
Contents
- 1 रांजणगाव गणपती एम आय डी सी त 75000 हजार रुपयांची खंडणी ? शिरुरच्या दोघांवर गुन्हा दाखल !
- 1.1 रांजणगांव गणपती येथील खंडणी प्रकरणातील एकाला अटक ?
- 1.1.1 शिरुर,दि.7 जुलै : (श्री. अनिल डांगे यांच्याकडुन )
- 1.1.2 रांजणगाव गणपती जवळ चौघाचे अपहरण?
- 1.1.3 जीव घेण्याची धमकी?
- 1.1.4 रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ….
- 1.1.5 रांजणगाव गणपती येथील दुसरी घटना. ….
- 1.1.6 रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ….
- 1.1.7 About The Author
- 1.1 रांजणगांव गणपती येथील खंडणी प्रकरणातील एकाला अटक ?
रांजणगाव गणपती एम आय डी सी त 75000 हजार रुपयांची खंडणी ? शिरुरच्या दोघांवर गुन्हा दाखल !
रांजणगांव गणपती येथील खंडणी प्रकरणातील एकाला अटक ?
शिरुर,दि.7 जुलै : (श्री. अनिल डांगे यांच्याकडुन )
रांजणगाव गणपती एम आय डी सी त 75000 हजार रुपयांची खंडणी वसुल करण्याचा प्रकार घडला आहे.यामधे रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिसांनी शिरुरच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर यातील एकाला अटक केली असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.पुढील तपास रांजणगाव एम आय डी सी पोलिस करत आहेत.
रांजणगाव गणपती जवळ चौघाचे अपहरण?
याबाबत हकीकत अशी की दिनांक 06/07/2024 रोजी 19.30 ते 23.30 वाजण्याचा दरम्यान ढोकसांगवी गावच्या हद्दीतील पाचंगेवस्ती, तालुका- शिरूर, जिल्हा-पुणे येथे फिर्यादी- संतोष मनमोहन बेहरा , वय -19 वर्षे, व्यवसाय – नौकरी, सध्या राहणार ढोकसांगवी, व्हिल्स इंडियाचे पाठीमागे, सुरेश नागवडे यांच्या खोलीत, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे, मुळ राहणार- समरपुर, तालुका- अहलापुर, जि. जसपुर, राज्य- उडीसा व त्याचे मित्र संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा, संतोष सुरेंद्र परिडा अशा चौघांना योगेश बारवकर, राहणार, शिरुर, तालुका – शिरुर, जिल्हा-पुणे याने त्याच्या अनोळखी पाच साथीदारांसह त्यांच्याकडील स्कुटी, प्लॅटिना व पल्सर मोटार सायकलवरुन येवुन जबरदस्तीने मारहाण करून त्यांचेकडील तिन्ही मोटार सायकलवरून अपहरण करुन चौघांना कारेगावच्या हद्दीतील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोहन मार्बल्स दुकानाच्या पाठीमागील चार मजली इमारतीमधील तिस-या मजल्यावरील एका खोलीमध्ये नेवुन प्लॅस्टिकच्या पाईपाने, कंबरेच्या बेल्टने मारहाण केली.
जीव घेण्याची धमकी?
“तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर, प्रत्येकाने 25,000 रु. द्या” असे सांगीतल्याने फिर्यादी तसेच संतोष बसंत बेहरा, सुदर्शन नबगन बेहरा असे तिघांच्या नातेवाईकांनी त्यांचे मोबाईलवरती फोन पे द्वारे पैसे पाठविल्यावर तिघांच्या एकुण 75,000/रुपयांची खंडणी योगेश बारवकर याने त्याच्या सोबतच्या व्यक्तीच्या मोबाईलवरील स्कॅनरवरुन घेतली. तसेच रात्री 23.30 वाजण्याच्या सुमारास संतोष परिडा याचे पैसे घेण्यासाठी फिर्यादीचा भाऊ मानस बेहरा याच्याकडे कारेगाव चौकातील, कारेश्वर मंदिर येथे योगेश बारवकर हा त्याचा साथीदार विनोद राजेंद्र चाबुकस्वार याच्याकडील पांढ-या रंगाच्या टाटा अल्ट्रोज गाडी क्र.MH 12 VC 4879 मधुन फिर्यादी व त्याच्या दोन मित्रांना घेवुन आला असता त्यांना पोलीसांनी पकडण्याच प्रयत्न केला.
रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ….
त्यावेळी योगेश बारवकर हा त्या ठिकाणावरुन पळुन गेला. वगैरे मजकूरच्या फिर्यादीनुसार रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी- 1) योगेश बारवकर रा. शिरुर, ता. शिरूर, जि.पुणे (2) विनोद राजेंद्र चाबुकस्वार रा. शिरुर, सुरजनगर, ता.शिरुर, जि.पुणे व त्यांचे अनोळखी इतर पाच साथीदार यांच्यावर रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 140(2),308(2),118(1),115(2),351(2),351(3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींपैकी विनोद राजेंद्र चाबुकस्वार राहणार शिरुर, सुरजनगर, तालुका-शिरुर, जिल्हा-पुणे याला अटक ता.वेळ – 07/07/2024 रोजी 4:12 वाजता करण्यात आली आहे.दाखल अंमलदार पोलिस सब निरिक्षक श्री. मुंढे हे आहेत तर पुढील तपास अंमलदार सहायक पोलिस निरिक्षक श्री. नवसरे हे करत आहेत.
रांजणगाव गणपती येथील दुसरी घटना. ….
तसेच दुसर्या घटनेत दिनांक ०६/०७/२०२४ रोजी २.१५ वाजण्याच्या सुमारास रांजणगांव गणपती, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत रांजणगांव गणपती मंदिराच्या पार्कीगच्या पलीकडे असलेल्या डी.पी. जवळ दिनांक 06/07/2024 रोजी 19:40 वाजता वर नमूद केलेल्या तारखेस,वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर दोन अनोळखी इसमांनी (अंदाजे 20 ते 22 वर्षे वयो गटातील ) यांनी फिर्यादी – दत्ता बामाजी फड, वय २९ वर्षे, व्यवसाय कार चालक, सध्या रा. बालाजी नगर, गुरुदत्त सोसायटी, ग्राउंन्ड प्लोअर, स्वराज कॉलेज जवळ, कात्रज, पुणे-४३ मुळगांव मरळवाडी, पोस्ट मांडवा ता. परळी जि. बीड मो यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांचा एम.आय. ११ आय कंपणीचा एन्ड्रॉइड मोबाईल फोन १५,०००/-रू किमतीचा जबरीने चोरी करून नेला आहे. म्हणुन त्यांनी त्या दोन अनोळखी इसमाविरूध्द कायदेशीर फिर्याद रांजणगाव पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ….
सदर गुन्ह्यात आरोपी 1) गुरुप्रीत इंद्रजीत सिंग वय 21 वर्ष रा. मित्तल मेडिकल, अमर टॉवर बिल्डिंग, नेहरूनगर पिंपरी चिंचवड पुणे,2) कृष्णा सतीश टांगतोडे व 19 वर्षे राहणार पाथर्डी तालुका जिल्हा नाशिक सध्या रा.मोहन लांडे यांच्या रूममध्ये रांजणगाव ,तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ता.6/7/2024 रोजी 20.41 वाजता अटक करण्यात आली आहे.आरोपींवर रांजणगाव पोलीस स्टेशनगु.र.नं.- 427/2024 भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम 309(4),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अधिकारी ASI कर्डिले आहेत तर तपास ASI शिंदे हे करत आहेत.
बिनपैशाचा शार्ट कट पैसा मिळवण्यासाठी व त्यातुन ऐश करणारी एक मानसिकता समाजात वाढु लागली आहे. मग त्यासाठी अनेक शक्कल लढविताना गुन्हेगारी मानसिकता असणारे दिसत आहेत. पण गुन्हे शोधण्याचे तंत्र बरेच पुढे गेले आहे.हे अशा गुन्हेगारांना माहित नसते.शेवटी गुन्ह्यांमधे सापडतात.आयुष्य ही असलेली दुर्मिळ संधी गमावून बसतात.