
Contents
- 1 विठ्ठल नामाची शाळा भरली… शाळा शिकताना तहान भूक हरली… – ॲडव्होकेट करंजुले
- 1.1 इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन वारकरी पंथाचे महत्व सांगितले!
- 1.1.1 शिरुर, दिनांक 16 जुलै : ( सौ. कांचन सोनवणे पाटील यांच्याकडुन)
- 1.1.2 वारकरी पंथ —
- 1.1.3 श्री विठ्ठल : तथागत बुद्ध संबंध ? —
- 1.1.4
- 1.1.5 ——- संपादक
- 1.1.6 वारी मुळ पायी केली जायची…
- 1.1.7 बाल वारकऱ्यांचा दिंडीने वेधले दक्ष…
- 1.1.8 इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन विद्यार्थांचे प्रबोधन. ..
- 1.1.9 About The Author
- 1.1 इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन वारकरी पंथाचे महत्व सांगितले!
विठ्ठल नामाची शाळा भरली… शाळा शिकताना तहान भूक हरली… – ॲडव्होकेट करंजुले
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन वारकरी पंथाचे महत्व सांगितले!
शिरुर, दिनांक 16 जुलै : ( सौ. कांचन सोनवणे पाटील यांच्याकडुन)
‘विठ्ठल नामाची शाळा भरली… शाळा शिकताना तहान भूक हरली’ असे भावपुर्ण उदगार ॲडव्होकेट करंजुले यांनी कारेगाव येथे काढले आहेत. माईलस्टोन ज्ञानपिठ संस्था कारेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयोजित लहान मुला मुलींच्या ‘बालदिंडी’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे महत्व हे होते की ही इंग्रजी माध्यमाची शिक्षण संस्था आहे.तिची इंग्रजी माध्यमाची शाळा कारेगाव येथे आहे.या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन वारकरी पंथाचे महत्व सांगितले गेले. ‘ बालदिंडी’ काढण्यात आली.
वारकरी पंथ —
वारकरी पंथ किंवा संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील देव मानल्या जाणार्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार्या लोकांची समुदाय.आषाढी वारी आषाढ महिन्यात असते.या वारी मधे सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. असे दिसते.सर्वांचे दैवत विठ्ठल हे असते.त्याच्यापाशी कोनताही भेदभाव नाही.हा वैष्णव म्हणजे विष्णुला मुख्य मानणार्या पंथ आहे.यांना वैष्णव जन देखील म्हणतात.इथं अध्यात्मिक समता आणण्यात या परंपरेतील संत नामदेव,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम अशा संतांना यश मिळाले.पण सामाजिक समता काही अस्तित्त्वात आली नाही.
ती आजही नाही.वेगवेगळ्या जातींच्या नावाने धर्मशाळा आजही अस्तित्त्वात आहेत.आजचीच बातमी आहे की आदिवासींसाठीची धर्मशाळा पंढरपुर येथे बांधण्यात येत आहे. संतांच्याही नावाला त्याची जात लावण्यापर्यंत वैचारिक दिवाळखोरी या पंथाच्या काही लोकांनी केली.ती रुढही झाली.उदाहरणार्थ संत गोरा कुंभार,संत सेना न्हावी इ.
तरी पण भक्ती हा मुख्य भाग या सांप्रदायाचा झाला.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा मुख्य आधार या परंपरेतील संतांच्या व्यापक वैश्वीक मानवतेचे ध्येय मानण्यात झाला.हे खरे आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या लिखाणात संतांच्या विचारांचे संदर्भ दिले आहेत.एकंदरीत आजच्या महाराष्ट्राला घडवण्यात या पंथाचा मोठा हातभार आहे.
