‘आप’ कडुन घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या ‘आयां’ चा तर्फे सत्कार !
'आप' कडुन घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या 'आयां' चा तर्फे सत्कार करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीचे श्री. मुकुंद किर्दत, पुणे यांनी ही माहिती दिली आहे. हा एक 'आप' कार्यकर्यांकडून यथोचित असा सत्कार केला गेला आहे.
‘आप’ कडुन घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या ‘आयां’ चा तर्फे सत्कार !
‘आप’ कार्यकर्यांकडून कर्तव्य दक्ष ‘आयां’ चा यथोचित सत्कार !
शिरुर , दि. 9 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
‘आप’ कडुन घरकाम करून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या ‘आयां’ चा तर्फे सत्कार करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीचे श्री. मुकुंद किर्दत, पुणे यांनी ही माहिती दिली आहे. हा एक ‘आप’ कार्यकर्यांकडून यथोचित असा सत्कार केला गेला आहे.
श्री.मुकुंद किर्दत ,प्रवक्ते, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र.
आप तर्फे गोखलेनगर भागात हा कार्यक्रम संपन्न. …
पुण्यामध्ये हजारो महिला घरकाम करून आपले कुटुंब सांभाळतात. बऱ्याचदा घरातील आर्थिक अडचणींमुळे तर कधी नवरा दारू व्यसनामध्ये गुंतला असेल अथवा कमावत नसेल तर ही जबाबदारी महिलांवर येऊन पडते आणि बऱ्याचदा अशिक्षित असल्यामुळे घरकाम करण्याशिवाय इतर पर्याय राहत नाही. परंतु अशा कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा वर्षानुवर्षे घरकाम करून छोट्या वसाहती मधल्या घरांमध्ये राहून आपल्या मुलांना पदवीधर बनवणाऱ्या अनेक महिला पुणे शहरांमध्ये आहेत.
रविवार 7 जुलै रोजी जनवाडी डिफेन्स कॉलनी हॉल मध्ये गोखलेनागर भागातील धुणीभांडी,स्वयंपाकपाणी करून मोलमजुरी करून अशा मुला-मुलींना वाढवणाऱ्या ७५ महिलांचा सत्कार आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
‘संपादकिय टच’. ..
“एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते.साधारण नव्वदिच्या दशकापर्यंत आई वडील मुलांना शिकून मोठं करण्यासाठी जीवाचं रान करत होते.शिकून पोरगं साहेब होईल,याची त्यांना जणु खात्री होती.अनुसुचित जाती,अनुसुचित जमातीतील गावातली पोरं नोकरीला लागलेली ते पहायचे.त्यांचा नवा रुबाब पहायचे.म्हणून सर्व समाजातील लोक मुलांना शिकवायला लागले.गावात क्वचित एखादा शाळा न शिकणारा मुलगा व काही मुली असत.
तात्कालिन भारत सरकारने गट करार स्विकारला.मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले.विचारवंतांना त्याचे भविष्यात काय परिणाम होतील?हे समजले होते.ते त्यांनी मांडले होते.डा.रावसाहेब कसबे हे एक मोठे विचारवंत आहेत.त्यांनी सांगितले होते की यापुढे राखीव जागांवर नोकर्या मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ‘
त्यानंतर एकेक करुन जवळपास सर्वच क्षेत्रांचे खाजगीरण होत गेले.सरकारी नोकर्यांची संख्या एकुण लोकसंखेच्या प्रमाणात कमी कमी होवू लागली.पदवीधर, उच्च पदवीधरांची संख्या वाढत गेली.नोकरीसाठी ‘ रेट’ ठरु लागला. तो राखीव जागांवरील नोकर्यांसाठीही ठरु लागला. आधी नोकरी,सवलती मिळालेले काही लोक थोडाफार ‘रेट’ही देवू शकणारे होते.ते प्रस्थापित झाले. उरलेले बाहेर फेकले गेले.जातींमधे वर्ग निर्माण होवू लागले.
