“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” : शिरुर तालुक्यात एक जुलैला नोंदणी सुरु होणार , प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रु.जमा होणार !
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" शिरुर तालुक्यात याच महिन्यापासून सुरु होणार आहे . ही शिरुर तालुक्यातील महिलांसाठी आनंदाची ताजी बातमी आहे. एक जुलैला नोंदणी सुरु होणार असून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रु.जमा होणार आहेत. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" नोंदणी अंगणवाडी सेविका व मदतनीस नोंदणी सोमवारपासून करणार आहेत. असा आदेश सरकार कडून देण्यात आला आहे .
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” : शिरुर तालुक्यात एक जुलैला नोंदणी सुरु होणार , प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रु.जमा होणार !
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” : याच महिन्यात होणार सुरु ; अंगणवाडी सेविका व मदतनीस नोंदणी सोमवारपासून करणार !
शिरुर, दि.1 जुन :
सागर सारंगधर, सामाजिक कार्यकर्ता, शिरुर.
( सागर सारंगधर यांच्याकडून )
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” शिरुर तालुक्यात याच महिन्यापासून सुरु होणार आहे . ही शिरुर तालुक्यातील महिलांसाठी आनंदाची ताजी बातमी आहे. एक जुलैला नोंदणी सुरु होणार असून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रु. प्रतिमहिना जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” नोंदणी अंगणवाडी सेविका व मदतनीस नोंदणी सोमवारपासून करणार आहेत. असा आदेश सरकार कडून देण्यात आला आहे .
मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहिण’ योजना काय आहे? …
यात म्हटले आहे की, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ” घोषित केलेली आहे. यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे. सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे.
याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत —–
१) 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित ,परितकत्या , विधवा , महिला यांची या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे.
२) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट या महिलांनी देणे आवश्यक असणार आहे.
३) कुटुंबाचे उत्पन्न रू २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे .
४) बँकेमध्ये सदर महिलेच्या नावे खाते असावे .
५) रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावे .
सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना “नारी शक्ती दुत ॲप” ; “प्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचा आहे .
“महिला सक्षमीकरणाचे धोरण आधीपासून आहे. महिलांना 50℅ आरक्षण धोरण देखील अस्तित्त्वात आहे. महिलांना सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. घरगुती हिंसा,जी साधारणपणे घरातील पुरुष मंडळींकडून होत असते. त्यापासुन आपण फार दुर आहोत.हे पोलिस स्टेशन मधील नोंदी महिला अत्याचार व शोषण यांची वास्तविकता दर्शवत असतात.महिला बाहेर कामासाठी जात असेल तर तेथे तिला त्रास लैंगिक आधारावर होत असतो.
मारहाण, हत्या,मानसिक त्रास देणे,विनयभंग,बलात्कार,आर्थिक शोषण,वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणे,women trafficking, नशेच्या जाळ्यात ओढणे,त्यांची दलाली करणे ,इच्छेविरुद्ध लग्न लावून देणे,रुढी परंपरांच्या माध्यमातून तिचे दमण करणे,अशा अनेक स्रिगुलामीमुलक व पुरूषसत्ताक समाजमुलक अन्यायकारक कृत्ये सहन करावी लागतात.आजच्या डिजीटल युगामधे आपल्या समाजात अस्तित्त्वात आहेत.ही खेदाची बाब आहे.
अशा परिस्थितीत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे एक महत्वाची बाब आहे.ही योजना विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभमीवर अर्थमंत्री श्री.अजित पवार यांनी आणली आहे. योजना चांगली आहे. पण शाश्वत उपायाची आवश्यकता देखील ही बाब अधोरेखीत करते.”-संपादक
सर्वात महत्वाचे म्हणजे आधी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १००% करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर “नारी शक्ती दुत ॲप” मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
नोंदणी करत असताना —
1) उत्पन्नाचा दाखला सण 2025 पर्यंत वैध असणारा असावा.
२) जन्माचा दाखला असावा /टि.सी झेरॉक्स असावी /डोमेसाईल प्रमाणात .
३) रेशन कार्ड ची झेरॉक्स असावी.
४) आधार कार्ड असावे.
५) लाभार्थी नावाने बँक पासबुक झेरॉक्स.
सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे . सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे . या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर , सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन “नारी शक्ती दुत” ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे .तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजने करता अर्ज किंवा माहिती भरणे बाबत जनजागृती करावी लागणार आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्या एक जुन पासून सुरु करावी. तसेच १ ते 15 जुलै 2024 या कालावधीत गावातील कोणतीही 21 ते 60 वयोगटातील पात्र असणारी महिला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही. याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी लागणार आहे . गावातील जेवढे व्हाट्सएप ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी लागणार आहे . काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा. अशीही सुचना आहे .
सागर सारंगधर,माहिती व अधिकार सामाजिक कार्यकर्ता,
मो . 9822440910 यांनी ही माहिती दिली आहे .
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com