शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का?- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिरुर चा सवाल !
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का? असा सवाल मनसे,शिरुरने नगरपालिकेला केला आहे.त्याचबरोबर शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी अशीही महाराष्ट्र नवनिर्मान सेना,शिरुरने केली आहे. ही मागणी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना मनसेने देत केली आहे.
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का?- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिरुर चा सवाल !
शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी – मनसेची मागणी ; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले निवेदन..
शिरूर प्रतिनिधी : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
शिरुरमधे साचणारा असा कचरा उचलणारे झोपडपट्टीत राहतात.काय हा विरोधाभास?
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का? असा सवाल मनसे,शिरुरने नगरपालिकेला केला आहे.त्याचबरोबर शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी अशीही महाराष्ट्र नवनिर्मान सेना,शिरुरने केली आहे. ही मागणी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना मनसेने देत केली आहे.
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का? असा सवाल मनसे,शिरुरने नगरपालिकेला केला आहे.त्याचबरोबर शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी अशीही महाराष्ट्र नवनिर्मान सेना,शिरुरने केली आहे. ही मागणी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना मनसेने देत केली आहे.’शिरुर‘
शिरुर स्वच्छ ठोवणारेच झोपडपट्टीत का?
शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना त्वरित मंजूर करावी. अशी मनसेची अतुलजी सावे गृहनिर्माण मंत्री यांच्या कडे मागणी केली आहे. शिरुर नगरपरिषदेची स्थापना सन १८६८ मध्ये झालेली असून १५० वर्षांच्या इतिहासामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची घरकुल योजना नगरपरिषदेने राबविलेली नाही. गेली अनेक वर्षे परंपरागतरित्या सफाई कर्मचारी शिरुर शहराची स्वच्छता करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी त्याच कुटुंबातील किंवा जवळच्या नातलगांमधून सेवेत समाविष्ट केले जातात. परंतू हे कर्मचारी / कामगार आजही शहरातील झोपडपट्यांमध्ये राहत असून त्यांची दयनीय अवस्था आहे. शहराचे आरोग्य चांगले रहावे म्हणून सदर कामगार रात्रंदिवस काम करत असतात. परंतू त्यांचे जीवन हालाखीचे बनले आहे. ते वास्तव्य करत असलेल्या झोपडपट्टयांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहांची कमतरता आहे.
” एका शेठचं वाक्य आठवतं.गरीबांच्या मुंड्या पिरगळल्याशिवाय श्रिमंत होता येत नाही.शिकार वाघाची नसती करायची ! हरणांची,सशाची करायची ! हे खरं आहे. मला अजुन आठवतं ! शेठ काही शिरुरचा नव्हता. पण शेठची एक जात असते.ती जगात सर्वत्र आहे.गरीबाचीही एक जात असते.ती देखील जगात सर्वत्र असते.
पण डायरेक्ट मुंड्या पिरगळता येत नाहीत. कारण शेठ बुजदिल असतो.गरीबाला राग आला तर अत्यंत वाईट बनतो.हे देखील खरं आहे.हे शेठला माहित असतं.त्याला राघ येवु नये याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी दहातील एकाला हाताशी धरून थोडं थोडं खायला घालावं लागतो.मग तो शेठच्या गुणांचं कौतुक गरीबामधे जाउन करतो.शेठ कसा देवासारखा धावला.याचं एक उदाहरण पेश करावं लागतं.म्हणून शंभरातल्या एका गरीबाला लग्न कार्याला पैसे म्हणा,एखाद्या व्यसन करून मरायला लागलेल्या नवर्याच्या औषधपाण्यासाठी पैसे द्यायचे.असं रॉबिन हुड पद्धतीने कामकाज करावं लागतं.पुर्ण रॉबिन हुड बनुन चालत नसतं.
उरलेल्या अठ्ठ्याण्णव गरीबांना कसं शांत ठेवायचं?तर त्यांचा विक पाईंट देव,देवळे,यात्रा,जयंत्या,क्रिकेट सामने,ते लाईव्ह,मिनी आय पी एल,तेही टेनिस बॉलवर !कसा प्रोफेशनल आय पी एल,कौंटी मधे खेळेल?दांडिया,त्याच्या स्पर्धा, थोडसं रग निर्माण होवू न देण्यासाठी करायचं ! अशा गोष्टींना देणगी द्यायची.दर पंधरा दिवसांनी एक सण , उत्सव पेरले पाहिजेत.गरीबाला एकत्र येवुन आपल्या यातना मोकळया करायला वाव देउन कसं चालेल?एकत्र आलाच तर धिंगाणा साजरा करण्यासाठी येवु देणे सोईस्कर आहे.
