कवठे येमाई येथे जुन्या पैशाच्या व्यवहारातुन लोखंडी रॉडने मारहाण !
कवठे येमाई येथे जुन्या पैशाच्या व्यवहारातुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर मारहाण करताना ' जिवंत सोडणार नाही ' अशी धमकी ? देखील दिली आहे.
कवठे येमाई येथे जुन्या पैशाच्या व्यवहारातुन लोखंडी रॉडने मारहाण !
कवठे येमाई येथे एकाला ‘ जिवंत सोडणार नाही ‘ अशी धमकी ?
शिरुर,दि.22 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
कवठे येमाई येथे जुन्या पैशाच्या व्यवहारातुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर मारहाण करताना ‘ जिवंत सोडणार नाही ‘ अशी धमकी ? देखील दिली आहे. त्यामुळे पिडीताने शिरुर पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली आहे.शिरुर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
‘संपादकिय टच’ सह एक खुलासा !
“लागोपाठ कवठे येमाई, आमदाबाद ते शिरुर या रोडलगतच्या गावांमधे गेल्या दोन तीन दिवसांत गुन्हे घडल्याच्या नोंदी शिरुर पोलिस स्टेशनला दाखल झाल्या आहेत.त्यासंबंधीच्या बातम्या ‘सत्यशोधक न्युज’ या न्युज साईटवर प्रसिद्ध झाल्याने या भागातुन सत्यशोधक न्युज कडे फोन आले आहेत.मात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर व पोलिस सुत्रांकडून सत्यशोधक न्युज ला प्राप्त झाल्यानंतर त्या बातम्या देणे हे सत्यशोधक न्युज चे कर्तव्य आहे.ते सत्यशोधक न्युज इमानदारीने पार पाडत असते.
कोनतीही बातमी किंवा काही विश्लेषण सत्यशोधक न्युज ने केले तर त्यातुन कोणी ना कोणी तरी दुखावला जात असतो. पण माध्यमे लोकशाहीचा चौथा खांब आहे.हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे. माध्यमे आता नवीन तंत्रज्ञानामुळे क्षणात समाजात घडणार्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. दिलेल्या बातम्या संपादित करता येतात.लगेच अद्ययावत माहीती देता येते.पण आमचे नाव खराब होते.तुम्ही खराब करत आहात.गावाचे नाव खराब करत आहात.तुम्ही देखील गावचेच आहात. म्हणुन काही बातमी देवु नका.त्यातुन आपण आपल्याच गावाची बदनामी का करता?अशा आशयाची विचारणा सत्यशोधक न्युज कडे झाली.
मी सत्यशोधक न्युज चा संपादक या नात्याने काही गोष्टी स्पष्ट करु इच्छितो.जिथे आमच्याकडुन काही चुक झाली.तर ती मान्य करुन मी दुरुस्ती करायला तयार असतो.काही बातम्या मी दुरुस्त केल्या आहेत. माझे डिजिटल माध्यम आहे. यात बातमी काढुनही टाकता येते.प्रिंट माध्यमातुन देखील बातमी दुरुस्ती दुसर्या लगतच्या अंकात करुन दिलगीरी किंवा माफी मागितली जाते.मी स्वता काही वर्षांपुर्वी एका आंदोलनात एका वर्तमान पत्राची होळी करण्याच्या आंदोलनात भाग घेतला होता.पोलिस त्याठिकाणी आले. त्यानंतर चर्चा करुन आंदोलन थांबवण्यात आले होते.
दुसर्या दिवशी त्या हिंदी वर्तमानपत्रांने माफी मागणारा मजकुर प्रकाशित केला.त्यावेळी डिजिटल माध्यमे नव्हती.पण त्यात विषय सामाजिक होता.वैयक्तिक नव्हता. म्हणुन मी स्पष्ट करु इच्छितो की भारत हेच माझे गाव आहे. तालुका आहे.जिल्हा आहे.राज्य आहे.देश आहे.हे लक्षात घ्यावे.मी पक्षपातीपणा करु शकत नाही. गावपातळीवरील पुर्वग्रह बाळगुन कोणी मला ग्रहित धरू नये.संविधानानुसार मी माझे कर्तव्य पार पाडणार हे नक्की!
