
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
अज्ञात चोरटयाने काय चोरुन नेले ? वाचा इंटरेस्टींग चोरीची स्टोरी !
अज्ञात चोरटयाने शिरुर तालुक्यातील मलठण येथे केली चोरी ! कशाची ते वाचा !
शिरुर,दि. 3 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
अज्ञात चोरटयाने काय चोरुन नेले ? वाचा इंटरेस्टींग चोरीची स्टोरी या बातमीत ! या अज्ञात चोरटयाने शिरुर तालुक्यातील मलठण येथे चोरी केली आहे. कशाची ते वाचण्यासारखं आहे हे नक्की !
चक्क किराणा माल चोरीला…..
दि. 2 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते दि. 3 जुलै 2024 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमाराच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मलठण, तालुका- शिरूर , जिल्हा– पुणे येथील श्रावणी मार्बल अँन्ड स्टाईल या दुकानाच्या पत्र्याच्या शेडच्या गेटचे कुलुप कशाने तरी तोडले. उघड्या शेडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर निलेष गुलाब दंडवते, वय- 32 वर्ष , व्यवसाय- दुकान, राहणार- मलठण, महाले हॉस्पिटल शेजारी, तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इरादयाने खालील वर्णनाचा व किंमतीचा माल चोरी करून चोरून नेला आहे. म्हणून फिर्यादी निलेष गुलाब दंडवते, वय- 32 वर्षे , व्यवसाय- दुकान, राहणार,मलठण, महाले हॉस्पिटल शेजारी, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे .
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे आहे—
1) 10,000/रुपये –
मक्याचे 8 पोते प्रत्येकी 25 रूपये किलो किंमतीप्रमाणे एकुण 400 किलो वजनाचा !
2) 4,200/- रुपये –
तुरीचे 1 पोते 100 रूपये . किलोप्रमाणे 42 किलो वजनाचे !
3) 5,500/- रुपये –
राजमा 2 पोते 55 रूपये . किलोप्रमाणे एकुण 100 किलो वजनाचे !
4) 9,000/- रुपये–
बाजरी 9 पोते 20 रूपये किलो किंमतीप्रमाणे एकुण 450 किलो वजनाचे !
5) 6,075/- रुपये—
हुलगा 3 पोते 45 रूपये किलो किंमतीप्रमाणे एकुण 135 किलो वजनाचे !
6) 7,000/- रुपये—
हरबरा 4 पोते 50 किलो वजनाप्रमाणे एकुण 200 किलो वजनाचे !
7) 4,400/- रुपये—
गहु 4 पोते 50 किलो वजनाप्रमाणे एकुण 200 किलो !
असा एकुण- 46175 रुपये किंमतीचा माल चोरुन नेला गेला आहे.
शिरुर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 612/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 334 (1), 305 प्रमाणे अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत हे पोलिस निरीक्षक श्री.ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
‘इंग्रजी पिनल कोड’ बदलला….
ही बातमी तशी आमच्या सारख्या बातमीदारांसाठी खास व पहिली बातमी आहे. कशी ते सांगतो ! याआधी इंग्रजांच्या काळातील इंडियन पिनल कोड , आय पी सी तील कलमांप्रमाणे आम्ही व पोलीस आरोपीवर लागलेली कलमे लिहायचो. ही आमची म्हणजे सत्यशोधक न्युज ची पहिली बातमी आहे की जी ,’ भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्ह्याचे बदललेले नाव व कलम लिहीण्याच्या अनुभवास आम्ही उपलब्ध झालो आहोत. आता केंद्र सरकारने जुन्या कायदा संहितेत बदल केले आहेत.ते बदल लागुही झाले आहेत. शिरुर पोलिसांनी या नव्या संहितेतील नव्या कलम क्रमांकाप्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. हा एक ऐतिहासीक अनुभव आम्हाला मिळत आहे.याबाबत इंग्रजाळलेलेपणाचा एक आरोप नेहमी केला जायचा. कारण ही संहिता इंग्रजांच्या काळातील होती. ती त्यावेळी तशीच ठेवलेली होती. हे काही चुकिचे नव्हते .कारण त्या इंग्रजांच्या काळातील कायद्याचा धाक होता. ते कायदे गुन्हेगारीबाबतचे होते. गुन्ह्यांचे स्वरुप आणि कायद्यांचा धाक तसाच अस्तित्त्वात होता.लगेच बदल केला तर इंग्रजी कायद्यांना घाबरणार्या त्यावेळच्या गुन्हेगारांना वेगळा संदेश गेला असता.ते मोकाट गुन्हे करत सुटले असते.इंग्रज आता गेले.आता आपलेच राज्य आहे असे समजुन !
मात्रभाषेत/राष्ट्रभाषेत सणे ठिकच…
आताच्या केंद्र सरकारने कदाचित आणखी कोनकोनत्या बाबतीत आपण इंग्रजाळलेले आहोत,याची लिस्ट बनवली नसावी.बनवतील तर सर्वांनाच मोठे हसु फुटेल याची आम्हास खात्री आहे ! पण चांगले आहे. मात्रभाषेत असणे चांगले आहे. समजायला सोपे आणि नैसर्गीक आहे. आता गुन्हेगारी वर याचा काय परिणाम होतो ते आपण येणार्या काळात पाहुच.सरकारी यंत्रणांवर काय परिणाम होतील ते ही दिसेल.भ्रष्टाचारावर काय परिणाम होतो ते समजेल.
अज्ञात चोरटा हा ‘वेगळा’ चोरटा !…
अज्ञात चोरटा हा ही एक वेगळ्या प्रकारचा चोरटा आहे. त्याने खास करुन धान्याची पोती चोरली आहेत. ती जिवनावश्यक वस्तुंची चोरी आहे. चोरी छोटी आहे.चोरांचेही प्रकार असतात. चोरी ही चोरी आहेच.चोराला कायदेशीर शिक्षा व्हायला पाहीजेच. कोणी छोटा चोर असतो.तर कोणी मोठा चोर असतो. कोणी अज्ञात चोर असतो. तर कोणी उघड आणि प्रतिष्ठीत चोर असतो. कुणी दहा रुपये चोरतो.वडापाव खातो.तर कुणी चारा खातो. तर कुणी इलेक्टोरल बान्डच्या माध्यमातून चोरी करतो.करोडोंची ! कुणी जनतेला फसवून मतांचीच चोरी करतो.तर कुणी खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करत कायद्यांचीच चोरी करतो.कुणी पक्षच चोरतो.निवडणुक चिन्ह चोरतो.तर कुणी झेंडे व त्यांचे रंगही चोरतो.भगवा,हिरवा,निळा वगैरे ! कुणाचे चोरीचे पैसे डायरेक्ट स्विस बँकेत जमा होतात म्हणे ! असेही हायली एज्युकेटेड चोर ची असतात,अशी चर्चा लोकांमधून अधुनमधून ऐकायला मिळते.काही चोर बदनाम असतात.तर काही विधानसभा, राज्यसभा,लोकसभेत बसलेले असतात असेही खास सुत्रांकडून समजते ! तर काही हप्ते खानारे अर्थात चोरणारे चोर असतात.
एकुण चोरी आणि चोरटे हे एक महाकाय भगोष्टासारखे आतुन गुढ असणारे प्रकरण आहे हे नक्की ! सत्यशोधक न्यूज सुद्धा या निमित्ताने सत्यशोधकाळलेली अस्सल भारतीय म्हणजे भारताळलेली पत्रकारिता करण्यास सज्ज आहे !