
ब्रेकिंग न्युज : अल्पवयीन मुलीचा
विनयभंग झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे?
ब्रेकिंग न्युज : शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग?
शिरुर,दि.20 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
ब्रेकिंग न्युज प्राप्त झाली आहे.त्याप्रमाणे विनयभंग झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे घडली आहे. मुलगी अल्पवयीन आहे. संबंधित आरोपीवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
कवठे येमाई येथे विनयभंग. …
या घटनेची सविस्तर माहिती तक्रारीत नोंदवल्याप्रमाणे अशी आहे.दिनांक 18/07/2024 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गाव- कवठे येमाई, तालुका, शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत घनशी, गणेशनगर येथे निर्भया ( नाव गोपनीय ) ही तिच्या राहत्या घरी एकटी तिच्या घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये बसली होती.
“विनयभंग म्हणे स्रीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल.असे वर्तन करणे असा आहे.हा प्रकार ज्याच्या बाबतीत घडतो.त्यालाच त्याच्या आयुष्यभर मनास होणार्या यातनांबद्दल अनुभव कसा असतो.हे माहित असते.अनेक जणांवर याचा विपरित मानसिक त्रास व मनोशारिरिक आजार होण्यामधे झालेला आहे.स्रियांमधे हे प्रमाण मोठे आहे.या घटना एक विकृती आहे.समाजात अशी विकृती आजकाल वाढली आहे. ही विकृती वेगवेगळ्यावर्तनातुन अभिव्यक्त होताना दिसते.त्यातलाच हा एक प्रकार आहे.
यावर जालिम औषध शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव करणे हा आहे.भारतीय परिस्थितीत आणि तथाकथित संस्कृतीत ही विकृती निर्माण होते.याचा अर्थ समजुन घेण्यासाठी इतिहासात जावे लागेल.व्यक्तीच्या अनेक नैसर्गीक भावना तथाकथीत संस्कृतीच्या नावाने दडपल्या जाणे हे आहे.हे पुरुषप्रधान कुटुंब व समाज हे एक महत्वाचे कारण आहे.सगळ्या नैसर्गीक इच्छा आकांशांचे दमण हजारो वर्षांपासून या भारतवर्षात घडले आहे.त्याच्यासाठी देव,धर्म,कर्मकांडे, प्रथा,परंपरा,पेहराव,श्रमविभागणी, जातीव्यवस्था अशा बर्याच साधनांचा वापर केला गेल्याचे दिसुन येते.
त्यामुळे बर्याच बाबतीत पुनः कित्सा करण्याची खरी गरजा असते.हा व्यवस्थेचा प्रश्न आहे हेच मुळात धोरणकर्यांना मान्य नाही.उलट आहे तेच आदर्श आहे.धार्मिक आहे.शास्वती आहे.असा भ्रम बाळगलेला.आपल्या लक्षातही येत नाही.”
आरोपीची जावे मारण्याची धमकी. ….
त्यावेळी आरोपी इंदाराम दिगंबर हिलाळ, रा. घनशी, गणेशनगर, कवठेयेमाई, ता. शिरूर, जि. पुणे याने पत्र्याच्या शेडची बाहेरून लावलेली कडी काढली. आत तिच्या जवळ येवुन तिचा हात धरला. ती त्याला माझा हात सोड, तु बाहेर जा, असे म्हणाली.तरी त्याने हात सोडुन तिला मिठी मारली. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती.तरी त्याने तिचा हात धरून तिला ओढले. घरामध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. ती घाबरून आरडाओरडा केरु लागली.तेव्हा तो तेथून निघुन गेला.जाताना त्याने मला ‘ तु कोणाला सांगशील तर तुला जीवे मारून टाकीन‘ असे बोलुन धमकी दिली आहे.
कायदा,पोलीस, न्याय मिळण्याची खात्री याबाबत समाजात उदासिनता पहायला मिळते. भ्रष्टाचार हे एक प्रमुख कारण आहे. काही केले तरी पैसा वापरुन आपण निश्चित सुटणार ! अशी जणु पैशावाल्यांना पक्की खात्रीच आहे.याचा दोष पोलिस खात्याकडे जातो.पोलिसांचा धाक असेल तर एखाद्याला संपवण्याची धमकी कोणी देईल का? बर्याच वेळा स्रिया देखील त्यांच्या स्री असण्याचा गैरफायदा घेताना दिसुन येतात.कित्येक स्रीया तर या बाबतीत सर्रास खोटे आरोप घेताना दिसतात.
एक प्रकारचे ब्लैकमेलिंग करत असताना दिसतात. ही एक पद्धत आज फोफावली आहे.जे घडले नाही.ते काल्पनीक रचना करुन सरळसरळ खोटारडेपणा करत असल्याचे समाजात दिसुन येत आहे. त्याबाबतही काही ठोस भूमिका घेत सरकारने कायदे केले पाहिजेत.नाही तर अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे.तसा पुरुषांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा करण्याची वेळ येवू नये.म्हणजे झाले.
स्रियांना पुढे करुन आपला कार्यभग साधणारे किंवा बचाव करणारे महाभागही आहेत.कोणीतरी अशा बातम्या देवू नका.असा सज्जड दमही देत असतात. दबाव आणत असतात. मात्र अशी माहिती समाजात बातमी नाही दिली तरी सहज पोचत असतात. हे या महाभागांना कळत नाही. शिवाय प्रतिष्ठेच्या खोट्या,अवास्तव आणि अवाजणी कल्पना घेउन जगणारे अनेक असतात.प्रतिष्ठा जन्मजात मिळवणे सोपे आहे.पण श्रेष्ठ कार्य करुन मिळवणे अवघड असते.
आपल्या समाज व्यवस्थेत जन्माधारित श्रेष्ठता,कनिष्ठता हा फार जुनाट सामाजिक रोग आहे. तेही अनेक अत्याचाराच्या मागचे एक तगडे कारण आहे. ढोंगीपणाचा वाईट रोगही आहे.खुप अध्यात्मिक बोलायचे.देवादिकांची माहित सांगायची.राजे,महापुरूषांची माहिती सांगायची.भक्तीबाबत बोलायचे.ज्ञान ही आमची परंपरा असल्याचे सांगायचे.परमार्थ, परमात्मा,अद्वेत अशा गप्पा मारत बसायचे.वर्तन मात्र नेमके उलटे करायचे.हे हे लोक सहज करतात.
आरोपीवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. …
म्हणुन पिडीत मुलीने त्याच्या विरूध्द फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनला दिली आहे. शिरुर पोलीस स्टेशनमधे गुन्हा रजिस्टर नंबर 642/2024 आहे. तर भारतीय न्याय संहीता कलम 74,75,76,351(2) (3) बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम, कलम 8,12 नुसार इंदाराम दिगंबर हिलाळ रा. घनशी, गणेशनगर, कवठेयेमाई, ता. शिरूर, जि. पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस सब इन्पेक्टर श्री.उगले वदाखल पोलिस सब इन्पेक्टर श्री. पवार हे प्रभारी अधिकारी श्री.जोतीराम गुजवटे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.