
Contents
- 1 गॅस वितरक करतात ग्राहकांची पिळवणूक ; वितरकावर कारवाई करावी – ‘आप’ शिरुर चे तहसिलदारांना निवेदन !
- 1.1 गॅस वितरक शिरुर यांच्या कार्यपद्धतीमुळे शिरुरकर हैराण !
गॅस वितरक करतात ग्राहकांची पिळवणूक ; वितरकावर कारवाई करावी – ‘आप’ शिरुर चे तहसिलदारांना निवेदन !
गॅस वितरक शिरुर यांच्या कार्यपद्धतीमुळे शिरुरकर हैराण !
शिरुर, दि.12 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
गॅस वितरक करत आहेत ग्राहकांची पिळवणूक ; म्हणून वितरकांवर कारवाई करावी अशी मागणी ‘आप’, शिरुर ने तहसिलदारांना निवेदन देत केली आहे. शिरुर शहरातील गॅस वितरकांच्या कार्यपद्धतीमुळे शिरुरकर हैराण झाले आहेत. असे शहरात एकुण चित्र आहे.
दुगड एच पी गॅस कडुन ग्राहकांची पिळवणूक? ….
शिरूर शहरातील एस.डी. दुगड या एच.पी गॅस पुरवठादारांकडून शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची फसवणूक व पिळवणूक चालली आहे. ग्राहकांनी गॅस रिफील बुक केल्यानंतर रिपील (गॅस टाकी) ग्राहकांना मिळत नाही. तरी संबंधित ग्राहकाला गॅस वितरित झाल्याचा मेसेज येतो. ग्राहकाची रिफील (गॅस टाकी ) नंतर काळ्या बाजारात विक्री करून ज्यादा नफा कमावला जात आहे.अशी तक्रार नागरिकांकडून येत आहे.
काळ्या बाजारात विक्री? ….
‘शिरूर शहर व ग्रामीण भागात वाहनांना लागणारा एल पी जी गॅस काळ्या बाजारातुन मिळणाऱ्या गॅस टाकीतून भरला जातो आहे . एचपी गॅस पुरवठादाराकडून ग्रामीण भागात गॅस टाकी पुरवठा केला जातो . पण ग्राहकांना वेळेत गॅस मिळत नाही . काही ग्राहकांना गॅस कनेक्शन घेतल्यापासून आज तागायत अधिकृत गॅस पावती देखील भेटले नाही . ‘ असे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागात अनेक ई-सेवा केंद्राबरोबर एच.पी.गॅस पुरवठा धारकाबरोबर एग्रीमेंट करूनही त्या ई सेवा केंद्रांबरोबर योग्य असा समन्वय एच.पी.गॅस पुरवठादार ठेवत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
‘आप’ चा आंदोलन करण्याचा इशारा. ..
अशा मनमानी कारभार करणाऱ्या एस.डी. दुगड सारख्या गॅस वितरकावर आपण योग्य अशी कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना योग्य असा दिलासा द्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या दारात आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही या निवेदनाद्वारे तहसिलदारांना करण्यात आली आहे.
यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा प्रवक्ते व ‘आप’ शिरूर शहराध्यक्ष अनिल डांगे , ई-सेवा केंद्र धारक आबासाहेब थोरात , त्याचबरोबर पुणे जिल्हा मीडिया समन्वयक , आम आदमी पार्टी डा. नितीन पवार हे ही उपस्थित होते.
ही तर ‘चरण्याची’ कुरणे….
