तहसिलदार शिरुर कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे साखळी उपोषण !
तहसिलदार शिरुर कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे साखळी उपोषण झाले. अखेर तहसिलदार श्री.बाळासाहेब म्हस्के यांच्या दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. तहसिलदार श्री. बाळासाहेब म्हस्के दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तहसिलदार शिरुर कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे साखळी उपोषण !
तहसिलदार श्री.बाळासाहेब म्हस्के दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करणार !
शिरुर, दि. 13 जुलै: (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
तहसिलदार शिरुर कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे साखळी उपोषण झाले. अखेर तहसिलदार श्री.बाळासाहेब म्हस्के यांच्या दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. तहसिलदार श्री. बाळासाहेब म्हस्के दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काय आहेत दिव्यांगजनांच्या प्रमुख मागण्या ?-
1. तहसिलदारांनी महिन्यातील एख दिवस दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवण्याच्या साठी द्यावा. 2. केंद्रिय स्तरावर दिव्यांग आयोगाची स्थापना करावी. 3. मुंबई महापालिकेत दरवर्षी ३% निधी दिव्यांगांसाठी असतो.तो कुठे जातो ? या प्रश्नांचे उत्तर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचा प्रमुख प्रश्न आहे. 4. दिव्यांगजनांचा विकास का होत नाही? असा यात एक प्रमुख प्रश्न आहे. 5. दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने ठोस धोरण जाहीर करावे,अशी आमदार बच्चु कडु यांची केंद्र सरकारकडे मागणी आहे. 6. या मागण्यांसाठी आमदार बच्चु कडु यांनी केंद्रिय ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. 7. देशपातळीवर दिव्यांगांची स्वतंत्र नोंदणी करावी. 8. दिव्यांगांसाठी के जी ते पी जी मोफत शिक्षणाची व्यवस्था सरकारने करावी. 9. दिव्यांगांच्या पुर्वसनासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी द्यावा. 10. राज्यसभा व विधानपरिषदेत दिव्यांगजनांना प्रतिनिधीत्व द्यावे.
‘प्रहार’ चे साखळी उपोषण. …
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांचे साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले.
प्रहार दिव्यांग क्रांती संस्था शिरूर तालुका आणि शहराच्या वतीने शिरूर तहसीलदार कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर शिरूर तालुक्यातील आणि शहरातील तमाम दिव्यांग व्यक्तींनी साखळी उपोषण आंदोलन केले .
Dr.Nitin Pawar,Editor – satyashodhaknews.com
‘संपादकिय टच’
1. दिव्यांग म्हणजे दिव्य किंवा दैवी असे अंग असा नाही तर अपंग व्यक्तींना दिव्यांग असे संबोधण्यात यावे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ठरवले.त्यानंतर दिव्यांग हा शब्द अपंगांसाठी वापरला जाऊ लागला.हे अपंगत्व शारिरीक व मानसिक ही असु शकते.
2. दिव्यांगजन अधिकार अधिनियम 2016 करण्यात आला आहे. 3. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींचे 21 प्रकार करण्यात आले आहेत. 4. जागतिक दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्टीय दिवस 3 डिसेंबर हा मानण्यात येतो. 5. दिव्यांग व्यक्तींचे हक्क, सन्मान आणि कल्याण हे समाजाने एक कर्तव्य व एका व्यापक वैश्वीक मानवतेचे ध्येय मानले पाहिजे. यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. 6. 1992 मधे संयुक्त राष्ट्र संघटनेने आम सभेत ठराव करुन दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्टीय दिवस ठरवला होता. 7. शारिरीक दुर्बलता, पाठीचा कणा अपंगत्व,मेंदुचे अपंगत्व ,मानसिक अपंगत्व,दृष्टि अपंगत्व,श्रवण अक्षमता, बौद्धिक अपंगत्व,लोकोमीटर अपंगत्व असे आठ प्रकार मानलेले आहेत. 8. लोकोमिटर अपंगत्वामधे स्नायू,हाडे,सांधे यांमधील अक्षमता व त्यामुळे हालचाल करताना समस्या येते. 9. दिव्यांगांना समजुन घेण्यासाठी प्रशिक्षणे,शिबीरे आयोजित केली जातात. 10. दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी शासकिय योजना,स्वयंसेवी संस्था,सामाजिक संस्था,दानशुर व्यक्ती, संघटना कार्यरत असतात.
तहसिलदारांना निवेदन. …
यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या विविध मागण्यांचे निवेदन शिरूरचे तहसीलदार श्री.बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्र निंबाळकर, तालुकाध्यक्ष रामदास भुजबळ, उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे, महिला अध्यक्षा ज्योती गोसावी, शहराध्यक्ष मनीष सोनवणे, उपाध्यक्ष सुरज गुप्ता तसेच प्रहार ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक श्री. तुषार हिरवे, व्हाईस चेअरमन वैभव झांजे, संचालक अनिल शिंदे आणि मोठ्या संख्येने प्रहार सेवक, दिव्यांग बंधू ,भगिनी उपस्थित होत्या.
प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना –
आमदार बच्चु कडु: दिव्यांगांचे तारणहार !
“प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना ही एक दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील आघाडीची संघटना आहे.आमदार बच्चु कडु,बापुराव काणे,रामदास खोत हे या संघटनेचे प्रमुख संस्थापक व पदाधिकारी आहेत.यापैकी आमदार बच्चु कडु हे व्यक्तीमत्व महाराष्ट्राला परिचित आहे.अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन ते अनेक प्रश्नांवर काम करत असतात.त्यांनी एकदा ‘स्टिंग आपरेशन’ करुन भ्रष्टाचार्यांची पोलखोल केली होती.ती व्हायरल झाली होती. लोकप्रिय झाली होती.दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि विभाग स्थापन करावा,अशी एक प्रमुख मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची आहे.”
विशेष कॅम्प चे आयोजन करु – तहसिलदार. .
यावेळी आलिया तिरंदाज, रेणुका मल्लाव, मंगल गायकवाड ,जयश्री पन्नी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिरूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर ‘विशेष कॅम्प’ चे आयोजन करून विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत ‘विशेष कॅम्प’ आयोजित करून ‘ दिव्यांग व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिरूरचे तहसीलदार मा.श्री. बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
एकंदरीत शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी बर्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. मागण्या आहेत.काही समाजसेवेचा अविर्भाव आणत फळे वाटप,कार्ड वाटप,सारखे ‘दिव्य’ (?) कार्य करतात. पण मुलभुत कार्य कोनती करावी लागतात तर की जेणेकरुन दिव्यांग घटकांसारख्या लोकांना काही देण्याची गरजच भासु नये. असे शासकिय पातळीवर धोरण व निधी यांची आवश्यकता आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com