बहुजन मुक्ती पक्षाचे आगळेवेगळे ,” रस्ता देता का कोणी रस्ता “आदोलन !
बहुजन मुक्ती पक्षाचे आगळेवेगळे ," रस्ता देता का कोणी रस्ता "आदोलन शिरुर शहरात करण्यात आले.शिरुर शहरातील मंगलमूर्ती नगर,मदारी वस्ती आणि ढोमे वस्ती येथे पाय ठेवायला नाही जागा ! इतका खराब रस्ता आहे. त्याबाबत ' शिरुर नगरपालिका प्रशासन या भागाला सापत्न वागणुक देत आहे' , अशी घणाघाती टिका बहुजन मुक्ती पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी केली आहे.
बहुजन मुक्ती पक्षाचे आगळेवेगळे ,” रस्ता देता का कोणी रस्ता “आदोलन !
मंगलमूर्ती नगर,मदारी वस्ती आणि ढोमे वस्ती येथे पाय ठेवायला नाही जागा ! इतका खराब रस्ता?
शिरुर,दि.16 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
बहुजन मुक्ती पक्षाचे आगळेवेगळे ,” रस्ता देता का कोणी रस्ता “आदोलन शिरुर शहरात करण्यात आले.शिरुर शहरातील मंगलमूर्ती नगर,मदारी वस्ती आणि ढोमे वस्ती येथे पाय ठेवायला नाही जागा ! इतका खराब रस्ता आहे. त्याबाबत ‘ शिरुर नगरपालिका प्रशासन या भागाला सापत्न वागणुक देत आहे’ , अशी घणाघाती टिका बहुजन मुक्ती पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद यांनी केली आहे.
“कोणी रस्ता देता का रस्ता. ..”
आज दिनांक 15/07/2024 रोजी “कोणी रस्ता देत का रस्ता ?” या आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावले गेले.ते ‘बहुजन मुक्ती पार्टी’, शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील ‘संविधान चौका’ त संवैधानिक पद्धतीने शिरूर नगरपरिषदेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी लावले.अशा प्रकारे निषेध नोंदवण्यात आला. तसेच आणखीन वेगळे असे तो निषेध नोंदविण्यासाठी आनोखे ‘स्वाक्षरी मोहीम’ हे आंदोलन करण्यात आले.
Dr.Nitin Pawar,Editor – satyashodhaknews.com
“संपादकिय टच”…
” सापत्न वागणुक ही शिरुर नगरपालिका प्रशासन व त्यात बसणारे नगरसेवक यांच्या रक्तातच भिनली आहे.असा अनुभव अनेकांचा अनेक वर्षांपासून आहे.मतांच्या आधारावर कोणती मते सहज विकत मिळतात.कोनती मते विकत मिळत नाहीत.म्हणुन एखाद्या ठिकाणी अजिबात निवडून आल्यानंतर जायचे ही नाही. अशी पद्धत आहे. आम्हाला शांतीनगर भागातील रहिवासी नेहमी सांगत असतात की नगरसेवक निवडणुकीनंतर आलेलाच नाही.
मतांसाठी तीनशे रुपये,दोनशे रुपये,शंभरवरही भागवले गेलेले समजते.या रहिवाशांना कायमचीच तंगी असल्याने कितीही पैसे मिळाले तरी पाहिजेच असतात.दोन तीन दिवस इथल्या बायांना घरखर्चासाठी हे पैसे उपयोगी पडतात.हे मी शिरुर शहरातील एका भागाचे वास्तव सांगत आहे. इथला नगरसेवक कोण आहे हे मला नक्की सांगता येणार नाही.पण इथले नागरिक मात्र वरीलप्रमाणे सांगतात.हे खरे आहे. तो इकडे परत फिरकलाच नाही म्हणतात.
एक तर शिरुर शहराचे खास वैशिष्टय़ म्हणजे जसे दौंड, भोर,आंबेगाव इ.ठिकाणी नगरसेवक हे स्वतः निर्णय घेतात.रिलक्स relax असतात.तसे शिरुरचे नगरसेवक मात्र काहीही विचारले तर ते शेटजींना विचारुन सांगतो.असे सांगतात.हे स्वतः च्या कोनत्याही योग्यतेवर निवडून येत नाहीत.तर शेठ पैसा निवडणुकीत लावतो.त्यावर त्याचे निवडून येणे अवलंबून असते. असेही ऐकले आहे की शेटजीचा हात एकदा पाठीवर पडला की कायमचा वर येतो.तोही फुगुन (?) !
