
Contents
- 1 ‘आप’ चा सवाल,” शंभर कोटींच्या रस्त्यांची डांबर चाचणी अद्याप का नाही ?
- 1.1 ‘आप’ चा महापालिका बैठकीत सवाल !
- 1.1.1 शिरुर, दि.15 जुलै : ( संदीप देसाईं यांच्याकडून )
- 1.1.2 ‘बिटूमीन कंटेन्ट’ चाचणी अद्याप का नाही?
- 1.1.3 46 वेगवेगळ्या चाचण्या का नाहीत?
- 1.1.4 ‘वरातीमागून घोडे’ चा सर्व प्रकार. ..
- 1.1.5 शाळेच्या रस्त्यावर अपघातांची शक्यता. …
- 1.1.6 शंभर कोटींचे रस्ते…
- 1.1.7 रस्त्त्याचा पंचनामा करण्याचा इशारा. ..
- 1.1.8 आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता. …
- 1.1.9 About The Author
- 1.1 ‘आप’ चा महापालिका बैठकीत सवाल !
‘आप’ चा सवाल,” शंभर कोटींच्या रस्त्यांची डांबर चाचणी अद्याप का नाही ?
‘आप’ चा महापालिका बैठकीत सवाल !
शिरुर, दि.15 जुलै : ( संदीप देसाईं यांच्याकडून )
‘आप’ चा इशारा आहे की ” रस्ते उकरल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या खिशातून घ्यावा ! तसेच ” ‘आप’ चा महापालिका बैठकीत सवाल ,” शंभर कोटींच्या रस्त्यांची डांबर चाचणी ‘बिटूमीन कंटेन्ट’ अद्याप का नाही ?”
‘बिटूमीन कंटेन्ट’ चाचणी अद्याप का नाही?
‘आप’ पश्चिम महाराष्ट्र सचिव संदीप देसाई यांनी महापालिका आयुक्त बैठकीत बोलताना सांगितले की ,
” महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील पाच रस्त्यांचे काम एवरेस्ट कंपनीने सुरु केले आहे. एस्टीमेट प्रमाणे काम व्हावे, तसेच रस्त्यांचा दर्जा टिकावा यासाठी आम आदमी पार्टीकडून या कामाचा पाठपुरावा केला जात आहे.” या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही बैठक कोल्हापुर येथे पार पडली आहे.
46 वेगवेगळ्या चाचण्या का नाहीत?
ते पुढे म्हणाले, “रस्त्याचा दर्जाचा राखला जावा यासाठी सेहचाळीस वेगवेगळ्या चाचण्या करायच्या आहेत. रस्त्यामधील डांबराचे प्रमाण मोजणारी सर्वात महत्वाची अशी ‘बिटूमीन कंटेन्ट’ ही चाचणी देखील यामध्ये समाविष्ट आहे. रस्ते करून महिना उलटला तरी ही चाचणी का केली गेली नाही, यामागे काही गौडबंगाल आहे का?” असा सवाल ‘आप’ चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महापालिका प्रशासनाला केला.यावर सल्लागार कंपनीच्या कसबेकर यांनी याबाबत कंत्राटदाराला वेळोवेळी कळवले तरी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याने ही चाचणी होऊ शकली नसल्याचे मान्य केले.
‘वरातीमागून घोडे’ चा सर्व प्रकार. ..
पाच रस्त्यापैकी ज्यावर गटार चॅनेल आहेत, तिथे संपूर्ण रुंदीचा रस्ता केला आहे. गटार करताना रस्ता परत उकरला जाणार, हे म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांमध्ये स्पष्ट उल्लेख असताना ‘युटीलिटी’ किंवा गटार करण्यासाठी रस्ते उकरल्यास त्याचा खर्च अधिकाऱ्यांच्या खिशातून घ्यावा, अशी मागणी देसाई यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे केली.यावर शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी येथून पुढच्या कामात गटार चॅनेलचे काम आधी करणार असल्याचे सांगतिले.
