शिरुर मधे 43 वर्षीय इसमाची आत्महत्या (? ) तर कवठे येमाई येथे झालेल्या अपघातातील जखमीचे निधन !
शिरुर मधे 43 वर्षीय इसमाची आत्महत्या (? ) तर कवठे येमाई येथे झालेल्या अपघातातील जखमीचे निधन झाले आहे. या
शिरुर तालुक्यातील दोन दुर्दैवी घटनांमधे दोघांचा मृत्यु झाल्याने नागरिकांमधे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरुर मधे 43 वर्षीय इसमाची आत्महत्या (? ) तर कवठे येमाई येथे झालेल्या अपघातातील जखमीचे निधन !
शिरुर तालुक्यातील दोन दुर्दैवी घटनांमधे दोघांचा मृत्यु !
दिनांक,23 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरुर मधे 43 वर्षीय इसमाची आत्महत्या (? ) तर कवठे येमाई येथे झालेल्या दोन तीन दिवसापुर्वीच्या अघातातील जखमीचे निधन झाले आहे. या शिरुर तालुक्यातील दोन दुर्दैवी घटनांमधे दोघांचा मृत्यु झाल्याने नागरिकांमधे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनांशी संबंधित पिडीतांनी शिरुर पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. शिरुर पोलिसांनी तातडीने याची दखल घेवुन पुढील कारवाई केली आहे.
‘संपादकिय टच’
Dr.Nitin Pawar,Editor, Shirur.
“आमच्या प्रिय वाचकांना विनंती आहे की सत्यशोधक न्युज ही न्युज साईट आहे.वेबसाईट आहे.ब्लाग आहे.ही एक चांगली सोय गरीब पत्रकार,लेखक,नागरिक यांना उपलब्ध झालेली सोय आहे. तंत्रज्ञान आहे.त्यात लिहिण्याचे स्वातंत्र बरेच आहे.संपादक किंवा मालकाचे बंधन नाही. कमी खर्चात हे काम शक्य आहे. हेच यापुढे मुख्य माध्यम राहिल.कागदी माध्यमे टॉयलेट पेपरच्या दर्जाची असतात.असं ओशोंनी सांगितले होते.ते कागद बनवण्यासाठी लाख मोलाच्या वृक्षांची तोड जगभर दररोज होत आहे. पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.”
म्हणून डिजिटल माध्यमांकडे वळावे.सर्व पेपरलेस होणार.असे सरकार सांगतच असते.त्या कागदी मिडीयाही इतिहासजमा केला तर काही डोंगर कोसळतार नाही ! आणि जगभरातील हा मिडिया भांडवलदारांसाठी काम करतो हे लपुन राहिलेले नाही. अशा भ्रामक माध्यमांना इतिहास काळात पाठवणे जगभरातील लोकांच्या फायद्याचेच ठरेल ! आमची साईटच चालावी म्हणून आम्ही असे म्हणत नाही.तर लाखमोलाचा निसर्ग नष्ट करुन टायलेट पेपरचा दर्जा उरलेला कागदी मिडीया, प्रेस पाहणे बंद करायला हरकत नाही. माहिती व अपडेट्स मिळवण्यासाठी डिजिटल, इलेक्ट्रॉनिक मिडीया चांगला आहे.मिडिया कर्मी किंवा पत्रकारांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.स्वताचा मिडीया प्लेटफार्म तयार करणे सोपे आहे.आपल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्य्याला वाचवता येइल.
मालकाच्या ,संपादकाच्या धोरणाप्रमाणे मान खाली घालुन गुपचिप हमाली करणे देखील बंद होईल.समाजात डागळलेली प्रतिमा बदलेल.वाचकांचे प्रश्न आर्टिफिशल इंटेलिजेंस टुल्सचा वापर करून अधिक वेगाने,पारदर्शक पद्धतीने सर्व कामे करता येतील.हे नवे युग आले आहे. त्याला सामोरे जात जीवन अधिक जास्त आनंदी आणि अर्थपुर्ण, सत्कारणी लावण्यास सज्ज असल्याचे दाखवून द्यावे लागेल.प्रगत देशांमधे हे सुरु झाले आहे. भारतीयांना लेट करंटची सवय आहे. पण आजचा भारत तो भारत नाही.वेगळा भारत आहे.हे समजुन घेतले पाहिजे
आजचे जगही पुर्वीच्या जगासारखे नाही.नवीन जग आहे.त्यात आपल्याला जास्तीत जास्त मागच्या शतकांमधे जगावेसे वाटते. सवयीचा परिणाम ! पण एक वेळेस आपले पुर्वज वस्र देखील घालत नव्हते. त्यावेळी वस्र बनवण्याचे संशोधन झाले नव्हते.पण जेव्हा ते झाले तेव्हा तो बदल आपल्या पुर्वजांनी स्विकारला होता.असे शेकडो बदल आपल्या पुर्वजांनी स्विकारले.म्हणुन नंतर अधिक उन्नत जीवन आपल्याला आज उपलब्ध झाले आहे. बदल आला घाबरू नका.आपले पुर्वज घाबरले नाहीत.ही बाब बरेच काही सांगणारी आहे.बाकी समजदार समजु शकतात.नासमझही समजुन घेतात.पण उशिरा !