रेशनिंग चे सामान,राकेल,धान्य, गॅस हे पुरवठादार व संबंधित कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची ‘चरण्याची’ कुरणे आहेत.हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहिती आहे. प्रतिमाणसी प्रमाणे मिळणारे धान्य कित्येकांना मिळत नाही. ‘मोफत मिळणारे धान्य ज्यामधे गहु व तांदुळ मिळतो.तेवढाच आहे.बाकीचे काय असेल ते कार्यालयात जाऊन विचारा’ असे सर्रास सांगितले जाते.अडाणी ग्राहक तेवढेच घरी घेऊन जातात.वास्तविक कुटुंबाची गरज या पेक्षा जास्त असते. मग ते धान्य ग्राहक दुकानदारांकडून जास्त किंमतीत घेतात.घ्यावे लागते. सरकार ‘भुकमुक्त भारत’ करण्याच्या घोषणा करते.पण प्रत्येकक्षात धान्य दुसरेच लुटत आहेत.काळ्या बाजारात विकत आहेत.खानावळ्या,ढाबेवाल्यांना हे धान्य थोड्या जास्त दरात देतात, असे बोलले जाते. म्हणजे हे घटक नफा मिळवत असतात.आणि धान्य गरीब भारताला ‘भुकमुक्त‘ करण्यासाठीचे असते.यांची साखळी आहे.असे अनेक लोक सांगतात.ही पद्धत बंद झाली पाहीजे.
यांची ईडी कडुन चौकशी करावी….
अनेक पक्षाने,संघटना, व्यक्तीकडून निवेदने संबंधित अधिकार्यांना, कार्यालयांना जात असतात.थोडे दिवस हे राहते. नंतर परत सुरु होते.रेशन दुकानदार श्रिमंत कसे होतात ? याचा सखोल तपास करायला पाहिजे. ईडी कडुन फक्त राजकारण्यांच्या बाबतीत चौकशी होते.ती अशा बर्याच घटकांची करायला पाहिजे. देशात भरपुर सोर्सेस उपलब्ध आहेत. भारत देशच नशिबवान आहे.सर्व प्रकारची नैसर्गीक साधने निसर्गाने या देशाला बहाल केली आहेत.प्रचंड मनुष्यबळही ( लोकसंख्याही) बहाल केले आहे. पण या देशातील लोकांमधे जास्तच भ्रष्टाचाराची प्रवृती देखील बहाल केली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.ही प्रवृती ‘बाहेर’चा ‘आत’ गेला तर तोही सहजपणे हेच करतो. प्रत्येक क्षेत्रात हे चालु आहे. जेवढा जास्त मोठा अधिकारी तेवढे जास्त त्याच्या पर्यंत जाते.असे म्हणतात. नागरिक जास्त मोठ्या अधिकार्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो.तेवढा त्याला जास्त दिलासा मिळत असतो.पण तोच जर या ‘साखळी’त असेल तर किती अवघड आहे?
दलाल हा मुख्य घटक. …..
दलाल हा एक आणखीन विशेष प्रकार आहे. हे लोक अशा शासकिय कार्यालयांच्या परिसरात पडिक असतात.एखाद्या पक्षाचे, संघटनेचे पद देखील हे दलाल धारण करुन या परिसरात सामाजिक कार्यकर्ते भासवुन,सांगुन ‘खालीच’ सर्व सेटींग करतात.मग ‘वर ‘ त्याचे काम होते.सेटींग नाही केले किंवा कसे आणि कोठे करायचे हे माहिती नसणारे ‘वर’ गेले तर त्यांचे काम कशा पद्धतीने होते की नाही होत? हे तेथे दक्ष देवून पाहिल्यावर समजेल ! काय काय उत्तरे तयार करून ठेवली गेलेली आहेत?ती ऐकुण पहा.मग त्या नागरिकाला किती आणि कसे पळवले जाते हे तिथे जाऊनच पहिले पाहिजे.म्हणुन या दलालांची गुप्तपणे माहिती घेऊन रंगेहात पकडले पाहिजेत. आणि ,’ आतले ‘ जेवण,चहा,मच्छर,ढेकणे,कोंदटपणा यांचा अनुभव घ्यायला पाठवली पाहीजेत.
चक्क काही जण थातुर मातुर प्रेस किंवा डिजिटल माध्यमांकडुन प्रेसचे कार्ड म्हणजे पत्रकार म्हणवत या साखळी चे घटक बनलेले दिसत असतात.’पत्रकारिता कशाशी खातात’ याचा थांगपत्ता देखील यांना नसतो. यांच्या कार्डची तपासणी करुन ती खरी,खोटी,अद्ययावत आहेत की नाहीत. याचा तपास ही आवश्यक आहे.