त्याचे प्रश्न मिळतात.पण नागरिकांचे प्रश्न मिटतात का? तर नाही.शेठनी बाहेरुन किंवा दुसर्या देशातुन झापले म्हणजे नगरपालिका कर्मचारी काही मिनिटात एखाद्या ठिकाणी पोचतात.कामाला लागतात.पण नगरसेवक मात्र हे करु शकत नाही.नगरपालिका कर्मचार्यांना बहुदा शेटजीच्याच पुर्वजांनी नगरपालिकेत कामाला लावले असावेत.ते सरकारचे (किमान ! जनतेचे तर लांबची गोष्ट ) नोकरदार असण्यापेक्षा शेटजीचेच नोकर असल्यासारखे वावरताना दिसतात. म्हणजे एक अजबच सरकार इथं चालतं ! नगरसेवक, नगर अध्यक्ष इथं वार्डातील लोकप्रिय उमेदवार असावा हे काही जरूरी नाही.शेटची कृपा फक्त झाली पाहीजे. मग याचे भाग्य उजळते ! आणि शेठ म्हणतात जास्त काळ संधी देत नाही. माणसं बदलतो.मग आधीच्याला काडीची किंमत रहात नाही.राजकीय करियर समाप्त.कारण त्याला नंतर अपक्ष राहिला तर शंभर मतेही मिळणे कठीण असते.कारच त्याचा पिंडच सामाजिक किंवा राजकिय सेवा जनतेला निरपेक्षपणे देण्याचा नसतो ! तसे ध्येयवादी कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनीधी निर्माण होण्यासाठीची आवश्यक मशागतच संपली आहे .ती वाटेल तितका पैसा निवडणुकीत खर्च करण्याची शेठची ताकत असण्यामुळे ! पर्यायाने हे शहर एका मानिपली सारखे किंवा पुर्वी संस्थानिक असायचे तसे एका शेठचे संस्थान बनले आहे. लोकशाही ,सार्वभौम भारतात !
एकंदरच अशा किरकोळ (?) समस्या हा गौण भाग आहे. शेटजीची कृपा अग्र भाग आहे.”
” कोणी रस्ता देत का रस्ता ? आंदोलनात शहरातील असंख्य लोकांची उपस्थित होती. त्यांनी स्वाक्षरी करून शिरूर नगरपरिषद विरोधात आपला निषेध नोंदवीला आहे.
मंगलमुर्ती नगर, मदारी वस्ती,ढोमे वस्ती येथे रस्ताच नाही…
शिरूर नगरपरिषद हद्दीत मंगलमुर्ती नगर, मदारी वस्ती, ढोमे वस्ती या ठिकाणी पक्का रस्ताच नाही. सदर ठिकाणी पावसाळ्यात लोकांना जा-ये करण्यासाठी चिखलातून प्रचंड कसरत करावी लागत आहे. महिला-लहान मुले या चिखलामध्ये पाय घसरून पडत आहेत. काहींचे हात-पाय मोडून जखमी झालेत. तर काही स्वयंभू नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरले. आपल्या घरापर्यंत रस्ते बनवून घेतले आहेत. असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
आंदोलन करण्याचा बहुजन मुक्ती पार्टी चा इशारा. .
आम्हीही नगरपालिकेचे टॅक्स भरतो मग आमच्यावर अन्याय का ? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले गेले. तरी वरील ठिकाणी शिरूर नगरपरिषद यांनी ताबोडतोब पक्का रस्ता बनवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी.नाहीतर बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तिव्र आंदोलन करणार आहे.असा इशारा शिरुर नगरपालिकेला देण्यात आला. सदर आंदोलनात शहरातील लोकांनी शिरूर नगरपरिषदेचा व सापत्नीक वागणुक देणाऱ्या प्रशासनाचा जोरदार विरोध केला आहे.तसेच निषेध व्यक्त केला आहे.
बहुजन मुक्ती. .,आप,भाजपाचे कार्यकर्ते एकत्र….
यावेळी ‘बहुजन मुक्ती पार्टी’ चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, मा.फिरोजभाई सय्यद, शिरूर शहराध्यक्ष, मा.समाधान लोंढे, शिरूर शहर सचिव, मा.सागर घोलप, शिरूर शहर संघटक, मा.अशोक गुळादे, प्रहार सैनिक संघटनेचे पदाधिकारी मा.सुदर्शन शिर्के, भारतीय विद्यार्थी मोर्चा, शिरूर तालुका अध्यक्ष, मा.सुलतान शेख हे भारत मुक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच शिरूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष, मा.संपत लोखंडे सर,मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.महिबुबभाई सय्यद, मनसे शिरूर शहर सचिव मा.रवी लेंडे,’भारत मुक्ती मोर्चा’ चे मा.विजय भोईरकर,आम आदमी पार्टीचे मा.अनिल डांगे, अजिज खान, इस्माईल खान, तसेच असंख्य नागरिकांनी स्वक्षरी करून निषेद व्यक्त केला आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com