कोणाचे नाव खराब होत असेल तर त्याने तसे कृत्य करु नये.पोलिस, कायदा त्याचे काम करणारच असतो.काय असेल तो युक्तीवाद प्रोसिजर प्रमाणे संबंधित ठिकाणी करावा.आणि बातमीत फिर्यादी व आरोपी असे लिहिले जाते.जोपर्यंत अपराध सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी असतो.म्हणजे ज्याच्यावर गुन्हा केल्याचा आरोप असतो.तो असतो.पण तो गुन्हेगार मानला जात नाही. ते पुढे न्यायालय ठरवते.समाजानेही बातमी म्हणजे नेमके काय असते? हे समजुन बातमी वाचली पाहिजे. बातमी काही जणु जगातले अंतिम सत्य असते असे आंधळेपणाने मानु नये.
काळ फार वेगाने पुढे चालला आहे. गावेसुद्धा नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड होत असतात.आहेत.मात्र विचार करण्याची पद्धत अपडेट करायला आपण विसरतो.त्यातुन काही वेळा अनाठायी अहंकारातुन आपण पहात असतो.ते चुकीचे आहे.त्याला कोणी दबणारही नाही.हे ध्यानात असु द्या.लोकशाही पर्यंत आपण आज आलो आहोत. मागे जायचे काही कारण नाही.लोकशाही पेक्षा या जगात पुर्वी कोनतीही आदर्श व्यवस्था जगात कधीच अस्तित्वात नव्हती. गोष्टी, कथा,काव्ये,महाकाव्यात वर्णित असु शकतात. पण वास्तवात कधीच नव्हत्या.
भारताचा जास्तीत जास्त सुवर्णकाळ आजचाच आहे.भुतकाळात तो कधीच नव्हता.तो आणखीन समृद्ध करणे भविष्यात घडावे असे अपेक्षित आहे. तेच होणारही आहे.उगाच गल्ली बोळाच्या अस्मिता आणि त्याही सोईप्रमाणे आमच्याकडे दाखल करू नयेत.हा संपादक दिसायला,बोलायला,वागायला साधा आहे. पण लेखणी चालवायला साधा नाही.अडाणी नाही.तीस वर्षांचा ग्रंथव्यासंग बाळगणारा आहे.पारंपरिक चष्म्यातुन पाहिलेत तर फसाल ! हे नक्की”
फिर्यादीस शिवीगाळ…..
फिर्यादीत नमुद केल्यानुसार दिनांक 20/07/2024 रोजी दुपारी 12:30 वाजण्याचा सुमारास कवठे येमाई ,तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे येथील फिर्यादी निशिकांत शशिकांत माटे, वय- 35 वर्षे ,व्यवसाय- शेती, राहणार – कवठे येमाई, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांच्या शेताच्या कडेला अष्टविनायक रोड आहे.तेथे पिंपळाच्या झाडाखाली गोरख अर्जुन वागदरे ,राहणार – कवठे यमाई, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे याने मागच्या जुन्या पैशाच्या देणेघेण्याच्या कारणावरून निशिकांत शशिकांत माटे यांना शिवीगाळी केली .
तसेच लाथाबुक्याने मारहान केली . मारहाण करणार्यांकडुन त्यातील धनंजय पाचर्णे (पुर्ण नाव माहीत नाही), राहणार – करडे ,तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे याने फिर्यादीची कॉलर पकडली.त्याला खाली पाडले. त्याच्या हातातील लोखंडी बॉक्स पाईपाने छातीवर पाठीवर मांडीवर मारले. मारहाण करताना ‘ तुला आता जिवंत सोडणार नाही‘ अशी जीवे मारण्याची धमकी फिर्यादीला दिली.
शिरुर पोलिस स्टेशनला फिर्यादी…..
म्हणुन फिर्यादी निशिकांत शशिकांत माटे, वय -35 वर्षे, व्यवसाय- शेती ,राहणार- कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे यांनी आरोपींविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशनमधे गु.र.नं 648/2024 हा असुन भारतीय न्याय संहीता कलम 118 (1),352,351 (1), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक फौजदार मांडगे हे करत आहेत.तर दाखल अमलदार पोलिस हावलदार आगलावे हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com