदार आंदोलन (आधीचे आर टी ई चे) !
स्मार्ट प्रिपेड मीटर की खाजगीरणकडे एक पाऊल?…..
देशभरातील ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते. याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल 27 हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. प्रिपेड मीटरच्या माध्यमातून आगाऊ पैसे भरून घेण्याचे धोरण बनवून महावितरणचे खाजगीरण करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
आम आदमी पार्टीचे पुण्यात जोरदार आंदोलन !
स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात ‘आप’ कोल्हापुरचे आंदोलन. ….
याविरोधात ‘आप’ ने मुंबई येथील आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे नियोजन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके, उपाध्यक्ष धनंजय शिंदे आणि विजय कुंभार करत आहेत. ‘आप’ चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई राज्य कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. उद्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार असून राज्यभरातील हजारो कार्यकर्ते यामध्ये सामील होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
स्मार्ट प्रिपेड मीटर बाबत विद्युत कायदा 2003 काय सांगतो?….
विद्युत कायदा, 2003 प्रमाणे मीटर विकत घ्यायचे का नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकाचा आहे. स्मार्ट मीटरचा आर्थिक ताण ग्राहकांवर पडू देणार नाही असे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु या मीटरचा खर्च छुप्या पद्धतीने बिलातून वसुल करण्याचा डाव महावितरण आहेत. वास्तविक बघता स्मार्ट मीटरची किंमत व जोडणी खर्च सहा हजार तीनशेच्या वर असण्याचे कारण नाही. परंतु बारा हजार रुपये प्रति मीटर इतक्या रकमेचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. महावितरण मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव या अडून आखला जात आहे.
ग्राहकांनी विजेचा वापर केल्यानंतर देयक वसुल करण्याची पद्धत असताना प्रिपेड मीटरचा आग्रह का धरला जात आहे. महावितरण ने आधुनिकीकरण केल्यास ग्राहकांचे वीज दर कमी होणे अपेक्षित आहे.परंतु स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक फायदा होणार नाही. उलट ग्राहकांची लूट करण्यासाठीच स्मार्ट प्रिपेडचा घाट घातला जात असल्याचा आरोप ‘आप’ चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला आहे .
वीज ग्राहकांवर आगाऊ खर्चाचा बोजा पडणार? ….
आम आदमी पक्षाची कोल्हापुर शाखा अनेक विषयांवर नागरी समस्या सोडविण्यासाठी आघाडीवर असते.कोल्हापुर येथील आम आदमी पक्षाचे श्री.संदीप देसाई हे आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव आहेत.कोल्हापुरातील त्यांचे सामाजिक काम कौतुकास्पद असते.आता महावितरणचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्यातला एक भाग प्रिपेड मीटर ची पद्धत येउ घातलेली आहे.पण या प्रिपेड मीटरच्या आगाऊ खर्चाचा बोजा ग्राहकवर टाकण्यात येणार आहे. ही बाब संदीप देसाई यांनी निदर्शनास आणुन दिली आहे.
खाजगीकरणाच्या वरवंट्यात बहुतेक सर्व क्षेत्रे र घडली गेली आहेत.उरल्या सुरल्या महावितरण सारख्या सरकारी संस्था तग धरुन आहेत.त्यातही प्रिपेड मीटर ची पद्धती ही ग्राहकास छुपा खर्च वाढवणार असेल तर त्याचा अर्थ काय समजुन घ्यायचा असा प्रश्न पुढे आला आहे. काढलेले टेंडर देखील जास्त रकमेचे वाटते आहे.या पेक्षा कमी खर्चात हे होवु शकते.असे आम आदमी पक्षाचे श्री.संदीप देसाई यांचे म्हणणे आहे. याशिवाय या माध्यमातुन महावितरणचे खाजगीरण करण्याचा डाव देखील असल्याचे श्री.संदीप देसाई यांचा आरोप आहे.
कोल्हापुरकर नागरिक आधीच बिले येताना आकडे वाढवून येतात.ते परत सुरळीत करण्यासाठी चिरीमीरीची अपेक्षा कर्मचारी ठेवतात. ती दिल्यास वीज बिले कमी करुन मिळतात.मग आधुनिक तंत्रज्ञानाचा दावा करणारे स्वयंचलित बील मापन करण्याला आणि त्याच्या अचुकतेच्या दाव्याला काय अर्थ आहे.का पैसे खाण्यासाठी डिजिटल यंत्रेसुद्धा मन्युप्युलेट केली जात आहेत?असा प्रश्न निर्माण होत असतो. त्यानेच कोल्हापुर शहरासहित महाराष्ट्र त्रस्त आसताना प्रिपेड मीटर पद्धतीत ग्राहकाचा खर्च वाढवून ग्राहकाची पिळवणूक केली जात नाही का?असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com