
Contents
शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडसला 23 वर्षीय महिलेचा गळा आवळला तर रांजणगाव
गणपती येथे 12 वर्षाच्या मुलीने केली संपवले जीवन ?
शिरुर तालुक्यात स्री त्रासाच्या दोन घटना ! वाचा सविस्तर. …
शिरुर,दि.4 जुलै : (श्री. अनिल डांगे यांच्याकडून )

शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडसला 23 वर्षीय महिलेचा गळा आवळला गेला आहे. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. तर रांजणगाव गणपती येथे 12 वर्षाच्या मुलीने केली स्वतःचे जीवन संपवून घेतले आहे. (? ) केल्याची नोंद रांजणगाव गणपती पोलिस व शिरुर पोलिस स्टेशनला झाली आहे. दोन्ही घटनाचा स्री त्रासाच्या म्हणाव्या लागतील, अशा आहेत.शिरूर व रांजणगाव गणपती पोलिस या घटनांचा सखोल तपास करत आहेत.
रांजणगाव सांडसला 23 वर्षीय विवाहितेने संपवले स्वतःचे जीवन? ….
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक 03/07/2624 रोजी दुपारी 2 : 00 वाजण्याचा पुर्वी राजणगाव सांडस, रणपिसे वस्ती, येथे राहत्या घरामध्ये कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून घरात प्रवेश केला. शितल स्वप्निल रणपीसे, वय- 23 वर्षे, राहणार- . राजणगाव सांडस, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांचा निळ्या रंगाच्या रस्सीने गळा आवळुन व काळ्या रंगाचे वायरने करूंन्ट देवुन तीचे जीवन संपवले आहे.म्हणुन अज्ञात व्यक्ती विरूध्द स्वप्नील श्यामराव रणपिसे यांच्या तक्रारी बाबतच्या गुन्हयाची कागदपत्रे आज रोजी यवत पोलिस स्टेशन,पुणे ग्रामिण यांच्याकडुन शिरूर पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहेत. त्यानुसार गुन्हा 04/07/2024 दाखल करण्यात आला आहे.अज्ञात आरोपीवर शिरुर पोलीस स्टेशनला गु.र.न. 613/2024 व (भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री.जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ए .पी.आय. श्री.अमोल पन्हाळकर हे करत आहेत .
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत 12 वर्षीय मुलीने संपवले स्वतःचे जीवन? …
तर शिरुर तालुक्यातील दुसऱ्या एका घटनेत रांजणगाव एम आय डी सी पो स्टे अ.मयत रजि. नं. 53/2024 आहे. तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 194 या घटनेची नोंद करण्यात आली आहे. यामधे मुलीच्या वडीलांनी रांजणगाव पोलिसांना खबर दिली आहे.सदर 12 वर्षाच्या मुलीने किचनच्या दरवाज्यावर असलेल्या सिमेंटच्या आडव्या बीमला स्वाताला लटकावून घेतले होते. त्यानंतर शेजारील लोकांच्या मदतीने तिला उतरविले असता ती काही एक हालचाल करीत नव्हती. म्हणून त्यांनी तिला शिरुर ग्रामीण रुग्णालय येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तीला तपासुन ती मयत झाल्याचे सांगितले .याची नोंद रांजणगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. दाखल अंमलदार – पोलिस हवालदार राखोंडे हे आहेत तर पुढील तपास अंमलदार – ASI सहायक सब निरिक्षक श्री. येळे हे करत आहेत.
दोन्ही घटना गंभीर !
दोन्ही घटनांची ही प्राथमिक माहिती आहे. याचा आणखीन तपास सुरू आहे. हे महत्वाचे आहे. 23 वर्षीय महिलेचा गळा दाबण्यात आला आहे. ही घटना रांजणगाव सांडस या शिरुर तालुक्यातील गावातील रणपीसे वस्ती येथे घडली आहे. गळा अज्ञात इसमाने दाबला अ आहे.त्यात महिलेची अखेर झाली आहे. असे सांगण्यात आले आहे. पण या घटनेचा तपास सखोल करणे आवश्यक आहे. अज्ञात इसम व अज्ञात कारणावरून शिरूर तालुक्यातील एका महिलेचे जीवन संपवतो.ही बाब गंभीर आहे.तालुक्यात महिला सुरक्षित नाहीत.हे स्पष्ट होते. अशा गुन्ह्यांमागे अनेक शक्यता असु शकतात.चोरी करण्यात आडवे येणे,कौटुंबिक जाच,इ.बाबी असु शकतात.अज्ञात गुन्हेगार नेमका कोण आहे हे शोधुन काढणे पोलिसांसमोरील आव्हान तर आहेच.पण ग्रामीण भागातील महिला या प्रकाराने भितीग्रस्त होणे स्वाभाविक आहे. महिलांना असुरक्षीत वाटणे ही बाब चांगली नाही ! कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.गुन्हेगार एवढे क्रुर कृत्य करण्यास धजावतात हे पोलिसांचे अपयश आहे.
विश्वास बसणे कठीण?
दुसर्या घटनेत 12 वर्षाची मुलगी ,सहावीतील स्वतःचे जीवन संपवून घेते. यावर या परिसरातील लोकांचा विश्वास बसणे कठीण आहे. आत्महत्या घडण्यामागे आधी बराच काळ काही घटनांची प्रक्रिया होत असते, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.म्हणजे एकाएकी ती घडत नाही . आधी काही काळ काही तरी घडत असते.ते चांगल्या हेतुनेही असु शकते.उदाहरणार्थ आईवडिल अभ्यासाबाबत किंवा शाळेत न गेल्यास रागावणे.त्यातुन भिती निर्माण होणे.डिप्रेशन निर्माण होणे इ. पण हे दुर्दैवी आहे. एवढ्या कोवळ्या वयात मुलांच्या मानसिकतेत असे कोनती परिवर्तने निर्माण होतात ? पालकांच्या मनात असे कोनते complex निर्माण होतात का? सामाजिक किंवा आर्थिक घटक कौटुंबिक समस्या कशा पद्धतीने कारणीभुत ठरतो.यात मुलीचे आई वडील दोघे कामाला जात होते.असे समजते.पण यात मुलांकडे घरी लक्ष ठेवण्याची व्यवस्था करुन घर सोडावे लागते.नाहीतर अशी मुले संकटात सापडणार नाहीत का? कितीतरी पालक त्यासाठी पगारी बाई किंवा पुरुष कामाला ठेवतात.
शेजारी व परिसर हा महत्वाचा घटक आहे. शेजारी कोनत्याही विचारांचे आणि संस्कारांचे लोक रहात आहेत.हे पालकांनी पाहणे गरजेचे असते. एम आय डी सी सारख्या परिसरात भाडेकरु एक अविभाज्य भाग झाला आहे. घरमालक पुष्कळ वेळा पैशाच्या लोभात भाडेकरी कोन आहे?कसा आहे?यांकडे दुर्लक्ष करतात. हे ही अशा घटनांना कारणीभुत ठरत असतात.