‘पानशेत धरण’ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ‘मराठा युवा फाउंडेशन’ ची मागणी ! जिल्हाधिकार्यांना निवेदन !
'पानशेत धरण' पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची 'मराठा युवा फाउंडेशन' ची मागणी आहे.याबाबत या फौडेशनने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. त्याच बरोबर 'पानशेत धरण' फुटीची एक सत्य आठवणही वाचा..
‘पानशेत धरण’ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ‘मराठा युवा फाउंडेशन’ ची मागणी ! जिल्हाधिकार्यांना निवेदन !
‘पानशेत धरण’ फुटीची एक सत्य आठवणही वाचा..
पडते (पानशेत) , १०जुलै २४ : (श्री अनिल डांगे यांच्याकडुन )
सध्याची अवस्था दर्शवणारे एक चित्र !
‘पानशेत धरण’ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची ‘मराठा युवा फाउंडेशन’ ची मागणी आहे. याबाबत या फौडेशनने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. त्याच बरोबर ‘पानशेत धरण’ फुटीची एक सत्य आठवणही वाचा..
‘संपादकिय टच’
पुणे वाहोवले तेव्हाची आठवण…..
माझे वडील कालकथित आबा नामदेव पवार, Office Superetendant,Rural Hospital, Kaledhone,Taluka-Khatav,District -Satara.
पाच सख्खे भाऊ.दोन अशिक्षित असल्यामुळे गावी असायचे.गरीबीत शिक्षण घेतलेले ! एक नुकताच आरोग्य खात्यात नोकरीला लागलेला होता.सातार्याला सिवील हास्पिटलला ड्युटीवर होता.दुसरा पुण्यात अम्युनिशन फॅक्टरीत नवीनच नोकरीला लागलेला होता. आजच्या पुण्यातील गोखलेनगर भागात कुठेतरी रहात होता.त्याच्याबरोबर सर्वात धाकटा भाऊ बी जे मेडिकल कॉलेजला होता. हे तिघे जरा तरुणच म्हणावे लागेल !
पानशेत धरण फुटण्याची खबर तात्कालिन भारत सरकारला अमेरिकेने किंवा इंग्लंडने दिली होती म्हणे ! इंग्रजांच्या काळातील हे धरण होते. भारत सोडला तरी या धरणाची कागदपत्रे इंग्रज सरकारकडे होती असे मी नंतर वडिलांकडुन ऐकले होते. भारत सरकारला एक पत्र पाठवून इंग्रज सरकारने पानशेत धरणाची सुरक्षिततेची मुदत संपली आहे.असे कळवले होते म्हणे !
पानशेत धरण फुटले आणि पुणे वाहवले गेले,अशी बातमी जगभर पोचली म्हणे ! सातार्याचा भाऊ कासाविस झाला.आपले दोन भाऊ वाहून तर गेले नसतील ना ! या शंकेने ! ढसाढसा रडुही लागला.स्टाफ धीर देवु लागला ! त्या काळात लोक असे रडायचे बरे ! जमिनीवर लोळुन लोळुन रडायचे.त्याने भल्या ठिगभर भाकर्या बनवुन घेतल्या.थेट गोखलेनगर गाठायचे ठरवले.ज्याला लागेल त्याला किमान भाकरी तरी द्यायची होती त्याला !
आजचा गोखलेनगर, वडारवाडी,कुसाळकर पुतळा असा तो भाग पाण्यात बुडालेला होता.तो तेथे पोचला.जिकडे तिकडे पाणीच पाणी ! पाण्यातुन कुणाचे सामान,भांडी,कपडे,अशा वस्तु वाहुन आल्या होत्या. तर काहींच्या वाहून जात होत्या.पाणी कमरे इतके आलेले होते या भागात .पण हलकल्लोळ उडाला होता.आपले भाऊ कुठे दिसतात का ? म्हणून नजर सारखी इकडे तिकडे फिरत होती.पण अखेर डोळ्यांतले अश्रु थांबले.
