
Contents
ब्रेकिंग न्युज : शिरूर जवळील (कानिफनाथ फाटा) नजीक फोर्स ट्रॅव्हलर व पुष्पक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरचा भीषण अपघात !
ब्रेकिंग न्युज : शिरुर जवळ अपघात : ड्रायव्हर गंभीर जखमी !
शिरुर, दि. 27 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
ब्रेकिंग न्युज : शिरूर जवळील (कानिफनाथ फाटा) नजीक घडली आहे. फोर्स ट्रॅव्हलर व पुष्पक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती प्राप्त होत आहे. पुणे नगर रोड हा हाय वे आहे.लांब पल्याच्या मालवाहतुक गाड्या या मार्गावर प्रवास करत असतात. रांजणगाव एम आय डी सी हा मोठा औद्योगिक भाग या रोडलगत विकसित झाला.याला पुष्कळ वर्षे झाली.
औद्योगिक परिसर……
औद्योगिक भाग असल्याने येथे अनेक कंपन्या,विदेशी गुंतवणुकीदारांनी वसवल्या.मोठ्या संख्येने आणि दराने इथले अर्थकारण फिरु लागले.शेकडोंच्या संख्येने इथे राज्य व राज्याबाहेरील कामगार कामासाठी आलेला असतो. त्यामुळे इथे मोठ्या संख्येने भाडेकरु,दुकानदार,खरेदीदार अशा लोकांची वर्दळ जमा झाली.आर्थिक व्यवहार वगैरे होवू लागले.हाय वे ला लागुन असलेली सरदवाडी,कारेगाव,रांजणगाव पासुन ते शिक्रापुर पर्यंत मोठ्या संख्येने लोकसंखा वाढुन गजबज झाली.अनेक चांगले वाईट व्यवसाय येथे सुरू झाले.एकंदरीत ही चार पाच गावे नव्याने विकसित झाली. वेगळ्या एका भक्कम पोलिस स्टेशनची गरज निर्माण झाली.ते कारेगाव जवळ यश इन हॉटेल समोरील भागात निर्माण झाले.वरिष्ठ पोलिस अधिकारी नेमले गेले.विभागीय पोलिस अधिकारी इथे तैनात झाले.कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे सर्व करण्यात आले.त्यामुळे काही प्रमाणात येथे कायदा व सुव्यवस्था बरी आहे.
चालकांसाठी औद्योगिक परिसर बनला एक स्टॉप. ….
गजबजलेल्या या भागात अपघात होवू लागले. अपघातासाठी संवेदनशिल असे भाग देखील निर्माण झाले.अपघातांचे प्रमाणही वाढत गेले.इथे स्टॉप घेण्यासाठी लाब पल्याच्या मालवाहतुक गाड्या देखील काही वेळ थांबत लागल्या. अनेक सुविधा उपलब्ध असील तर तेथे असे भाग किंवा पाईंट निर्माण होत असतात. तसे रांजणगाव गणपती हे अष्टविनायकांपैकी एक विणायक किंवा गणपतीचे स्थान निर्माण आधीच झाले होते.धार्मिक केंद्र अशी रांजणगाव गणपतीची ओळख बदलून ती आता रांजणगाव एम आय डी सी म्हणून देश विदेशातही झाली.

अनेक वाहन चालक बेजबाबदारपणे वाहन चावण्याचे प्रमाण काही कमी नाही.येथे रस्ता दुभाजक सुद्धा आहेत.आपण वरील फोटोमधे पाहु शकत आहात की एक मोठे वाहन रस्ता दुभाजकाला धडकले आहे.वाहनाचा पुढचा भाग उध्वस्त झालेला दिसत आहे.गाडी अक्षरशा दुभाजकावर काही प्रमाणात चढली आहे.येथे वाहन चालकाचा तोल नक्कीच सुटलेला आहे.हे स्पष्ट दिसते.गाडीचा वेगही जास्त असणार हे स्पष्ट दिसते. ज्याअर्थी वाहन दुभाजकावर चढले आहे.चालकाचा या ठिकाणी बेजबाबदारपणा स्पष्ट दिसतो.
वाहनाचा वेग अपघाताचे मुख्य कारण?
वाहन समोरुन येणार्या किंवा आडव्या जाणार्या वाहनाला किंवा माणसांना धडकले असते तर पळायला सुध्दा वेळ मिळाला नसता.इतका वाहनाचा वेग जास्त दिसतो आहे. आपघात होत नाही. तो पर्यंत प्रत्येक वाहन चालक आपण किती उच्च दर्जाचे वाहन चालक आहोत हे सांगत असतो.पण ऐनवेळी त्याला देखील काही सुचत नाही. तो गडबडून जातो.स्वतःचाही जीव धोक्यात घालतो.इतर निरपराध लोकांच्या बळी जाण्याला कारणीभुत ठरत असतो.
या ताज्या अपघाताच्या घटनेत पोलिस सुत्रांकडुन याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरुरजवळील कानिफनाथ फाटा येथे दि-२७ जून २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नगरच्या दिशेला जाणाऱ्या वाहन क्रमांक CG O4 NJ 2248 या पुष्पक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनर ने फोर्स ट्रॅव्हलर टुरिस्ट परमिट पॅसेंजर वाहन क्रमांक MH12 QG 1326 हे वाहन घावटे मळ्याकडे जात होते. या वाहनाने रस्त्यावर यु टन घेत असताना मागच्या बाजूने जोरदार धडक दिली .त्यामुळे हा अपघात झाला आहे.

प्रवासी गाडी चढली दुभाजकावर…..
त्यामुळे ट्रॅव्हलर गाडी रस्ता दुभाजकावर चढून अपघातग्रस्त झाली असल्याचे दिसत आहे. या घटनेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स चालक ड्रायव्हर गंभीरित्या जखमी झाला आहे . ट्रॅव्हल्स मध्ये पॅसेंजर नसल्या कारणामुळे मोठी जीवित हानी होण्यापासून वाचली . पुणे नगर महामार्गावर असणारे बेशिस्त वाहतूक, कटिंग लेन, विरुद्ध दिशेने येणारे वाहने, आपला घरचा रस्ता आहे ,असे वागणे, या ग्रुपमध्ये रोडवर उभी राहणारी वाहने, गरज नसलेल्या ठिकाणी असणारे गतिरोधक व त्यामुळे होणारे अपघात संबंधी सूचनाफलक नसणे या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपघात होतात . पण ते अपघाताचे कोणालाही काही घेणे देणे पडले नाही.असे दिसते.

असा अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कधीच वेळेवर पोलीस प्रशासन पोचत नाही.महामार्ग पोलिसांची नियुक्ती तर फक्त पावत्या पाडण्यापुरते असते का ?अमावस्या पुनवेला दर्शन देण्यापुरते झाली आहे का ? वेळोवेळी होणाऱ्या अपघातामुळे महामार्ग प्रशासन जागे होईल का नाही ! असा अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून आणि वाहनचालकाकडून उपस्थित केला जात आहे