एवढे सांगायचे कारण सत्यशोधक न्युज फक्त बातमीपत्र नाही. लेखनही आहे.बातमी व्यतिरिक्त माहिती,विश्लेषण,कलाकृती आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम करणारच आहे.ब्लाग शब्दाने घाबरुन जावु नका.ब्लाग म्हणजे लेखन आणि ब्लागर म्हणजे लेखक असा प्रचलित होत आहे. प्रतिष्ठीतही ठरत आहे. ध्रुव राठीचे उदाहरण पहा.सगळ्या पारंपरिक मिडियाला मागे टाकत त्याने देशातील लोकांचे प्रबोधन केले. हे आपण पाहिले आहे.’ डिक्टेटर ‘ सारखे त्याचे यु ट्यूब वरील टापिक निवडणुकांमधे तरुण तरुणींना आपल्या जबादारीचे भान देवून गेले.आवश्यक ते परिवर्तन करुन गेले.”
शिरुर च्या ओएसिस सोसायटीत घेतला गळफास?
फिर्यादीत नमुद केल्यानुसार हकिकत अशी आहे की
दिनांक 22/07/2024 रोजी रात्री 80 : 50 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर बबन डांळीबकर वय- 43 वर्ष, व्यवसाय- खाजगी नोकरी, राहणार- बाभळसर खुर्द, तालुका,शिरूर, जिल्हा- पुणे मो. यांनी त्यांचे चुलत भाउ संतोश बापुराव डाळींबकर, वय – 43 वर्ष, राहणार , ओयासीस सोसायटी शिरूर,तालुका- शिरूर ,जिला – पुणे यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशनला या घटनेची अ.म. रजि नं 93/2824 बीएनएसएस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस हवालदार श्री.उबाळे हे करत आहेत. तर दाखल अंमलदार पोलिस हवालदार आगलावे हे आहेत.प्रभारी अधिकारी ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास शिरुर पोलिस करत आहेत.
———
कवठे येमाईतील जखमीचे निधन. …
तर दुसर्या घटनेत शिरुर पोलिस स्टेशनला करण्यात आलेल्या नोंदीप्रमाणे हकिकत अशी आहे की रंगनाथ बन्सी आढाव, वय- 35 वर्ष, राहणार- कोळगाव, तालुका- श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर याचा अंदाजे दोन दिवसापूर्वी मोटार सायकल वरून कवठे यमाई ,तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे येथून जात असताना त्यांच्या मोटार सायकलचा व चार चाकी वाहनाचा अपघात झाला होता. त्यांना प्रथमोपचारासाठी सिविल हॉस्पिटल , अहमदनगर येथे ऍडमिट केले होते.यची माहिती पोलिस हवालदार एस. एन. कालेकर यांनी पौड पोलिस स्टेशनला दिली होती.
ससुनमध उपचार घेत होता…..
दिनांक 11/6/2024 रोजी सायंकाळी 18:00 वाजता ससून हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी वार्ड नंबर 12 मध्ये ऍडमिट केले असता त्यांच्यावर उपचार चालू असताना ते दिनांक12/6/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता ससूनच्या वार्डात मयत झाले आहेत.मयताची कागदपत्रे आज रोजी ससून येथून आल्याने मयताची नोंद दाखल करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार श्री. भगत हे करत आहेत.तर दाखल अंमलदार पोलिस हवालदार आगलावे हे आहेत. प्रभारी अधिकारी ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालु आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com