दोन्ही भाऊ सही सलामत होते. नुसते सही सलामत नव्हते.तर एम बी बी एस वाला मध्य भागात बेधडक जाऊन लोकांना मदत करत होता.धरुन बाजुला कमी पाणी असलेल्या भागात उचलुन आणत होता. सामान पकडुन बाहेर फेकत होता.दुसरा अम्युनिशनवाला ही हेच काम करत होता.’ भाऊ’ म्हणत सातार्यावाला पाण्यात शिरला.तिघेही तसे पाचही भाऊ पैलवानकी केलेले होते.दिवस व रात्रभर मदतकार्य करत राहिले.
यातील तिसरा म्हणे सातार्यावाला हे माझे वडील आबासाहेब नामदेव पवार होते.आज ते हयात नाहीत.दुसरे वामन नामदेव पवार अम्युनिशनवाले हयात आहेत.गोखलेनगर मधे राहतात. तिसरे डा.यशवंत नामदेव पवार ,एम बी बी एस, वाले गोखलेनगर मधील ‘संजय क्लिनीक’ हा दवाखाना तहहयात चालवुन आपल्या तुन निघुन गेले आहेत.गावाकडचे दोन्ही भाऊ आज आपल्यात नाहीत !
–—– Dr.Nitin Pawar, Editor.
Dr.Nitin Pawar,Editor, Satyashodhak News,Shirur.
पानशेत धरण फुटीला 63 वर्षे पुर्ण……
पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करण्याचे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पानशेत धरणाच्या “धरण फुटीला” यंदाच्या वर्षी दिनांक 12 जुलै 2024 रोजी 63 वर्ष पूर्ण होत आहेत़ .
त्याच पार्श्वभूमीवर पुण्याकडून पानशेत गावासह इतर गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे .
सध्याची अवस्था दर्शवणारे एक चित्र !
पुलाच्या वरच्या भागात आणि चहुबाजूंना छोटी-मोठी जुडपे आणि वेलीचा वेढा पडलेला आहे. पुलावरील संरक्षित कठडे देखील खिळखिळे झालेले आहेत.
पानसरे धरणातून क्षमतेपेक्षा जास्त पाणी विसर्ग. ….
या पुलावरूनच प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी बससह , अनेक प्रकारचे अवजड वाहने किंवा हलकी वाहने जरी गेली , तरी सुद्धा पायाला हादरे जाणवतात. मुख्य बाब म्हणजे ऐन पावसाळ्यात पावसाचा जोर वाढल्यानंतर धरण पट्ट्यात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस पडतो. धरणाच्या साठवण क्षमतेमध्ये वाढ होऊ लागते. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो.
यावेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा प्रचंड रुंद असणाऱ्या कालव्यातून सोडण्यात येतो. तो इतका की अंगावर शहारे आणणारा असतो.
परंतु वाहणारे पाणी या संबंधित पुलाखालून जात असते . या फुलाच्या खालील भागाची रचना अरुंद आणि निमुळती आहे . वाहणाऱ्या पाण्याचा महाभयंकर प्रलय थेट पुलावर येऊन आदळतो. असे अनेक प्रलय या पूलाने गेली अनेक वर्ष सोसलेले आहेत.
सध्याची अवस्था दर्शवणारे एक चित्र !
पानशेत धरण पर्यटकांचे आकर्षण. …
वास्तविक पाहता या पुलावरून प्रवासी वाहतुकीसह स्थानीक ग्रामस्थांची दररोज ये-जा असते. पानशेत धरणाबरोबरच याच परिसरात ‘वरसगाव’ चे देखील धरण आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी मान्सून मध्ये वर्षा विहाराचा आनंद- लुटण्यासाठी शेकडो पर्यटकांची झुंबड उडालेली असते.
याच पार्श्वभूमीवर काही वर्षापूर्वी कोकणातील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये. कोणतीही अनुचित घटना घडू नये. यासाठी सामाजिक कार्यकर्ते व ‘मराठा युवा फाउंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पुणे ते पानशेत आणि इतर गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे. अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर ” प्रशासन काय दखल घेतय का ? की पुन्हा एकदा धरण फुटण्याची वाट पाहतयं का ? प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे .
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com