मात्र कितीही काही झाले तरी गरीबाला वर येवू द्यायचे नाही.कारण त्यांच्यात मुंड्या पिरगळता येतात. वाघाची शिकार करण्याच्या भानगडीत कशाला उगाच पडायचे?हरणांची,सशाची शिकार सोपी !
हे आहे शेठजीचं तत्वज्ञान ! म्हणुन कुठल्याच नगरपालिकेकडे जागा जरी असली तरी झोपडपट्टी किंवा बेघरांसाठी तिथे घरे बांधल्याचे उदाहरण नाही.बैलांसाठी भलीमोठी पांजरपोळ संस्था काढुन तेथे जणावरे ठेवायची.अनैतिक पैशातुन ती पोसायची.माणसांना खायला अन्न नसले तरी चालेल.तरी गरीबांना रा आला तर ! तर भिक नको पण कुत्रं आवर ! असे वाटावे इतकी मोठ्या मनाने रोटी पण ती एखाद्या महापुरूषाच्या नावाने सुरु करायची. आमुक की मुफ्त रोटी ! भारतातील महापुरुष त्यांच्या हयातीत मरणप्रा यातना सोसतात.त्यांच्या पश्चात मात्र यातना देणार्रांनाच उपयोगी पडतात.तेच त्यांना देव बनवतात म्हणुन !
तिथं काही गरीब एडजस्ट होतात.पण त्यांचा राग काही जागृत झाला नाही पाहिजे. एवढं आणि बरचं मॅनेज करायचे.त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कमी खर्चात जगातील सर्वात जास्त लोकसंखा असलेल्या देशात मिळनं अवघड थोड. आहे? नो प्रोब्लम !
घरे देणे सहज शक्य आहे. पण इच्छा नाही. वीज,पाणी देणं शक्य आहे. पण इच्छा नाही. नगरपालिकेच्या शाळा काअशीर्पोरेट सुविधांयुक्त करता येणं शक्य आहे. पण इच्छा नाही. रोजगार देणेही शक्य आहे. पण इच्छा नाही. सर्वांचा विकास करता येणं शक्य आहे. पण इच्छा नाही. सर्व ओपन हर्ट सर्जरी ,कन्सर ,अवयव प्रत्यारोपण,प्लास्टिक सर्जरी पर्यंत आरोग्य सुविधा करता येणे शक्य आहे. पण इच्छा नाही.
कारण हे झालं तर शेठजींना कोण किंमत देणार? मग सत्ता,वर्चस्व आणि अहंकाराला हे आवडत नसते !”
पिण्याचे पाणीही अशुध्द मिळते…
त्यांना मिळत असलेले पाणी ते सुध्दा अशुध्द स्वरुपाचे मिळते. तरी ही माणसे शहराच्या आरोग्यासाठी काबाड कष्ट करत असतात. एकीकडे पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण केली आहे त्याचबरोबर पंचायत समिती, आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, म.रा.वि.वि.कं., तसेच पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वसाहती निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे मानवी दृष्टीकोनातून शहरातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी लागणारी शासनाची जागाशहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
शिरुर नगरपालिकेकडे घरांसाठी भुखंड उपलब्ध !
शिरुर शहर :शहरात स्वागत करणारा हा फलक ! पण….
त्यामध्ये प्रामुख्याने शिरुर शहरामधील हुडको कॉलनी जवळील सव्हें नं. ११४० मधील दत्त मंदिराजवळील मोठा भूखंड तसेच पाबळ फाटा येथील सर्व्हे नं. ११३०/१ब अशा अनेक जागा उपलब्ध आहेत. तरी आपणास विनंती करण्यात येते की, इतिहासकालीन नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांना शिरुर शहरामध्ये घरकुल बांधून मिळण्यासाठी शासन स्तरावर आपले माध्यमातून प्रयत्न व्हावेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला न्याय मिळेला पाहिजे. असे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे व मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे.
ग्रहनिर्माण मंत्री अतुल सावेंचे आश्वासना …
या मागणी वर गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे यांनी
एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री तथा मंत्री, नगरविकास, मंत्रालय, यांना सावे यांनी मनसेचे पत्र जोडून मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करण्याबाबत विनंती केली आहे. मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांच्या निवेदनानुसार पुणे जिल्ह्यातील शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर करण्याकरिता आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे पत्र व्यवहार गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे यांनी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री तथा मंत्री, नगरविकास, मंत्रालय यांना सावे यांनी सांगितले आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com