शाळेच्या रस्त्यावर अपघातांची शक्यता. …
चप्पल लाईनच्या रस्त्याचे काम गतीने करावे, ताराबाई पार्क येथील दामिनी हॉटेल समोरील रस्त्याचे त्वरित रिस्टोरेशन करावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली. कावळा नाका येथील नियाज हॉटेल समोरील रस्ता, यादवनगर चौक, प्रतिभानगर येथील हवामहल रस्ता, तसेच सेव्हन्थ डे शाळेच्या रस्त्यावर खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी ‘आप’ शिष्ट मंडळाने केली.
शंभर कोटींचे रस्ते…
शंभर कोटींच्या रस्ते विषयावर पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे .यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता आर के पाटील, महादेव फुलारी, सतीश फप्पे, सुरेश पाटील, ‘आप’ चे शहर महासचिव अभिजित कांबळे,मोईन मोकाशी,मयुर भोसले, दुशंत माने, सुधाकर शिंदे, उमेश वडर, वल्लभ पाटील, फिरोज सतारमेकर आदी उपस्थित होते.
19 जुन ला म्हणजे जवळपास एक महिन्यापुर्वी कोल्हापुर महापालिकेच्या 100 कोटी रूपये खर्चाच्या रस्ता कामाचा पंचनामा केला होता.त्यावेळी गटार चॅनेल गायब असल्याचे निदर्शनास आणुन दिले होते. तसेच महापालिकेकडे एकही तपासणी अहवाल या कामाचा उपलब्ध नव्हता, हे ही निदर्शनास आणुन दिले होते. आम आदमी पक्षाची टिम स्वतः एक कोअर टेस्ट करणार होती.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत कोल्हापुर शहरातील 16 रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी आला होता.
रस्त्त्याचा पंचनामा करण्याचा इशारा. ..
यातुन कोल्हापुर शहरातील 5 रस्त्यांचे काम सुरू होते.ते पूर्ण झाल्याचा दावा देखील महापालिकेने केला होता.यावर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे काम अपुर्ण असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबरीने या कामाचा पंचनामा करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानुसार संबंधित आप कार्यकर्ते संदीप देसाई व इतर त्या ठिकाणी गेले असता अधिकारार्याने ,’ तुम्ही निवेदन द्या. मी ते वरिष्ठ अधिकार्यांकडे पोचवतो’ असे म्हणताच आप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.त्यांनी आणखीन इतर संबंधित अधिकारी, कंत्राटदार वगैरे का आले नाहीत? असा प्रश्न विचारला होता.इथेच काहितरी गडबड असल्याचे आम आदमी पक्षाच्या कोल्हापुर येथील कार्यकर्यांना संशय आला होता.
आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता. …
त्यानंतर रस्ता च ‘बिटूमीन कंटेन्ट’ चाचणी केली पाहीजे होती.त्यातुन रस्त्याच्या दर्जाची कल्पना आली असती.पण ती चाचणी आज केली गेली नसल्याचे माहित झाल्यावर पुन्हा या कामात मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता कार्यकर्ताना आली वाटत आहे. पुष्कळ वेळा रस्ते बनवल्यानंतर थोड्याच अवधित ते हाताने देखील उकरता येतात, असे दिसून आले आहे. याचा अर्थ त्या रस्याच्या कामाचा दर्जा काय असणार आहे? ते पुढे किती दिवस चांगल्या अवस्थेत राहतील?नंतर पुन्हा पुन्हा दुरुस्तीचा खर्च होईल, दाखवला जाईल.मात्र लोकांचा पैसा अशा पद्धतीने लुटला जाईल.शिवाय निकृष्ठ काम असेल तर अपघातांची संभाव्यता जास्त असणार ! म्हणजे नागरिकाच्या जीवाशीच खेळ ना ! या विचाराने एक अभ्यासु व निरपेक्षपणे काम करणार्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संताप येणे स्वाभाविक आहे.