श्री विठ्ठल : तथागत बुद्ध संबंध ? —
पंढरपुर येथील विठ्ठलाची मुर्ती ही बुद्धाची मुर्ती होती.असे काही अभ्यासकांचे मत आहे. विठ्ठल हे बुद्धच आहेत.भारतात त्या काळी बुद्धाचा धम्म पसरलेला होता.अनेक बौद्ध लेणी,स्तुप,शिलालेख त्या काळात अस्तित्त्वात येत होते.भारत बुद्धमय होता.शिवाय तेथे एकच मुर्ती होती.दुसरी रुक्मिणी देवीची मुर्ती आधी नव्हती.ती नंतर वैदिक परंपरेतील लोकांनी बसवली.असा या अभ्यासकाचे मत आहे. असुनही शकते.कारण जगात भारत आजही बुद्धाच्या नावाने ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेल्यावर भारत बुद्धाचा,गांधीजींचा वगैरे देश आहे, असे सांगतात.
मात्र महाराष्ट्र व भारतासाठी पूर्वजांकडून आलेला हा ठेवा अभिमानास्पद नक्कीच आहे.तो आजच्या लोकशाही सार्वभौम भारतात एक नागरिक म्हणून प्रत्येकाने जपला पाहिजे.
——- संपादक

वारी मुळ पायी केली जायची…
महाराट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला विविध संतांची परंपरा लाभलेली आहे . समस्त संत आणि वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत पंढरपूर आहे. हे जगविख्यात आहे. येथील श्री हरी पांडुरंगाच्या आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आणि बाहेरूनही बहुसंख्येने सर्व जाती धर्माचे वारकरी वेगवेगळ्या दिंड्या घेऊन पायीवारीला येत असतात.
हीच वारकऱ्यांची परंपरा अखंड चालू राहण्यासाठी मुलां-मुलींना लहान वयातच वारीचे महत्व कळणे आवश्यक आहे. त्यांच्या मनात चांगले संस्कार रुजविण्यासाठी ‘माईलस्टोन ज्ञानपीठ संस्था, कारेगाव, ता. शिरूर येथील ‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल’ या इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये सर्व मुलां-मुलींच्या बालदिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी दिली आहे.

बाल वारकऱ्यांचा दिंडीने वेधले दक्ष…
याप्रसंगी उपस्थित बाल वारकऱ्यांचा उत्साह आणि वेशभूषा पाहून आपण भारावून गेल्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ॲड. करंजुले यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, ” विठ्ठल-रुख्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेषातील तहान भूक हरपून अभंगाच्या तालावर दंग होऊन नाचणाऱ्या ह्या बाल वारकऱ्यांना पाहून खरोखर येथे आज ‘विठ्ठल नामाची शाळा भरल्या’चे जाणवत आहे.”
संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनिल ओस्तवाल, प्रमुख पाहुणे ॲड. श्री.करंजुले सर आणि महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा समन्व्यक सौ. मीनाताई गवारे हे उपस्थित होते.
तसेच उपस्थित ‘माईलस्टोन’ चे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि उपस्थित पालकांच्या हस्ते श्री. विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. शाळेपासून जवळ असलेल्या दत्त मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने टाळ मृदूंगाच्या गजरात हरिनाम घेत पालखी खांद्यावर घेतली. मोठ्या उत्साहात दिंडीसोहळा काढला.त्यामध्ये गोल रिंगण केले. मुलींसह सर्व शिक्षिका व महिला पालकांनी देखील ‘फुगडी’ चा मनमुराद आनंद लुटला.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन विद्यार्थांचे प्रबोधन. ..
इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही बालदिंडी सारखा सोहळा आयोजित करुन संत परंपरा मुलांच्या मध्ये रुजविण्यासाठी शाळेने आयोजित केलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सौ. मीनाताई गवारे यांनी खूप कौतुक केले.
तर स्वागत आणि प्रास्ताविक ‘माईलस्टोन’ चे संस्थापक व कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रिन्सिपल सौ. कांचन सोनवणे यांनी केले. अध्यक्ष श्री. सुनिल ओस्तवाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.