वर्गामधे जाती व जातींची उतरंड होतीच.पर्यायाने अनेक शिकलेले तरुण विनानोकरी दिसु लागले.’शिकुन कुणाचं भलं झालयं’ ,असा नवा युक्तीवाद अशिक्षित लोकांच्या सोईचा होता.पण अर्थात शिक्षण कशाकशासाठी असते?याचा थांगपत्ता त्यांना नव्हता. पण समाजात मेसेज गेला.शिकलं तरी काही उपयोग होईलच असे नाही. आई वडील भयभित झाले.नाविलाजाने कसा बसा दहावी पास/नापास झाला की कुठंतरी काम कर असं पाल्यांना सांगु लागले.पोरं मिळेल ते आणि मिळेल तिथे काम करु लागली.
जगण्याला प्राधान्य आधी असते. नैसर्गीक असते.उच्च शिक्षणात लोकसंखेच्या मानाने खुप कमी तरुण राहिले.बेरोजगार आणि अकुशल तरुणांचे जणु लोंढेच वाहू लागले.परिणाम व्यसनाधिनता,नैराश्य,गुन्हेगारी, उदासिनता वाढली.राजकारणी आणि बेकायदेशीर धंद्यावाल्यांनी अशा टोळक्यांना आपल्या नादी लावले.तर काही क्रिकेट,चित्रपट, सण,उत्सव,टिव्ही, मोबाईल मधे गुंतवून टाकले.क्रयशक्ती मोठ्या प्रमाणात घसरली.थोड्या लोकांवर भार वाढला.एकुणच परिस्थिती आजच्या अवस्थेला आली.
तंत्रज्ञानातील प्रगतीमधून उदयाला आलेल्या बर्याच क्षेत्रामधे ,स्वयंरोजगार, व्यवसाय, सेवा,मनोरंजक अशा काही क्षेत्रात करियर करण्याचा पर्याय आहे. पण इच्छाशक्ती ,परिक्षम,सातत्य,इ.ठेवले तर या आयांची स्वप्ने साकार होवू शकतील !”
घरकामाला किंमत का नाही?
काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिकवणाऱ्या घरकामगार महिलांचा सत्कार करताना मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादक गीताली वि .मं. म्हणाल्या ,” शिक्षणामुळे जगताना मान मिळतो हे लक्षात घेऊन या कष्टकरी महिलांनी आपल्या मुलांना शिकवलं. मुलींना आपल्या पायावर उभा करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे .त्यांनी आपल्या कामाला कमी मानू नये त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे ” असं म्हणत स्वतःच्या घरात केलेल्या घर कामाला आज काही किंमत नाही याविषयी निषेध व्यक्त केला.घर कामाचे मोल नवरा, बायको आणि मुलं सगळ्यांनी समजून घेऊन एकत्रपणे सर्वांनी घरकाम करावे असं आवाहनही त्यांनी केलं.
कर्तव्य दक्ष ‘आयां’ चा यथोचित सत्कार !
काबाडकष्टाची दखल घेत सन्मान -मुकुंद किर्दत. ….
आम आदमी पार्टी सुद्धा महिलांचे जीवन सुकर व्हावे यासाठी दिल्लीमध्ये आणि पंजाब मध्ये मोफत प्रवास मोफत शिक्षण मोफत आरोग्यसेवा आणि वीज देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीला महिला मतदान करत आहेत असे आप शहर महिला अध्यक्ष सुरेखा भोसले यांनी संगितले.कष्ट करत,परिस्थितीशी दोन हात करत,चिकाटीने मुलांना घडवले,उत्तम शिक्षण दिले,त्यांचे आयुष्य बदलले, त्यांच्यासाठी या महिला ‘जिजाऊमाता’ बनल्या. त्यांच्या या काबाडकष्टाची, परिश्रमाची आणि जिद्दीची दखल घेत हा सन्मान आम्ही केला असे या वेळेस मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीजा गोडबोले यांनी केले. कार्यक्रम आयोजनामध्ये ‘आप’ चे शिवराम ठोंबरे ,अमोल मोरे, सतीश यादव, विकास चव्हाण, शंकर थोरात, विकास लोंढे, रहीम खान, निलेश वांजळे, सागर कानगुडे, संदेश सोलकर आदींनी सहभाग घेतला.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com